Friday, 10 October 2025

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री धन–धान्य कृषी योजनेचा शुक्रवारी शुभारंभ

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा शुक्रवारी शुभारंभ

- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

  • राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा

मुंबईदि. ९ : प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेबाबत केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा करण्यात आली होती. या योजनेचा शुभारंभ ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी साडेदहा वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतरत्न सी. सुब्रमण्यम सभागृह,  पुसानवी दिल्ली येथे होणार आहे. महाराष्ट्र राज्यस्तरीय कार्यक्रम कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सभागृह पुणे या ठिकाणी होणार आहे. कृषी क्षेत्रात प्रयोगशील व प्रगतिशील कामगिरी करणारे ३०० हून अधिक शेतकरी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

या योजनेमध्ये कमी उत्पादकता असलेलेकमी सिंचन क्षमता असलेलेकृषी कर्जाच्या उपलब्धतेबाबत समस्या असलेल्या १०० जिल्ह्यांची निवड केंद्र शासनाने केली आहे. यात महाराष्ट्र राज्यातील  पालघररायगडधुळे छत्रपती संभाजी नगरबीडनांदेडयवतमाळचंद्रपूरगडचिरोली या नऊ जिल्ह्यांची निवड झालेली आहे.

सद्य स्थितीमध्ये राज्यामध्ये केंद्र व राज्य शासनाद्वारे कार्यान्वित असलेल्या ३६ हून अधिक केंद्रीय आणि राज्य योजनांच्या अभिसरणाद्वारे पिकांची उत्पादकता वाढवणेपिक उत्पादनाची शाश्वतता सुनिश्चित करणे तसेच काढणीपश्चात तंत्रज्ञान व पतपुरवठा प्रणाली मजबूत करण्याच्या उद्देशाने  देशातील १०० आकांक्षित जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे.

एनएचएम’ कर्मचाऱ्यांना १५ टक्के मानधन वाढ

 एनएचएम कर्मचाऱ्यांना १५ टक्के मानधन वाढ

- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबईदि. ९ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना १५ टक्के इतकी मानधन वाढ देण्यात येणार आहे. याबाबत शासन मान्यता देण्यात आली असुनराज्यभरातील पन्नास हजार (५००००) कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून आनंद व्यक्त होत असून सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांचे कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागात विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (एन.एच.एम.) अंतर्गत विविध पदावर कंत्राटी तत्त्वावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांची मानधन वाढीची मागणी होती. त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने १५ टक्के मानधन वाढ देण्याचा निर्णय केला आहे.

आरोग्य यंत्रणा राबवण्यामध्ये एनएचएम कर्मचाऱ्यांचा महत्त्वाचा वाटा असून त्यांच्या उर्वरित मागण्यांबाबतही शासन सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी सांगितले. १० वर्षे सलग सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणेएनएचएम कर्मचाऱ्यांना इएसआयएस अंतर्गत सामाजिक सुरक्षा लाभ देणेकर्मचाऱ्यांसाठी गंभीर आजारअपंगत्वमृत्यू अशा संकटात आर्थिक सहाय्य देण्यासाठी एनएचएम कर्मचारी कल्याण निधी उभारणेअति दुर्गम व नक्षलग्रस्त भागात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देणेकंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनातील तफावत दूर करणेयासह इतर मागण्यांबाबत शासन सकारात्मक असूनयाबाबत कार्यवाही सुरू आहे. या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आणि आरोग्य विभागाची यंत्रणा अधिक परिणामकारक होईलअसा विश्वास आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी व्यक्त केला आहे.

सद्यस्थितीत राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. माहे जून २०२५ च्या देय मानधनावर मानधन वाढीची गणना करण्यात येणार आहे. 

संप कालावधीत महावितरणकडून राज्यातील वीजपुरवठा सुरळीत

 संप कालावधीत महावितरणकडून राज्यातील वीजपुरवठा सुरळीत

मुंबईदि. ९ : वीज कर्मचाऱ्यांच्या २९ पैकी सात संघटनांच्या संयुक्त कृती समितीने गुरुवार (दि. ९) पासून सुरू केलेल्या ७२ तासांच्या बेकायदेशीर संपाच्या कालावधीत महावितरणकडून राज्यभरातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात आला आहे. या संपामध्ये महावितरणमधील ६२ टक्के अभियंतेअधिकारी व कर्मचारी सहभागी झाले नाहीत.

वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या सर्व मागण्यांशी सुसंगत व सकारात्मक भूमिका महावितरणच्या व्यवस्थापनाने यापूर्वीच बैठकीमध्ये स्पष्ट केली आहे. त्याचे लेखी इतिवृत्तही संयुक्त कृती समितीला देण्यात आले आहे. तरीही ९ ऑक्टोबरपासून ७२ तासांच्या बेकायदेशीर संपाला सुरुवात करण्यात आली आहे.

वीज ही अत्यावश्यक सेवा आहे व नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम म्हणजेच मेस्मा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार हा संप बेकायदेशीर असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या तीन दिवसीय संप काळासाठी महावितरणकडून आपत्कालीन पर्यायी व्यवस्था उभारण्यात आली आहे. महावितरणमध्ये गुरूवारी (दि. ९) सुमारे ६२ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यासोबतच २० हजार तांत्रिक बाह्यस्त्रोत कर्मचारी (यंत्रचालक व विद्युत सहायक) कार्यरत आहेत. संपकाळात प्रामुख्याने सुरळीत वीजपुरवठ्यासाठी मुंबई येथील मुख्यालयात मुख्य अभियंता यांच्या नियंत्रणात आपत्कालीन नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षाद्वारे राज्यभरातील वीजपुरवठ्यावर २४ तास लक्ष ठेवण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार मनुष्यबळ व साधनसामग्रीचे नियोजन करण्यात येत आहे. यासह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये देखील स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. त्याद्वारे राज्यातील वीजपुरवठ्याची स्थिती वरिष्ठ अधिकारी व मुख्यालयास कळविण्यात येत आहे.

संपकाळातील नियोजनानुसार पर्यायी मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे. यात संपात सहभागी नसलेले महावितरणचे कर्मचारी२० हजार बाह्य स्त्रोत तांत्रिक कर्मचारीमहावितरणच्या निवड सूचीवरील कंत्राटदार व कर्मचाऱ्यांची सुरळीत वीजपुरवठ्यासाठी स्थानिक कार्यालयउपकेंद्र आदी ठिकाणी तात्पुरत्या नियुक्ती करण्यात आली आहे.

संपकाळामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी सर्व क्षेत्रीय विभाग कार्यालयांच्या निवडसूचीवर असलेल्या सर्व कंत्राटदारांना आवश्यक साधनसामग्रीमनुष्यबळ व वाहनांसह संबधीत कार्यालयांमध्ये उपलब्ध झाले आहेत. वीजपुरवठा संदर्भात काही तक्रारी असल्यास नागरिकांनी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या २४ तास सुरु असलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

प्रधानमंत्री धन– धान्य कृषी योजना, नैसर्गिक शेती व कडधान्य अभियानhttps://pmindiawebcast.nic.in

 प्रधानमंत्री धन– धान्य कृषी योजना, नैसर्गिक शेती व कडधान्य अभियान अंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत शुभारंभ कार्यक्रम होणार असून राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयसर्व कृषी विज्ञान केंद्रसर्व तालुका मुख्यालयसर्व ग्रामपंचायतसर्व प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रसर्व प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा पतसंस्था (PACS), सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

यामध्ये लोकप्रतिनिधीकृषी व संलग्न विभागातील  अधिकारी/कर्मचारीकृषी विद्यापीठे /कृषी विज्ञान केद्रांचे शास्त्रज्ञकृषी पुरस्कार प्राप्त शेतकरीपीक स्पर्धा विजेती शेतकरीनैसर्गिक शेती करीत असलेले शेतकरीशेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित रहावे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण https://pmindiawebcast.nic.in या लिंकद्वारे करण्यात येणार आहे.

तरी राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री धन–धान्य कृषी योजनेचा शुक्रवारी शुभारंभ

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा शुक्रवारी शुभारंभ

- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

  • राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा

मुंबईदि. ९ : प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेबाबत केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा करण्यात आली होती. या योजनेचा शुभारंभ ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी साडेदहा वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतरत्न सी. सुब्रमण्यम सभागृह,  पुसानवी दिल्ली येथे होणार आहे. महाराष्ट्र राज्यस्तरीय कार्यक्रम कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सभागृह पुणे या ठिकाणी होणार आहे. कृषी क्षेत्रात प्रयोगशील व प्रगतिशील कामगिरी करणारे ३०० हून अधिक शेतकरी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

या योजनेमध्ये कमी उत्पादकता असलेलेकमी सिंचन क्षमता असलेलेकृषी कर्जाच्या उपलब्धतेबाबत समस्या असलेल्या १०० जिल्ह्यांची निवड केंद्र शासनाने केली आहे. यात महाराष्ट्र राज्यातील  पालघररायगडधुळे छत्रपती संभाजी नगरबीडनांदेडयवतमाळचंद्रपूरगडचिरोली या नऊ जिल्ह्यांची निवड झालेली आहे.

सद्य स्थितीमध्ये राज्यामध्ये केंद्र व राज्य शासनाद्वारे कार्यान्वित असलेल्या ३६ हून अधिक केंद्रीय आणि राज्य योजनांच्या अभिसरणाद्वारे पिकांची उत्पादकता वाढवणेपिक उत्पादनाची शाश्वतता सुनिश्चित करणे तसेच काढणीपश्चात तंत्रज्ञान व पतपुरवठा प्रणाली मजबूत करण्याच्या उद्देशाने  देशातील १०० आकांक्षित जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे.

उर्दू साहित्य कला अकादमीच्या सुवर्णमहोत्सवी तीन दिवसीय समारोह संपन्न दर्जेदार साहित्यिक, सांगितीक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्यास रंगत

 उर्दू साहित्य कला अकादमीच्या सुवर्णमहोत्सवी तीन दिवसीय समारोह संपन्न

दर्जेदार साहित्यिकसांगितीक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्यास रंगत

मुंबई, दि. ९ : महाराष्ट्र उर्दू साहित्य अकादमीला ५० वर्षे पूर्ण झाली. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वरळी डोम येथे ६ ते ८ ऑक्टोबर रोजी तीन दिवसीय साहित्यिक व सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यानिमित्त पुस्तक प्रदर्शनकवी संमेलनपत्रकारकवीलेखक यांना पुरस्कार प्रदानसुफी संगीत अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अद्ययावत उर्दू घर उभारणार - अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री ॲड माणिकराव कोकाटे

            या सोहळ्याचे उद्घाटन अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी ते म्हणाले कीमराठी व उर्दू साहित्यिक देवाण घेवाणीसाठी सांस्कृतिक केंद्रे म्हणजे ‘उर्दू घर योजना’ आहे. ही योजना अद्ययावत बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील. तसेच उर्दू शाळावसतिगृहे वाढविण्यासाठी सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली. उर्दू साहित्य अकादमीची नवीन समिती लवकरच गठित करणार आल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे म्हणाले कीछत्रपती शिवाजी महाराजमहात्मा जोतिराव फुलेराजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान विभूतींनी समाजउन्नतीसाठी कार्य करताना सर्वसमावेशकताशिक्षणभाषेचा विकास आणि संस्कृती संवर्धन यासारख्या मूल्यांची परंपरा निर्माण केली. त्यांच्या विचारांच्या प्रभावामुळेच उर्दूसह सर्व भाषांना महाराष्ट्रात मानाचे स्थान लाभले.

एनएचएम’ कर्मचाऱ्यांना १५ टक्के मानधन वाढ

 एनएचएम कर्मचाऱ्यांना १५ टक्के मानधन वाढ

- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबईदि. ९ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना १५ टक्के इतकी मानधन वाढ देण्यात येणार आहे. याबाबत शासन मान्यता देण्यात आली असुनराज्यभरातील पन्नास हजार (५००००) कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून आनंद व्यक्त होत असून सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांचे कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागात विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान (एन.एच.एम.) अंतर्गत विविध पदावर कंत्राटी तत्त्वावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांची मानधन वाढीची मागणी होती. त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने १५ टक्के मानधन वाढ देण्याचा निर्णय केला आहे.

आरोग्य यंत्रणा राबवण्यामध्ये एनएचएम कर्मचाऱ्यांचा महत्त्वाचा वाटा असून त्यांच्या उर्वरित मागण्यांबाबतही शासन सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी सांगितले. १० वर्षे सलग सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणेएनएचएम कर्मचाऱ्यांना इएसआयएस अंतर्गत सामाजिक सुरक्षा लाभ देणेकर्मचाऱ्यांसाठी गंभीर आजारअपंगत्वमृत्यू अशा संकटात आर्थिक सहाय्य देण्यासाठी एनएचएम कर्मचारी कल्याण निधी उभारणेअति दुर्गम व नक्षलग्रस्त भागात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देणेकंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनातील तफावत दूर करणेयासह इतर मागण्यांबाबत शासन सकारात्मक असूनयाबाबत कार्यवाही सुरू आहे. या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आणि आरोग्य विभागाची यंत्रणा अधिक परिणामकारक होईलअसा विश्वास आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी व्यक्त केला आहे.

सद्यस्थितीत राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. माहे जून २०२५ च्या देय मानधनावर मानधन वाढीची गणना करण्यात येणार आहे. 

Featured post

Lakshvedhi