"स्वच्छता ही सेवा २०२५" फक्त एक मोहिम नसून, संपूर्ण राज्याने एकत्र येऊन गाव-गावात, घराघरात स्वच्छतेचा दीप प्रज्वलित करण्याची संधी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “स्वच्छ भारत अभियान”ला बळ देत, महाराष्ट्राने पुन्हा पथदर्शी काम करावे.
या कार्यक्रमात उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांना २ ऑक्टोबर रोजी सन्मानित करण्यात यावे. स्वयंसेवी संस्था, खासगी संस्था, महिला बचत गट, युवक यांचा समावेश करून लोकसहभाग वाढवावा, हेच या मोहिमेचे यश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रधान सचिव खंदारे यांनी, गावात कायमस्वरूपी स्वच्छता राखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्यात याव्यात. जिथे नियमित कचरा एकत्र करण्यात येतो. अशा ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून सुशोभीकरण करावे. शाळांमार्फत रॅली, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणी, आणि जनजागृती मोहिमा राबवून नागरिकांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व बिंबवावे असे निर्देश दिले
No comments:
Post a Comment