Thursday, 18 September 2025

बीड जिल्ह्याच्या विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही.

 विकास करत असतांना त्यातून मार्ग काढावा लागतोअसे सांगून श्री. पवार म्हणालेबीड जिल्ह्याच्या विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही. मोठ्या शहरातील रस्तेमेट्रोविमानतळ यासारख्या प्रकल्पाकडे लक्ष देत असतांना आमच्या ग्रामीण भागाचासुध्दा विकास झाला पाहिजे या दृष्टीने ग्रामीण भागातही रस्तेदळणवळणासारख्या पायाभुत सुविधांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. या रेल्वेच्या माध्यमातून मराठवाड्याच्या विकासाचासमृध्दीचा नवा अध्याय लिहिला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजचा दिवस मराठवाड्याच्या रेल्वेच्या इतिहासातील स्वर्णीम दिवस आहे. बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. 

बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय

 बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री श्री. पवार यावेळी म्हणाले कीआता जनतेचे प्रश्न सोडवायाचे आहेत. 30 ते 35 वर्षानी रेल्वेचे हे काम झाले आहे. या कामासाठी विलंब झाला आहे. यासाठी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. पुर्वीचा काळ व आजचा काळ यामध्ये मोठा फरक आहे. आज कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर होत आहे. ही रेल्वे पुणे आणि पुढे मुंबई पर्यंत घेऊन जाण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातील कोणतीही विकास कामे अडणार नाहीत याकडे लक्ष देण्यात येईल. रेल्वेचे स्वप्न पूर्ण झाले असून आता विमानतळाकडे लक्ष आहे. जिल्ह्यात उद्योगपती आल्यास उद्योग स्थापन करुन रोजगार उपलब्ध होतील. बीडमधील गोरगरिबांना उपचारासाठी मुंबई-पुण्याला जाण्याची आवश्यकता पडणार नाही. यासाठी येथेच आरोग्याच्या चांगल्या सुविधा निर्माण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले

मराठवाड्यातील दुष्काळ संपवण्यासाठी वचनबद्ध

 मराठवाड्यातील दुष्काळ संपवण्यासाठी वचनबद्ध

मराठवाडा मुक्ती दिन आणि रेल्वे प्रकल्पाचा आनंद दुहेरी असल्याचे सांगताना मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, "गेल्या दहा वर्षांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मराठवाड्यासाठी रेल्वे प्रकल्पांना तब्बल 21 हजार कोटी रुपये दिले. ज्यामुळे विकासाच्या दिशा खुल्या झाल्या. शासनमराठवाड्यातील दुष्काळ संपवण्यासाठी वचनबद्ध असूनपाण्याचे जाळे निर्माण करण्यासाठी कृष्णा व उल्हास खोऱ्यातील पाणी आणण्याचे मोठे प्रकल्प राबवले जातील." असेही त्यांनी सांगितले.

बीडमध्ये रेल्वे सुरू होणे म्हणजे फक्तश्रेयवादाचा नसून आनंदाचा

 आजचा दिवस श्रेयवादाचा नसून आनंदाचा

रेल्वे संघर्ष समितीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आज हा दिवस शक्य झाल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले,  "हा दिवस श्रेयवादाचा नसून आनंदाचा आहे. बीडमध्ये रेल्वे सुरू होणे म्हणजे फक्त गाडी पोहोचणे नव्हे तर विकासाची वाहिनी पोहोचणे आहे. सन 2014 नंतर या प्रकल्पाला गती दिली. केंद्र व राज्याने 50 टक्के हिस्सा देत प्रकल्प पूर्णत्वाकडे नेला. रेल्वेचे विद्युतीकरणही लवकरच पूर्ण होईल आणि यामुळे प्रवास अधिक सोयीस्कर आणि वेगाने होईल." असे त्यांनी सांगितले.

बीडच्या जनतेच्या स्वप्नपूर्तीचा ऐतिहासिक दिवस-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमळनेर (भां) ते बीड नवीन रेल्वे मार्गाचे उद्घाटन आणि बीड ते अहिल्यानगर रेल्वेचा शुभारंभ

 बीडच्या जनतेच्या स्वप्नपूर्तीचा ऐतिहासिक दिवस-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमळनेर (भां) ते बीड नवीन रेल्वे मार्गाचे उद्घाटन आणि बीड ते अहिल्यानगर रेल्वेचा शुभारंभ

 

            बीड,दि.17 (जिमाका) : अनेक दशकांपासून बीडच्या जनतेने प्रतीक्षा केलेली रेल्वे आज बीड येथून सुरू झाली असूनबीडकरांना ऐतिहासिक भेट देत रेल्वेचे स्वप्न पूर्ण झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवंगत गोपीनाथराव मुंडेकेशरकाकू क्षीरसागर यांचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी सांगितले.

अमळनेर (भां) ते बीड नवीन रेल्वे मार्गाचे उद्घाटन आणि बीड ते अहिल्यानगर रेल्वेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून केला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारपर्यावरण व वातावरणीय बदलपशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेखासदार रजनी पाटीलखासदार बजरंग सोनवणेआमदार सर्वश्री विक्रम काळेधनंजय मुंडेविजयसिंह पंडितआमदार श्रीमती नमिता मुंदडाविभागीय आयुक्त जितेंद्र पापळकरजिल्हाधिकारी विवेक जॉन्सनजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमानपोलीस अधीक्षक नवनीत काँवतमध्य रेल्वे महाप्रबंधक धर्मवीर मीणाविभागीय रेल्वे प्रबंधक राजेशकुमार वर्मा आदी उपस्थित होते.

एम -सँड' धोरणाबाबत परिसंवादाचे आयोजन

 'एम -सँडधोरणाबाबत परिसंवादाचे आयोजन

कार्यक्रमापूर्वी राज्याच्या 'एम -सँडधोरणाबाबत परिसंवाद आयोजित करण्यात आला. यात  'एम -सँडधोरणाबाबत खाण उद्योजकबांधकाम व्यावसायिकजमीन मालक आदींनी व्यक्त केलेल्या शंकांना उत्तरे देण्यात आली. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपले 'खनीकर्म आराखडाआणि 'खनीकर्म झोनघोषित करावेत. खाणपट्ट्यांना ना-हरकत देण्याची कार्यपद्धती सुलभ करावी. बांधकाम व्यावसायिकांना बांधकामसाठीच्या उत्खननातून निघालेल्या गौणखनिजाच्या रिसायकलिंगसाठी ना हरकत कालावधी 'रेरापरवानगीशी सुसंगत करावाआदी निर्देश यावेळी महसूलमंत्र्यांनी दिले. ड्राय सँड बाबतही आगामी काळात धोरण आणले जाईल असेही ते म्हणाले.

महसूल विभागाच्या विविध उपक्रमांचे उद्घाटन

 महसूल विभागाच्या विविध उपक्रमांचे उद्घाटन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विविध योजनांचे लाभ वितरण करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील दहा नाविन्यपूर्ण प्रकल्पपाणंद रस्त्यासाठी ई-ग्रामजीआयएस प्रणालीजमाबंदी आयुक्त यांचेकडील जमीन माहितीपीठ’ डॅशबोर्ड आणि नोंदणी मुद्रांक विभागाच्या 'ई-प्रमाणप्रणालीचे उद्घाटन करण्यात आले.  यावेळी नाम फाऊंडेशन आणि जिल्हाधिकारी कार्यालयात सामंजस्य करार करण्यात आला. या करारांतर्गत ई-ग्राम प्रणाली अंतर्गत सीमांकन करण्यात येणारे रस्ते तयार करण्यासाठी नाम फाऊंडेशनचे सहकार्य होणर आहे. महाविद्यालये व ग्रामपंचायतींना द्यावयाच्या प्रमाणपत्रांचे आणि घरकूल लाभार्थ्यांना दिलेल्या जमीनपट्ट्यांचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री श्री.फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी अन्य मान्यवरांसह 'एम -सँडएक्स्पो सह इतर जिल्हा प्रशासनाच्या सेवा कक्षाला भेट देऊन माहिती घेतली.

कार्यक्रमाला आमदार उमा खापरेविक्रांत पाटीलभीमराव तापकीरसुनील कांबळेचेतन तुपेसुनिल शेळकेबाबाजी काळेसिद्धार्थ शिरोळेहेमंत रासनेशंकर जगतापबापूसाहेब पठारेमहसूल अपर आयुक्त कविता द्विवेदीजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi