मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ही स्पर्धा पुण्याला जगाच्या नकाशावर घेऊन जाणारी ठरेल. देशात सायकल श्रीमंताचे वाहन म्हणून दीडशे वर्षांपूर्वी आली होती. त्यावेळी सायकल वापरण्यासाठी परवाना लागायचा. पुण्यात १९४७ साली पहिली सायकल स्पर्धा झाली होती. त्यामुळे पुण्याची ओळख ‘सायकलचे शहर’ म्हणून होती, आणि ही सायकल संस्कृती आजही शहराच्या अभिमानाचा भाग आहे. जागतिक वेळापत्रकात या स्पर्धेचा समावेश झाल्याने तिचे आयोजन अत्यंत यशस्वी ठरेल आणि ही स्पर्धा देशासाठी महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Monday, 3 November 2025
पुणे ग्रँड टूरमुळे पुण्यातील पर्यटन वाढेल ; सायकलचे शहर ही जुनी ओळख पुन्हा प्रस्थापित होईल
पुणे ग्रँड टूरमुळे पुण्यातील पर्यटन वाढेल ;
सायकलचे शहर ही जुनी ओळख पुन्हा प्रस्थापित होईल
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘पुणे ग्रॅण्ड टूर २०२६’चे बोधचिन्ह आणि जर्सीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
पुणे, दि. २९ : ‘बजाज पुणे ग्रॅण्ड टूर २०२६’ या ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या माध्यमातून पुण्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि पर्यटनस्थळांचे महत्व अधोरेखित होईल आणि पर्यटकांची संख्या वाढेल. राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल तसेच प्रदूषणावर मात करत पुण्याची “सायकलचे शहर” ही ओळख पुन्हा प्रस्थापित होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राज्य शासन, पुणे जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘बजाज पुणे ग्रॅण्ड टूर २०२६’ चे बोधचिन्ह व जर्सी अनावरण समारंभात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आशियाई सायकलिंग महासंघाचे अध्यक्ष दातो अमरजीत सिंग गिल, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव दातो मनिंदर पाल सिंग, आशियाई सायकलिंग महासंघाचे माजी महासचिव ओंकारसिंग, मुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी आदी उपस्थित होते.
सुधारित अनुदान योजनेसाठी 14 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
सुधारित अनुदान योजनेसाठी 14 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई,दि.३ : अल्पसंख्याक विकास विभागामार्फत अल्पसंख्याक बहुल शासनमान्य प्राप्त खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी सुधारीत अनुदान योजना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या अटी व शर्तींची पूर्तता करून विहित नमुन्यातील अर्जासह संपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारि, मुंबई शहर (जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई – ४००००१) येथे १४ नोव्हेंबर, २०२५ पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.
अर्जाचा नमुना https://mdd.maharashtra.gov.in यावर उपलब्ध आहे. निर्धारित दिनांकानंतर प्राप्त होणारे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत. प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक १४ नोव्हेंबर असून, जिल्हाधिकारी कार्यालयाने प्राप्त प्रस्तावांची छाननी करून, त्रुटींची पूर्तता करून, अंतिम पात्र प्रस्ताव शासनास सादर करण्याचा अंतिम दिनांक – १५ डिसेंबर, २०२५ पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे अथवा दूरध्वनी: ०२२-२२६६०१६७, ई-मेल: dpomumbaicity@gmail.com यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
0000
झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी 14 नोव्हेंबर पर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी
14 नोव्हेंबर पर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
मुंबई,दि.३ :अल्पसंख्याक विकास विभागामार्फत डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात राबविण्यात येत आहे. राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत आणि मुंबई शहर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील मदरसांनी या योजनेंतर्गत सुधारित प्रस्ताव सादर करण्यासाठी विहित अटी व शर्तींची पूर्तता करून विहित नमुन्यातील अर्जासह पूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी, मुंबई शहर (जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई – ४००००१) येथे १४ नोव्हेंबर, २०२५ पर्यंत सादर करावे असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
अधिक माहिती https://mdd.maharashtra.gov.in
जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनास प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक १५ डिसेंबर, २०२५ आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे अथवा,
दूरध्वनी: ०२२-२२६६०१६७, ई-मेल: dpomumbaicity@gmail.com यावर संपर्क साधावा असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
0000
आदिवासी युवकांना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करणे
या उपक्रमाचा उद्देश आदिवासी युवकांना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करणे आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करणे हा आहे. कार्यक्रमाचे आयोजन आणि संचालन अनुप इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आले. निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त फुलसिंग पवार यांनी प्रेरणादायी व्याख्यान दिले. या वेळी गृह मंत्रालयाच्या अवर सचिव पिंकी राणी, तसेच पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सहभागी युवक-युवतींनी अभिप्राय सत्रात आपले अनुभव सांगितले. यावेळी सांस्कृतिक व भाषण स्पर्धेतील विजेत्यांचा चषक देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम आदिवासी युवकांमध्ये राष्ट्रीय एकता, नेतृत्व व सांस्कृतिक जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने यशस्वीरीत्या संपन्न झाला, अशी माहिती जिल्हा युवा अधिकारी अनुप इंगोले यांनी दिली.
0000
श्रद्धा मेश्राम/विसंअ
माय भारत ॲपद्वारे युवकांना रोजगाराच्या संधी
माय भारत ॲपद्वारे युवकांना रोजगाराच्या संधी
-केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया
१७ वा आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न
मुंबई,दि.३ : युवकांनी २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्यासाठी योगदान द्यावे. तसेच, युवकांना रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी ‘माय भारत पोर्टल’ मार्गदर्शक ठरणार आहे. या पोर्टलद्वारे युवकांना नोकरीच्या संधी, कौशल्य विकास, ऑनलाईन स्पर्धा तसेच काम आणि विचारांची देवाणघेवाण यासंबंधीची सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. युवकांनी डिजिटल उपस्थिती वाढवून या पोर्टलचा सक्रिय वापर करावा, असे आवाहन केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी केले.
गृह मंत्रालयाच्या सहकार्याने युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य पोलीस यांच्या समन्वयाने पोलीस प्रशिक्षण केंद्र, मरोळ, येथे १७ वा आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण विभाग) प्रवीण कुमार पडवळ, जिल्हा युवा अधिकारी (माय भारत, मुंबई) अनुप इंगोले, पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रवींद्र दळवी आणि ज्युडो कार्यक्रम समन्वयक यतिन बांगरा आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाचा उद्देश आदिवासी युवकांना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करणे आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करणे हा आहे. कार्यक्रमाचे आयोजन आणि संचालन अनुप इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आले. निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त फुलसिंग पवार यांनी प्रेरणादायी व्याख्यान दिले. या वेळी गृह मंत्रालयाच्या अवर सचिव पिंकी राणी, तसेच पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सहभागी युवक-युवतींनी अभिप्राय सत्रात आपले अनुभव सांगितले. यावेळी सांस्कृतिक व भाषण स्पर्धेतील विजेत्यांचा चषक देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम आदिवासी युवकांमध्ये राष्ट्रीय एकता, नेतृत्व व सांस्कृतिक जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने यशस्वीरीत्या संपन्न झाला, अशी माहिती जिल्हा युवा अधिकारी अनुप इंगोले यांनी दिली.
राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५चा नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ
राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५चा नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई,दि.३ : भारतातील सागरी मत्स्यव्यवसाय क्षेत्र अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५ ला आज औपचारिक सुरुवात झाली. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मंत्रालय मुंबई येथे या जनगणनेचा शुभारंभ करण्यात आला. देशातील ही पाचवी सागरी मत्स्य जनगणना असून ती ३ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर २०२५ दरम्यान पार पडणार आहे. केंद्रीय सागरी मात्स्यिकी संशोधन संस्था (सीएमएफआरआय)आणि मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविली जात आहे.
जनगणनेची उद्दिष्टे व वैशिष्ट्ये
या मोहिमेचा उद्देश केवळ आकडेवारी गोळा करणे नसून देशातील सुमारे १२ लाख मत्स्यव्यवसायिक कुटुंबांची माहिती, ५६८ मासेमारी गावे आणि १७३ मत्स्य उतरण केंद्रे यांचा तपशीलवार अभ्यास करून सागरी क्षेत्रातील धोरणनिर्मिती व नियोजनाला दिशा देणे आहे. या अंतर्गत मच्छीमारांची सामाजिक-आर्थिक स्थिती, पायाभूत सुविधा, उपजीविका साधने आणि शासकीय योजनांच्या लाभांबाबतची माहिती संकलित केली जाणार आहे.
जनगणनेचे डिजिटायझेशन — व्यासएनव्ही प्रणालीद्वारे नवे युग प्रथमच ही जनगणना पूर्णतः डिजिटल प्लॅटफॉर्मवर राबवली जात आहे.
सीएमएफआरआय ने विकसित केलेल्या ‘व्यासएनव्ही’ अॅप प्रणालीद्वारे गणकांना टॅबलेट पीसी वितरित करण्यात आले आहेत. या अत्याधुनिक प्रणालीमुळे डेटा संकलनात अचूकता, पारदर्शकता आणि वेग येणार असून शासनाला धोरणनिर्मितीसाठी विश्वसनीय माहिती उपलब्ध होईल.
Featured post
-
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी -वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ · महाराष्ट्र-बाडेन...
-
टी.एन. शेषन हे भारताचे निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून 1990–1996 या काळात अत्यंत कठोर, निर्भीड आणि सुधारक म्हणून ओळखले ...
-
कोण होता 'चेन्दरू मडावी'...? (विदेशी फिल्म ला ऑस्कर मिळवून देणारा जगातला एकमेव भारतीय आदिवासी मोगली चेन्दरू मडावी...) एक ...