Monday, 3 November 2025

सुधारित अनुदान योजनेसाठी 14 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 सुधारित अनुदान योजनेसाठी 14 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई,दि.३ : अल्पसंख्याक विकास विभागामार्फत  अल्पसंख्याक बहुल शासनमान्य प्राप्त खासगी शाळाकनिष्ठ महाविद्यालयेऔद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी सुधारीत अनुदान योजना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या अटी व शर्तींची पूर्तता करून विहित नमुन्यातील अर्जासह संपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारि, मुंबई शहर (जुने जकात घरशहीद भगतसिंग मार्गफोर्टमुंबई – ४००००१) येथे १४ नोव्हेंबर२०२५ पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.

अर्जाचा नमुना  https://mdd.maharashtra.gov.in यावर उपलब्ध आहे. निर्धारित दिनांकानंतर प्राप्त होणारे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत. प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक  १४ नोव्हेंबर असूनजिल्हाधिकारी कार्यालयाने प्राप्त प्रस्तावांची छाननी करूनत्रुटींची पूर्तता करूनअंतिम पात्र प्रस्ताव शासनास सादर करण्याचा अंतिम दिनांक – १५ डिसेंबर२०२५ पर्यंत आहे.  अधिक माहितीसाठी जिल्हा नियोजन समितीजिल्हाधिकारी कार्यालयमुंबई शहर येथे अथवा  दूरध्वनी: ०२२-२२६६०१६७ई-मेल: dpomumbaicity@gmail.com  यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi