पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते
जिल्ह्यात फिरत्या सेतू केंद्राचा शुभारंभ
मुंबई, दि. 17 : “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत” प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर, 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर, 2025 या कालावधीत “सेवा पंधरवडा” अभियानाअंतर्गत मंत्री, माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, यांच्या हस्ते आधार संच वितरण व नागरिकांना घरपोच सेवा देण्याकरिता “फिरते सेतू केंद्र” (MOBILE SETU) चा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार म्हणाले, या अभियानांतर्गत बोरीवली, कुर्ला व अंधेरी या तहसील कार्यालयातील सुविधा केंद्र अद्ययावत व आधुनिक करण्यात येत आहेत. तसेच जिल्ह्यात नव्याने वार्डनिहाय 374 आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्यात येत आहेत. नागरिकांना तत्काळ सेवा मिळण्याकरिता प्रथमच जिल्ह्यात “फिरते सेतू केंद्र” व आधार केंद्र बळकट करण्याकरिता आधार नोंदी संच वितरित करण्यात येत आहेत. तसेच नागरिकांना तात्काळ सेवेचा लाभ उपलब्ध करुन देण्याकरिता सर्व दाखले “WhatsApp” वर उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment