Monday, 6 October 2025

सहकारच्या प्रवासाला दिशा देणारा क्षण -

 सहकारच्या प्रवासाला दिशा देणारा क्षण - उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणालेडॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवरानगरच्या माळावर आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना उभा केला आणि त्यामुळे महाराष्ट्राचा देशातल्या सहकारी साखर कारखानदारीला नवी दिशा मिळालीमहाराष्ट्र खऱ्या अर्थाने समृद्ध झाला. तर देशाचे पहिले सहकार मंत्री म्हणून अमित शाह यांनी  साखर कारखान्यांना प्राप्तिकर रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. म्हणून सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील या सहकार चळवळीसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या पिता पुत्रांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण देशाचे पहिले सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणे हा दुग्ध शर्करा योग आहे.  सहकाराच्या प्रवासाला एक नवीन दिशा देणारा हा एक महत्वाचा क्षण आहेसहकारच्या शतकातले एक सुवर्णपान आहे.

लोणी - प्रवरानगर देशातील ग्रामीण विकासाचे मॉडेल-

 लोणी - प्रवरानगर देशातील ग्रामीण विकासाचे मॉडेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणालेलोणी-प्रवरानगर परिसरातून महाराष्ट्रातला नाही तर देशाला सहकाराचा वारसा मिळाला. शेतकरी संघटित होऊन आणि एकजुटीने क्रांती घडवू शकतो हे या भूमीने दाखवून दिले. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी लोणीला पहिला सहकार क्षेत्रातील साखर कारखाना उभारून सहकाराची क्रांती घडवून आणली.शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळावात्यांच्या पिकाला चांगला भाव मिळाला पाहिजेत्यांची मुलं शिक्षण घेऊन पुढे जावेत म्हणून विठ्ठलरावांनी संपूर्ण आयुष्य वेचलं आणि त्यांचा हाच वारसा लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांनी जीवापाड जपला. त्यांनी सहकारशेतीपुरते कार्य मर्यादित न ठेवता प्रवरा मेडिकल कॉलेजप्रवरा को-ऑपरेटिव्ह बँकशैक्षणिक संस्था कृषी व आरोग्य प्रकल्प यांच्या माध्यमातून संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यालाच खऱ्या अर्थाने नवसंजीवनी दिली आहे. त्यानंतरही पुढील पिढीने हे कार्य पुढे नेल्याने आज लोणी-प्रवरानगर देशातील ग्रामीण विकासाचे मॉडेल म्हणून ओळखले जाते.

सहकारमंत्री श्री. शाह यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्राची वेगाने वाटचाल सुरू आहे.  जुन्या परंपरा आणि नवतंत्रज्ञाननवसंशोधन याची सांगड घालण्याचा प्रयत्न होतं आहे. साखर उद्योगांमध्ये पारदर्शकता आणण्यासोबत  इथेनॉल उत्पादनाला चालना देण्यात आली आहे.  त्याचा लाभ शेतकऱ्याला मिळाला पाहिजे असे केंद्राचे प्रयत्न आहेत. सहकाराच्या माध्यमातून देश आत्मनिर्भर होईलमहाराष्ट्र

आत्मनिर्भर होईल यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे असे आवाहन त्यांनी केले. अतिवृष्टी आणि पुरामुळे संकटात आलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारतर्फे मदत मिळेल असा विश्वास श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

नदीजोड प्रकल्पाद्वारे राज्याचा दुष्काळ दूर करणार

 नदीजोड प्रकल्पाद्वारे राज्याचा दुष्काळ दूर करणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 


मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी महाराष्ट्रात सहकाराची चळवळ रुजवली आणि आणि माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी जल नियोजनाच्या संदर्भात महाराष्ट्रात जागृती घडवून आणली. या दोघांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण हे 'पद्मस्मरण' आहे असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना असलेल्या प्रवरानगर येथील सहकारी साखर कारखान्याने १० हजार टीपीडीपर्यंत आता मजल मारली आहे. ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.


महाराष्ट्र सहकाराची पंढरी आहे. या क्षेत्राच्या विकासाचे श्रेय डॉ.विठ्ठलराव विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता यांना जाते. त्यांनी सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे उभा राहिला. महाराष्ट्रामध्ये ज्या-ज्या भागात सहकार चळवळ पोहोचली, सहकारी साखर कारखाने पोहोचले, तिथला शेतकरी समाधानी झाला आणि त्या ठिकाणचे औद्योगीकरणदेखील चांगल्याप्रकारे झाले, इथला शेतकरी संपन्न झाला.


 पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी सहकार चळवळ पुढे नेण्यासोबत जलसंवर्धन चळवळ महाराष्ट्रात रुजविण्याचे कार्य केले. राज्य शासनाने त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबविण्याचा आणि त्यातून राज्यातील दुष्काळ दूर करण्याचा निश्चय केला आहे. विदर्भामध्ये वैनगंगा - नळगंगा, तापीच्या खोऱ्यामध्ये पाणी आणायचं काम, उल्हास खोऱ्यातले समुद्रात वाहून जाणारे ५४ टीएमसी पाणी उचलून गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून आणि गोदावरीच्या खोऱ्यातला दुष्काळ दूर करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. पुढच्या पाच ते सात वर्षात टप्प्या टप्प्यानं हे संपूर्ण पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणल्यानंतर नाशिक, अहिल्यानगर परिसर आणि मराठवाड्याचा दुष्काळ भूतकाळ असेल असे कार्य राज्य शासन करेल, असे मुख्यमंत्री विश्वासाने म्हणाले.

दीनदयालजीप्रतिष्ठान ने पारधी समाज के लिए भी शिक्षा, स्वास्थ्य और रोजगार

 मुख्यमंत्री फडणवीस ने बताया कि प्रतिष्ठान ने दीनदयालजी के विचारों पर आधारित प्राकृतिक खेती का आदर्श मॉडल विकसित किया है। इसका उद्देश्य रासायनिक खाद और कीटनाशकों का उपयोग घटाकर लागत कम करना और मिट्टी की उर्वरता बढ़ाना है। राज्य में 25 लाख हेक्टेयर भूमि को प्राकृतिक खेती के दायरे में लाने का लक्ष्य रखा गया हैजिसमें से 13 लाख हेक्टेयर पर काम हो चुका है। साथ ही नानाजी देशमुख कृषि समृद्धि योजना और प्राथमिक सोसायटियों को बहुउद्देशीय संस्था बनाने का कार्य चल रहा है। महिलाओं को आत्मनिर्भर बनाने के लिए लखपति दीदी योजना’ शुरू की गई हैजिसके माध्यम से महाराष्ट्र की एक करोड़ महिलाओं को लखपति बनाने का लक्ष्य है।

प्रतिष्ठान ने पारधी समाज के लिए भी शिक्षास्वास्थ्य और रोजगार के क्षेत्र में उल्लेखनीय कार्य किया हैजिससे इस समाज की तस्वीर बदली है। मुख्यमंत्री फडणवीस ने कहापंडित दीनदयाल ने समाजकार्य किसी पुरस्कार के लिए नहीं किया। उनके विचार अमर हैं। उनकी हत्या हुईलेकिन उनके विचार और तेज़ी से फैल गए। आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उन्हीं विचारों को संपूर्ण विश्व के सामने प्रस्तुत कर रहे हैं।

कार्यक्रम की शुरुआत में मुख्यमंत्री फडणवीस ने पंडित दीनदयाल उपाध्याय स्मारक पर जाकर उनकी प्रतिमा पर पुष्पांजलि और खादी की माला अर्पित कर श्रद्धांजलि दी। इस अवसर पर मूर्तिकार सुजीत गौड़ और उनकी पत्नी स्वाति गौड़ का सम्मान किया गया।

परियोजनाओं का निरीक्षण

मुख्य समारोह के पूर्व मुख्यमंत्री फडणवीस ने दीनदयाल सेवा प्रतिष्ठान परिसर में संचालित परियोजनाओं का निरीक्षण किया। इनमें प्रशिक्षण प्रबोधिनीशबरी अतिथि गृहआवासीय परिसरछात्र प्रशिक्षण कक्षकृषि अनुसंधान एवं प्रशिक्षण केंद्र शामिल हैं। उन्होंने प्रवेशद्वार पर स्थित पंडित दीनदयाल उपाध्याय की प्रतिमा पर माल्यार्पण किया और उनके जीवन पर आधारित प्रदर्शनी भी देखी। इस अवसर पर आवासीय परिसर में मुख्यमंत्री फडणवीस ने वृक्षारोपण भी किया।

0000

पंडित दीनदयाल सेवा प्रतिष्ठान – एकात्म मानव दर्शन और अंत्योदय का प्रतीक

 पंडित दीनदयाल सेवा प्रतिष्ठान – एकात्म मानव दर्शन और अंत्योदय का प्रतीक

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती समारोह सम्पन्न
  • मुख्यमंत्री ने दीनदयाल सेवा प्रतिष्ठान की परियोजनाओं का किया निरीक्षण

 

यवतमाल29 सितम्बर (जिमाका): समाज के ग़रीबवंचित और दुर्बल वर्ग को मुख्यधारा में लाकर उनके सर्वांगीण विकास हेतु पंडित दीनदयाल उपाध्याय ने अपना संपूर्ण जीवन समर्पित किया। उनके एकात्म मानव दर्शन और अंत्योदय के संदेश को जन-जन तक पहुँचाने का प्रतीक पंडित दीनदयाल सेवा प्रतिष्ठान हैऐसा गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने व्यक्त किया।

मुख्यमंत्री फडणवीस ने यवतमाल में दीनदयाल सेवा प्रतिष्ठान द्वारा आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती समारोह का उद्घाटन किया और उपस्थित जनसमूह को संबोधित किया। इस अवसर पर मृदा एवं जलसंवर्धन मंत्री तथा जिले के पालकमंत्री संजय राठोड़आदिवासी विकास मंत्री प्रो. डॉ. अशोक वुइकेराष्ट्रीय पिछड़ा वर्ग आयोग के अध्यक्ष हंसराज अहीरपूर्व विधायक मदन येरावारप्रतिष्ठान के अध्यक्ष नरहर देवपदाधिकारी ज्योति चव्हाणडॉ. मनोज पांडेविजय कद्रेमनीष गंजीवालेगजानन परसोडकर सहित अन्य मान्यवर उपस्थित थे।

मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि यवतमाल में करीब 25 वर्ष पूर्व प्रारंभ हुई यह संस्था आज एक विशाल वटवृक्ष के समान विकसित हो चुकी है। आत्महत्या-पीड़ित किसानों के परिवारों की महिलाओं और पिछड़े पारधी समाज को यह संस्था सहारा दे रही है। पंडित दीनदयाल के एकात्म मानव दर्शन और अंत्योदय विचारों पर आधारित यह एक जीवंत सामाजिक परिवर्तन का उदाहरण है।

मुख्यमंत्री फडणवीस ने दीनदयाल उपाध्याय के जीवन के कई पहलुओं पर प्रकाश डालते हुए कहा कि उन्होंने कठिन परिस्थितियों में भी शिक्षा पूरी की। सरकारी नौकरी का अवसर होने के बावजूद उन्होंने समाज सेवा का मार्ग चुना। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ से जुड़ने के बाद वे पूर्णकालिक कार्यकर्ता बने। जनसंघ की स्थापना के बाद उन्होंने प्रदेश अध्यक्षअखिल भारतीय महामंत्री और राष्ट्रीय अध्यक्ष जैसे बड़े पदों की जिम्मेदारी संभालीफिर भी वे सादगी और त्यागपूर्ण जीवन जीते रहे।

उन्होंने बताया कि उस समय विश्व में पूँजीवाद और साम्यवाद का बोलबाला थालेकिन दीनदयालजी ने एक तीसरा मार्ग प्रस्तुत किया। उन्होंने कहा कि भारतीय जीवन पद्धति में ही सामाजिक व आर्थिक परिवर्तन का उत्तर निहित है। एकात्म मानव दर्शन का मूल तत्व अंत्योदय हैयानी समाज के अंतिम व्यक्ति के विकास से ही राष्ट्र का विकास संभव है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भी इसी विचारधारा पर कार्य कर रहे हैं। उन्होंने ग़रीबों के लिए घरशौचालयगैसबिजली और रोज़गार जैसी योजनाएँ शुरू कींजिससे पिछले 10 वर्षों में 25 करोड़ लोग गरीबी से बाहर आए और भारत 11वें स्थान से चौथी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बन गया।

मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम

 काळानुरूप बदलते अभ्यासक्रम

मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रमांतर्गत विविध नवयुगीन व पारंपरिक रोजगाराभिमुख अल्पकालीन व्यवसाय अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत. यामध्ये  अ‍ॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगएरोस्पेस स्ट्रक्चर फिटरइंटरनेट ऑफ थिंग्जइलेक्ट्रिक व्हेईकलसोलर एनर्जीड्रोन तंत्रज्ञानसोशल मीडिया इन्फ्लुएंसरसायबर सुरक्षाआर्टिफिशियल इंटेलिजंसग्रीन हायड्रोजनमोबाईल रिपेअर टेक्निशियन इत्यादी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

अभ्यासक्रमासाठी पात्रता

      या अभ्यासक्रमांसाठी आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेत असलेले व आय.टी.आय.पूर्ण केलेले विद्यार्थीउच्च व तंत्र शिक्षणातील पदविका,पदवी व इयत्ता १० वी व १२ वी शिक्षण घेत असलेले व पूर्ण केलेले विद्यार्थी यांचा समावेश असेल. शासनाच्या ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व १४१ शासकीय तांत्रिक विद्यालयामध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

अभ्यासक्रमासाठी नोंदणी करा

            सवलतीच्या शुल्कात चालविल्या जाणाऱ्या या रोजगाराभिमुख अल्पकालीन व्यवसाय अभ्यासक्रमासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर  नोंदणी करावी. अधिक महिती व प्रवेश नोंदणीसाठी  जवळच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा  शासकीय तांत्रिक विद्यालयाला संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये

          उदयोन्मुख क्षेत्रातील अभ्यासक्रमांमध्ये महिला उमेदवारांसाठी समर्पित ३६४ बॅचेस. इलेक्ट्रिक व्हेईकल, सोलर एनर्जी, ग्रीन हायड्रोजन उत्पादन, एआयइंटरनेट ऑफ थिंग्जसारख्या व्यवसाय अभ्यासक्रमाच्या ४०८ बॅचेस आहेत. आगामी कुंभमेळ्यासाठी "वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट" ट्रेडच्या दोन तुकड्या असतील. गडचिरोली औ. प्र संस्था मध्ये ट्रॅक्टर सर्व्हिस मेकॅनिकचा व्यवसाय अभ्यासक्रम. हरंगुल लातूर येथील संवेदना दिव्यांग खासगी आयटीआय येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गृह उपकरणेटॅली आणि फॅशन तंत्रज्ञानाचे विशेष अभ्यासक्रम. वाढवण बंदरासाठी प्रशिक्षित ड्रायव्हर उपलब्ध  करून देणारे प्रशिक्षणग्रीन हायड्रोजन प्रॉडक्शन व्यवसायाकरिता आठ तुकड्या, आयटीआय दादर (मुलींची) येथे सेमीकंडक्टर टेक्निशियन व्यवसाय सुरू होणार आहेत. महाराष्ट्र इंटरनॅशनल सेंटर, गोंवडी आयटीआय येथे व शासकीय टेक्निकल हायस्कूल अमरावती व नागपूर येथे ॲडव्हान्स वेल्डिंगअ‍ॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग ॲण्ड ॲडव्हान्स सीएनसीइंटरनेट ऑफ थींग्ज  हे अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत.

००००

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तांत्रिकप्रवेश प्रक्रियेसाठी कार्यपद्धती निश्चित

 प्रवेश प्रक्रियेसाठी कार्यपद्धती निश्चित

           राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तांत्रिक विद्यालय केंद्रांमध्ये पायाभूत सुविधांचा  उपयोग करून संस्थेच्या वेळे व्यतिरिक्त वेळेत मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या अनुषंगाने प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली असून ऑनलाईन प्रवेश प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. अल्पमुदत अभ्यासक्रमांमध्ये २५ टक्के जागा संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या असून उर्वरित जागा बाह्य उमेदवारांना उपलब्ध असतील. प्रशिक्षण शुल्क रु. १००० ते ५,००० प्रति महिना इतके आकारण्यात येईल. शासनाच्या ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व १४१ शासकीय तांत्रिक विद्यालयामध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Featured post

Lakshvedhi