Thursday, 18 September 2025

त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेऊन विद्यार्थी हिताच्या दृष्टीने उत्तमोत्तम शिफारस करणार

  

त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेऊन

विद्यार्थी हिताच्या दृष्टीने उत्तमोत्तम शिफारस करणार

-समिती अध्यक्ष डॉ.नरेंद्र जाधव

 

मुंबईदि. 17 : महाराष्ट्र हे देशातील अग्रेसर राज्य आहे. इतर राज्ये महाराष्ट्राचे अनुकरण करतात. त्यामुळे त्रिभाषा धोरण लागू करण्याबाबत, राज्यातील एक लाख आठ हजार शाळांमधील दोन कोटी 12 लाख विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने, जनमनाचा कानोसा घेऊन उत्तमोत्तम अहवाल तयार करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी गठित समितीचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र जाधव यांनी सांगितले. 

 राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या समितीची पहिली बैठक झाली. या बैठकीनंतर डॉ.नरेंद्र जाधव यांनी मंत्रालयात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादवशालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजनमहाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प समन्वयक गोविंद कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi