Thursday, 18 September 2025

येत्या १ मे पर्यंत सेवा हमी कायद्यांतर्गत अकराशे सेवा डिजीटल करणार,pl share

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याचे उद्घाटन

येत्या १ मे पर्यंत सेवा हमी कायद्यांतर्गत अकराशे सेवा डिजीटल करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगाद्वारे सामान्य माणसाचे जीवन सुलभ करण्यावर शासनाचा भर

पुणेदि. १७ : महसूल विभागाच्या विविध सेवा देतांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगाद्वारे सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन आणले जाईल. त्याची सुरूवात सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने करण्यात येत आहे. सामान्य माणसाचे जीवन अधिक सुलभ करताना त्याच्या समस्या वेगाने दूर करण्यासाठी सेवा हमी कायद्यांतर्गत अकराशे सेवा येत्या १ मेपर्यंत डिजीटल पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येतीलअशी ग्वाही  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित 'सेवा पंधरवड्या'च्या राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानांतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दरम्यान राज्यभरात 'सेवा पंधरवड्या'चे आयोजन करण्यात आले आहे.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवारमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेकृषी मंत्री दत्तात्रय भरणेनगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळमहसूल राज्यमंत्री योगेश कदमखासदार मेधा कुलकर्णीआदी उपस्थित होते.

अतिरिक्त मिशन सचिव रौंदळ यांनी यावेळी कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली.

 अतिरिक्त मिशन सचिव रौंदळ  यांनी यावेळी कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली.

१७ सप्टेंबर २५ ते २ ऑक्टोबर २५ दैनंदिन कार्यक्रम

१७ सप्टेंबर-      राज्यस्तरीय शुभारंभ

१८ सप्टेंबर-       प्रबोधनपर उपक्रम

१९ सप्टेंबर-       कचरा वर्गीकरणटाकाऊपासून टिकाऊ वस्तूस्पर्धा

२० सप्टेंबर        - प्लास्टिक वापरण्याबाबत जनजागृतीशून्य कचराउपक्रम३-आर मोहिम

२१  सप्टेंबर       - कंपोस्ट खत,शोष खड्डा निर्मिती

२२ सप्टेंबर        - अस्वच्छ ठिकाणी कायमस्वरूपी स्वच्छताशास्त्रीयुक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट.

२३ सप्टेंबर        - "एक झाड आईच्या नावे"गृहभेट जनजागृती

२४ सप्टेंबर       - सायकल मॅरेथॉनरॅलीमानवी साखळी

२५ सप्टेंबर -     एक दिवसएक घंटा‘एकत्र श्रमदान उपक्रम

२६ सप्टेंबर-       प्रकल्प उद्घाटन

२७ सप्टेंबर -     ग्रामपंचायत स्वच्छ वॉर्ड स्पर्धा

२८ सप्टेंबर        -सफाई मित्र सुरक्षा शिबिर

२९ सप्टेंबर        -शाळांमध्ये स्वच्छता धडे

३० सप्टेंबर        -स्वच्छता वाहने व उपकरणांचे नूतनीकरण

१ ऑक्टोबर-     स्वच्छता प्रतिज्ञा

२ ऑक्टोबर       -ग्रामसभा व स्वच्छता दिवस


"स्वच्छता ही सेवा २०२५" फक्त एक मोहिम नसून,

 "स्वच्छता ही सेवा २०२५"  फक्त एक मोहिम नसूनसंपूर्ण राज्याने एकत्र येऊन गाव-गावातघराघरात स्वच्छतेचा दीप प्रज्वलित करण्याची संधी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानला बळ देतमहाराष्ट्राने पुन्हा पथदर्शी काम करावे.

या कार्यक्रमात उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांना २ ऑक्टोबर रोजी सन्मानित करण्यात यावे. स्वयंसेवी संस्थाखासगी संस्थामहिला बचत गटयुवक यांचा समावेश करून लोकसहभाग वाढवावाहेच या मोहिमेचे यश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रधान सचिव खंदारे यांनी, गावात कायमस्वरूपी स्वच्छता राखण्यासाठी वेगवेगळ्या  उपाययोजना राबवण्यात याव्यात. जिथे नियमित कचरा एकत्र करण्यात येतो. अशा ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून सुशोभीकरण करावे. शाळांमार्फत रॅलीस्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीआणि जनजागृती मोहिमा राबवून नागरिकांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व बिंबवावे असे निर्देश दिले

स्वच्छता मोहीमेत जनजागृतीबरोबरच जनतेचा सहभाग महत्त्वाचा

 स्वच्छता मोहीमेत जनजागृतीबरोबरच जनतेचा सहभाग महत्त्वाचा

- मंत्री गुलाबराव पाटील

 

मुंबई, दि. १७ : राज्यात स्वच्छता मोहीम राबवितांना जनजागृती बरोबरच गाव स्वच्छतेसाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले.

"स्वच्छता ही सेवा २०२५"या संकल्पनेचा अंगीकार करत राज्यभरात सुरु होणाऱ्या "स्वच्छतोत्सव" २०२५ चा शुभारंभ पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आला. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे अतिरिक्त मिशन सचिव शेखर रौंदळ यांच्यासह दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे राज्यातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीगटविकास अधिकारीग्रामसेवक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

           पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, गावातील नागरिकमहिला बचत गटातील कार्यकर्त्या अशा व्यक्तींना गावातील 'ब्रँड अ‍ॅम्बेसिडरम्हणून नामनिर्देश करून त्यांना या मोहिमेत सामावून घ्यावे. स्वच्छता मोहिमेकरिता शासनाने सर्व पातळ्यांवर सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या असून जनजागृती करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

पोषण महा अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा व राज्य

 पोषण महा अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा व राज्य स्तरावर उत्कृष्ट सेविकामदतनीस व अंगवाडी पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

आयुक्त कैलास पगारे यांनी राष्ट्रीय पोषण माह राज्यात एकूण ५५३ बाल विकास प्रकल्पातील एक लाख १० हजार ६२९ केंद्रात राबविण्यात येते. एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत ६ महिने ते ३ वर्ष वयोगटातील २५ लाख ८२ हजार ३३० बालके३ ते ६ वयोगटातील २४ लाख ७४ हजार ४१७ बालके४ लाख ३२ हजार २३४ गरोदर महिला व ४ लाख २३ हजार ७५६ स्तनदा माता या योजनेचा लाभ घेत आहेत.  केंद्र शासनाने पोषण माहसाठी सहा विशेष ‘थीम’ ठरविल्या आहेत. यामध्ये लठ्ठपणा कमी करणेअर्भक व बालक आहार पद्धतीपुरुषांचा बालकांच्या पोषण आणि आरोग्याच्या काळजीत सहभागवोकल फॉर लोकलएकत्रित कृती व डिजीटायझेशन या थीमनुसार विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नव चेतना अभियान राबविण्यासाठी ३७ हजार मदतनीस व सेविकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानही याच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत. गतवर्षी गडचिरोली येथून या अभियानाचा शुभारंभ करून देशात राज्य अव्वल ठरले होते. यंदाही उत्कृष्ट कामगिरी बजाविणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अर्भक व बालक आहार पद्धती, शिक्षण, गरोदर व स्तनदा मातांना देण्यात येणारे रेशन, बेबी किट

 महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘पोषण भी पढाई भी’अर्भक व बालक आहार पद्धतीशिक्षणगरोदर व स्तनदा मातांना देण्यात येणारे रेशनबेबी किटसुपोषित ग्राम पंचायत योजनापोषण अभियान अशा विविध योजनांच्या माध्यमातून गरजू महिलांना लाभ देण्यात येत आहे. तसेच त्याच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे.

पोषण महा अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा व राज्य स्तरावर उत्कृष्ट सेविकामदतनीस व अंगवाडी पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

महिला व बालकांच्या आरोग्य व पोषणविषयक स्थितीमध्ये सुधारणा घडवून

 मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या कीमहिला व बालकांच्या आरोग्य व पोषणविषयक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी जनजागृतीसाठी २०१८ पासून पोषण माह अभियान राबविण्यात येते. पोषण माह सप्ताहात दरवर्षी राज्य उत्कृष्ठ ठरले असूनयंदाही आपण समन्वयाने देशात उत्कृष्ठ काम करूनकुपोषण समूळ नष्ट करण्याकडे वाटचाल करूया.

सुपोषित राज्य करण्यासाठी अंगणवाडी महिलांचा मोठा सहभाग असूनयासाठी १८ हजार पदांची भरती करण्यात आली आहे. मातृवंदना योजना राबविण्यातही राज्य आघाडीवर असून६३ हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. राज्याच्या निरोगी व उज्वल भविष्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतात. सेविका आणि मदतनीस या पोषण आहाराच्या आधारस्तंभ असूनगावोगावीघराघरात पोषणआरोग्य आणि शिक्षण यांचा संदेश पोहोचविण्याचे काम त्या करीत आहेत.

Featured post

Lakshvedhi