Thursday, 18 September 2025

राष्ट्रीय पोषण माह’ च्या माध्यमातून – कुपोषणमुक्त महाराष्ट्र घडवूया

 राष्ट्रीय पोषण माह’ च्या माध्यमातून – कुपोषणमुक्त महाराष्ट्र घडवूया

- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

जिल्हा व राज्यस्तरीय उत्कृष्ट  सेविकामदतनीस व अंगणवाडी पुरस्काराची घोषणा

 

मुंबई, दि. १७ : मुंबईसह राज्यात कुपोषण कमी करण्यास अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे योगदान मोलाचे असूनसुपोषित भारतासह कुपोषणमुक्त महाराष्ट्र घडविण्याची संधी आपल्याला लाभली आहेअसे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आठव्या राष्ट्रीय पोषण माह अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ   महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते व सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारेउपायुक्त श्रीमती संगीता लोंढेउपायुक्त विजय क्षीरसागर यांच्यासह अधिकारीपर्यवेक्षकमुख्य सेविकासेविकामदतनीस हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बाळाचे पहिले सुवर्णमयी १००० दिवस या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेचनवनियुक्त मदतनीस व सेविका यांना नियुक्तीपत्रही प्रदान करण्यात आले. राज्यातील सर्व अंगणवाडीमध्ये १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या कालावधीत आठवा राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यात येणार आहे.

राज्यात विविध ठिकाणी जाऊन जनमताचा कानोसा घेण्यासाठी समितीच्या सर्व सदस्यांसह

 राज्यात विविध ठिकाणी जाऊन जनमताचा कानोसा घेण्यासाठी समितीच्या सर्व सदस्यांसह संभाजीनगर (8 ऑक्टोबर)नागपूर (10 ऑक्टोबर)कोल्हापूर (30 ऑक्टोबर)रत्नागिरी (31 ऑक्टोबर)नाशिक (11 नोव्हेंबर)पुणे (13 नोव्हेंबर)सोलापूर (21 नोव्हेंबर) आणि नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत भेट देणार असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले. यावेळी ज्यांना या विषयाबाबत आपले म्हणणे मांडायचे असेल अशा सर्वांकडून समिती त्यांच्या भावना समजून घेईल.

इतर राज्यात त्रिभाषा सूत्रांची कशी अंमलबजावणी सुरू आहेत्याचीही समिती माहिती घेणार आहे. तथापिराज्यात सर्वांशी चर्चा केल्यानंतर समिती 5 डिसेंबर पर्यंत आपला अहवाल शासनास सादर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील दोन कोटी 12 लाख विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने उत्तमोत्तम अहवाल तयार करण्याचा समितीचा प्रामाणिक प्रयत्न असेल असे त्यांनी यावेळी नमूद केले.

त्रिभाषा सूत्रासाठी येत्या 15 दिवसात संकेतस्थळ तयार केले जाणार असून त्यात एक लिंक तयार

 डॉ.नरेंद्र जाधव म्हणालेत्रिभाषा सूत्रासाठी येत्या 15 दिवसात संकेतस्थळ तयार केले जाणार असून त्यात एक लिंक तयार केली जाईल ज्यावर सर्वसामान्य नागरिकपालकविद्यार्थी अशा सर्वांना त्यांची मते मांडता येतीलअध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर या विषयाशी संबंधित माहिती जमा करण्यात आली. आजच्या बैठकीत सदस्यांना ती उपलब्ध करुन देण्यात आली असून पुढील बैठकीत त्यावर चर्चा करण्यात येईल. येत्या काही दिवसात दोन प्रकारच्या प्रश्नावली तयार केल्या जाणार असून एक प्रश्नावली सर्वांसाठी असेल तर दुसरी प्रश्नावली मराठी भाषा विषयाशी संबंधित विविध संस्थांसाठी असेल. या प्रश्नावलीच्या लिंकवर जाऊन कोणालाही त्याची उत्तरे देता येतील. ही प्रश्नावली सर्व शाळामहाविद्यालयेलोकप्रतिनिधीपालक आदींना पाठविली जाईल. या विषयाशी संबंधित व्यक्त झालेल्या विविध राजकीय नेत्यांची येत्या 15 दिवसांत प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची भूमिका देखील समजून घेणार असल्याचे डॉ.जाधव यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने

 राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या समितीची पहिली बैठक झाली. या बैठकीनंतर डॉ.नरेंद्र जाधव यांनी मंत्रालयात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादवशालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजनमहाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प समन्वयक गोविंद कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.

त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेऊन विद्यार्थी हिताच्या दृष्टीने उत्तमोत्तम शिफारस करणार

  

त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेऊन

विद्यार्थी हिताच्या दृष्टीने उत्तमोत्तम शिफारस करणार

-समिती अध्यक्ष डॉ.नरेंद्र जाधव

 

मुंबईदि. 17 : महाराष्ट्र हे देशातील अग्रेसर राज्य आहे. इतर राज्ये महाराष्ट्राचे अनुकरण करतात. त्यामुळे त्रिभाषा धोरण लागू करण्याबाबत, राज्यातील एक लाख आठ हजार शाळांमधील दोन कोटी 12 लाख विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने, जनमनाचा कानोसा घेऊन उत्तमोत्तम अहवाल तयार करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी गठित समितीचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र जाधव यांनी सांगितले. 

 राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या समितीची पहिली बैठक झाली. या बैठकीनंतर डॉ.नरेंद्र जाधव यांनी मंत्रालयात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादवशालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजनमहाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प समन्वयक गोविंद कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.

७५ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य शिबिर घेण्यात

 या अभियानाच्या निमित्ताने ७५ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य शिबिर घेण्यात येत आहे. यात संसर्गजन्य रोग तपासणी, मधुमेहरक्तदाबकर्करोग आणि हृदयाचे रोग तपासण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मोफत चष्मा वाटपाची सुद्धा ७५ शिबिरे आयोजित करण्यात येत असून लोकांना त्याचा लाभ मिळत आहे.  त्याचबरोबर ७५ दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  माता आणि बाल आरोग्याची ७५ शिबिरे घेण्यात येत असून यात प्रसूतीपूर्व तपासणी करण्यात येईल. महिला व बाल कल्याण विभागामार्फत महिला तसेच बालकांसाठी पोषण जाणीवाची ७५ सत्रे घेण्यात येत असून आयुष आणि योग शिबिराची सुद्धा ७५ सत्रे घेण्यात येत आहेत. त्याचबरोबररक्तदानअवयवदानमोफत औषध वितरणवेगवेगळ्या रोगांचे निदान शिबिरेकर्करोग जागृतीतपासणी शिबिरमानसिक आरोग्य आणि समुपदेशन शिबिरे, अशी ७५ वेगवेगळी शिबिरे घेतली जात असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाच्या माध्यमातून महिलांची

 सार्वजनिक आरोग्यमंत्री श्री. आबिटकर म्हणाले कीस्वस्थ नारीसशक्त परिवार’ अभियानाच्या माध्यमातून महिलांची तपासणीउच्च रक्तदाबमधुमेह, गर्भाशयाच्या कर्करोगाची आणि क्षयरोगाची तपासणी केली जाईलविशेषतः किशोरवयीन मुली आणि महिलांसाठीॲनिमिया तपासणी आणि समुपदेशनाचे कामसुद्धा केले जाणार आहे. आदिवासी भागातील महिलांसाठी सिकलसेल तपासणीकार्ड वाटप आणि समुपदेशनगर्भवती महिलांसाठी प्रसूतीपूर्व काळजी आणि तपासणी असे अनेक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Featured post

Lakshvedhi