Thursday, 18 September 2025

मुंबई शहर जिल्ह्यात सेवा पंधरवड्याचा शुभारंभ. ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये

 मुंबई शहर जिल्ह्यात सेवा पंधरवड्याचा शुभारंभ

 

मुंबई, दि. १७  : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दि. १७ सप्टेंबर २०२५ ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि. ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. सदर सेवा पंधरवड्याचा शुभारंभ जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या उपस्थितीत कुलाबा विधानसभा निवडणूक मध्यवर्ती कार्यालय येथे झाला.

 

या कार्यक्रमात जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी उपस्थित नागरिकांना महाऑनलाईन पोर्टलद्वारे प्रमाणपत्राकरिता अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले. या विशेष शिबिरामध्ये नागरिकांकडून आधार विषयक सेवाविविध दाखल्यांचे अर्ज स्वीकारण्यात आले तसेच काही लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

 

नागरिकांनी शासनाच्या अधिकृत वेबसाईटफेसबुक पेजअधिकृत चॅनेलला फॉलो करून शासनाच्या सेवांबाबत माहिती घेण्याचे तसेच सेवा पंधरवड्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवून शासनाच्या विविध सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले

 

कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी गणेश सांगळेतहसिलदार संदिप आवारीतहसिलदार अश्विनकुमार पोतदारजिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते जिल्ह्यात फिरत्या सेतू केंद्राचा शुभारंभ

  

पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते

जिल्ह्यात फिरत्या सेतू केंद्राचा शुभारंभ

 

मुंबईदि. 17 : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर2025 या कालावधीत सेवा पंधरवडा अभियानाअंतर्गत मंत्रीमाहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री ॲड. आशिष शेलारयांच्या हस्ते आधार संच वितरण व नागरिकांना घरपोच सेवा देण्याकरिता फिरते सेतू केंद्र (MOBILE SETU) चा शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार म्हणालेया अभियानांतर्गत बोरीवलीकुर्ला व अंधेरी या तहसील कार्यालयातील सुविधा केंद्र अद्ययावत व आधुनिक करण्यात येत आहेत. तसेच जिल्ह्यात नव्याने वार्डनिहाय 374 आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यात येत आहेत. नागरिकांना तत्काळ सेवा मिळण्याकरिता प्रथमच जिल्ह्यात फिरते सेतू केंद्र व आधार केंद्र बळकट करण्याकरिता आधार नोंदी संच वितरित करण्यात येत आहेत. तसेच नागरिकांना तात्काळ सेवेचा लाभ उपलब्ध करुन देण्याकरिता सर्व दाखले WhatsApp वर उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

रसास्वाद मंडळाचे सदस्य होण्याचे आवाहन

 रसास्वाद मंडळाचे सदस्य होण्याचे आवाहन

महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचे सदस्य होण्यासाठी सदस्यत्व शुल्क म्हणून त्रैवार्षिक पाचशे रुपये आकारण्यात येणार आहे. या अत्यल्प शुल्कामध्ये महाराष्ट्रातील सर्व रसिकांना चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे. 

 

हे सदस्यत्व तीन वर्षासाठी असणार आहे. यामध्ये सदस्यांना किमान महिन्याला एक चित्रपट मंडळामार्फत विनामूल्य दाखवण्यात येईल. महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये प्राधान्याने प्रवेश दिला जाईल. त्याचबरोबर पहिल्या ७५ भाग्यवान सदस्यांना वन टाईम एन.डी. स्टुडिओची विनामूल्य टूर आणि दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या भ्रमंती शुल्कामध्ये वन टाइम ५० टक्के सूट देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ९७०२२७०८२१ यावर संपर्क साधता येईल.

फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचे उद्घाटन

  फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचे उद्घाटन

 

मुंबईदि. १७ : मराठी मनोरंजन क्षेत्रात निर्माण झालेल्या दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी महाराष्ट्र चित्रपटरंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले.

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघु सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास महाराष्ट्र चित्रपटरंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटीलसह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकरपु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकरज्येष्ठ चित्रपट समीक्षक अशोक राणेजेष्ठ लेखक दीपक करंजीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

उत्तम निर्मिती मूल्य आणि दिग्दर्शन असलेले अनेक चित्रपट आपण आई-वडिलांसोबत पाहिलेले आहेत. या चित्रपटांनी संस्कार आणि राष्ट्र निर्मितीची भावना जागृत केली आहे. मराठी माणसांसाठी असे ऐतिहासिक मूल्य असलेले चित्रपट पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. प्रगतीत गती असतेपरंतु प्रगतीच्या वेगात सांस्कृतिकसंवेदनशील आणि सकारात्मक समाजाच्या निर्मितीकडे दुर्लक्ष होता कामा नयेहे लक्षात घेऊनच कलासाहित्यसंस्कृती नाटकचित्रपट आदि क्षेत्रात शासन भरीव काम करत असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री मंत्री ॲड.शेलार यांनी यावेळी नमूद केले.

महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी प्रास्तविक केले. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यांनी स्वागत केले. यावेळी प्रभात निर्मित संत तुकाराम या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. त्याला रसिकानी उत्तम प्रतिसाद दिला. त्याच बरोबर दीपक करंजीकर यांचे व्याख्यानही संपन्न झाले. 

डॅशबोर्डचे उद्घाटन आणि बीड शहर पोलीस स्टेशनचे व 241 पोलीस निवासस्थानाचे उद्घाटन

 डॅशबोर्डचे उद्घाटन आणि बीड शहर पोलीस स्टेशनचे व 241 पोलीस निवासस्थानाचे उद्घाटन

प्रारंभी मंचावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डॅशबोर्डचे उद्घाटन आणि बीड शहर पोलीस स्टेशनचे व 241 पोलीस निवासस्थानाचे उद्घाटन ऑनलाईन पध्दतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


राष्ट्रीय महामार्गासाठी सुमारे 10 हजार कोटी रुपये निधी

 राष्ट्रीय महामार्गासाठी सुमारे 10 हजार कोटी रुपये निधी


मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, बीड येथे रेल्वेसाठी सर्व लोकप्रतिनीधीनी पुढाकार घेतला. रेल्वे ही नागरिकांच्या उन्नतीसाठी असणे आवश्यक आहे. विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे यांनी मराठवाड्यात रेल्वे आली पाहिजे यासाठी पुढाकार घेतला. बीड जिल्हा कष्टकऱ्यांचा आणि स्वाभिमानी लोकांचा आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी सुमारे 10 हजार कोटी रुपये निधी दिला. बीडला रेल्वे यावी यासाठी अनेकांनी आपले योगदान दिले आहे.


खासदार रजनी पाटील, खासदार बजरंग सोनवणे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मिणा यांनी केले.

राष्ट्रीय महामार्गासाठी सुमारे 10 हजार कोटी रुपये निधी

 राष्ट्रीय महामार्गासाठी सुमारे 10 हजार कोटी रुपये निधी

मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या कीबीड येथे रेल्वेसाठी सर्व लोकप्रतिनीधीनी पुढाकार घेतला. रेल्वे ही नागरिकांच्या उन्नतीसाठी असणे आवश्यक आहे. विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे यांनी मराठवाड्यात रेल्वे आली पाहिजे यासाठी पुढाकार घेतला. बीड जिल्हा कष्टकऱ्यांचा आणि स्वाभिमानी लोकांचा आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी सुमारे 10 हजार कोटी रुपये निधी दिला. बीडला रेल्वे यावी यासाठी अनेकांनी आपले योगदान दिले आहे.

खासदार रजनी पाटीलखासदार बजरंग सोनवणे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मिणा यांनी केले.

Featured post

Lakshvedhi