Wednesday, 17 September 2025

मिझोरमचे मंत्री लालघिंगलोवा हमर यांनी घेतली कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांची सदिच्छा भेट

 मिझोरमचे मंत्री लालघिंगलोवा हमर यांनी घेतली

 कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांची सदिच्छा भेट

मुंबईदि. 16 : मिझोरमचे कामगार मंत्री लालघिंगलोवा हमर यांनी कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांची त्यांच्या मंत्रालयीन दालनात सदिच्छा भेट घेतली.

या सदिच्छा भेटीत कामगार आयुक्त एच.पी.तुम्मोड तसेच मिझोरम राज्य क्रीडा परिषदेचे सचिव हेन्री सी लालरावकिमाखागी सचिव एच.लालरामेंगा उपस्थित होते.

या भेटीत कामगार मंत्री ॲड.फुंडकर यांनी कामगार विभागामार्फत कामगारांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा आणि योजनांची माहिती दिली. त्याचबरोबर इमारत बांधकाम करतांना शासनाला मिळणाऱ्या सेसबाबतची माहिती दिली. राज्यात पायाभूत विकासाची कामे तसेच सुरू असलेल्या राष्ट्रीय प्रकल्पांची माहितीही मंत्री ॲड.फुंडकर यांनी दिली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन विकसित भारत संवाद’ ऑनलाइन व्याख्यानमालेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त

१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन

विकसित भारत संवाद’ ऑनलाइन व्याख्यानमालेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे

– उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

 

मुंबईदि. १६ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावेअसे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

 

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणालेप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त विद्यापीठ आणि महाविद्यालीन विद्यार्थ्यांना प्रेरित करून प्रत्येक क्षण विकसित भारताच्या विचाराने जगला पाहिजे यासाठी ‘विकसित भारत २०४७’ हा उपक्रम भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापूर्वी देशाला विकसित राष्ट्र बनविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे. या माध्यमातून देशाचा आर्थिकसामाजिकपर्यावरणीय आणि प्रशासनिक क्षेत्रांतील विकास साधून भारताला एक आघाडीच्या जागतिक शक्तीशाली देश म्हणून उभे करण्याचा प्रयत्न आहे.

 

तरुणांच्या सहभागातून विकसित भारत राजदूत युवा कनेक्ट’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाच्या विकास यात्रेला नवे बळ मिळेल. या कालावधीत आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये विकसित भारत संवाद’ ही ऑनलाइन व्याख्यानमाला विशेष आकर्षण असणार आहे. यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच रक्तदान शिबिरेस्वच्छता अभियानआरोग्य तपासणी शिबिरेझिरो वेस्ट व्यवस्थापनपर्यावरण जनजागृतीछत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांवरील व्याख्यानेशहीद भगतसिंह जयंतीनिमित्त देशभक्तीपर कार्यक्रमआरोग्यविषयक कार्यशाळानिबंधपथनाट्य अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या निर्देशानुसार स्वच्छता ही सेवा अभियान २०२५’ राज्यभरातील विद्यापीठे व महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत सार्वजनिक स्वच्छता मोहीमसफाई मित्र सुरक्षा शिबिरेस्वच्छ सुजल गावस्वच्छ आरोग्यदायी स्ट्रीट फूड यांसारख्या विशेष उपक्रमांचा समावेश असेल. विशेष म्हणजे२५ सप्टेंबर रोजी एक दिनएक घंटाएक साथ’ या घोषवाक्यांतर्गत श्रमदान मोहिमेत देशभरात नागरिक हातात हात घालून स्वच्छतेचा संकल्प करणार आहेत. याशिवायविद्यापीठ अनुदान आयोगाच्या Apprenticeship Embedded Degree Programme (AEDP) संदर्भातील कार्यशाळाही राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये घेण्यात येणार आहे.विकसित भारत संवाद’ ही व्याख्यानमाला विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्यासपीठ  असून तरुणांनी यात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावेअसे आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले.

0000

ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणार

 ऑगस्टसप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणार

 -कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबईदि.१६:  ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात  आली आहे. उर्वरित क्षेत्रांच्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना सुरु आहेत. अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.  राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे कृषीमंत्री भरणे यांनी सांगितले.

राज्यात पावसाचे थैमान चालू असून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील तब्बल ३० जिल्ह्यांतील १९५ तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे ६५४ महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

 ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये राज्यात १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टर (४२ लाख ८४ हजार ८४६ एकर) क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. यात प्रामुख्याने खरीप शेतपिकांचे नुकसान झाले असून सोयाबीनमकाकापूसउडीदतूरमूगभाजीपालाफळ पिकेबाजरीऊसकांदाज्वारी आणि हळद या पिकांना मोठा फटका बसला आहे. 

सर्वाधिक बाधित जिल्हे:

नांदेड – ७२८,०४९ हेक्टर

वाशीम – २०३,०९८ हेक्टर

यवतमाळ – ३१८,८६० हेक्टर

धाराशिव – ,५७,६१० हेक्टर

अकोला – १७७,४६६ हेक्टर

सोलापूर – ४७,२६६ हेक्टर

बुलढाणा – ८९७८२ हेक्टर

बाधित पिके:

सोयाबीनमकाकापूसउडीदतूरमूग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भाजीपालाफळपिकेबाजरीऊसकांदाज्वारी व हळद या पिकांनाही फटका बसला आहे.

बाधित जिल्हे:

नांदेडवाशीमयवतमाळबुलढाणाअकोलासोलापूरहिंगोलीधाराशिवपरभणीअमरावतीजळगाववर्धासांगलीअहिल्यानगरछ. संभाजीनगरजालनाबीडलातूरधुळेजळगावरत्नागिरीचंद्रपूरसातारानाशिककोल्हापूरसिंधुदुर्गगडचिरोलीरायगडनागपूर आणि पुणे.

००००

कांदा दरवाढ उपाययोजनेचा भाग म्हणून मंत्री श्री.रावल यांनी राज्यातील 28 कृषी उत्पन्न बाजार

 कांदा बाजारात अफवा पसरवून वेळोवेळी कांद्याचे दर पाडले जातात. त्याचा फायदा ठराविक व्यापाऱ्यांना होतो. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणात दक्षता समिती कार्यान्वित करण्यात आल्या असून त्यांना कार्यकक्षा ठरवून दिली आहे. त्यामुळे कांद्याची साठेबाजी, नफेखोरी अशा विविध गोष्टींवर लक्ष राहणार आहेअशी माहिती मंत्री श्री.रावल यांनी दिली.

       कांदा दरवाढ उपाययोजनेचा भाग म्हणून मंत्री श्री.रावल यांनी राज्यातील 28 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती, सचिव यांच्याशी महाराष्ट्र कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून दूरदृश्य प्रणाली वरून संवाद साधला. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य मोबदला देणे ही बाजार समितीची प्रमुख जबाबदारी आहे. त्या दृष्टीने प्रत्येक बाजार समितीने काम करावे. शेतकऱ्यांचे नुकसान करण्याच्या हेतूने अधिक नफेखोरी करण्यासाठी अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात बाजार समितीने स्थानिक पातळीवर कडक उपाय योजना करावीअशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. शेतकरी हिताच्या दृष्टीने सक्षम काम करणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मूल्यांकन करून बळकटीकरण योजनेत प्राधान्याने विचार करण्यात येईलअसे त्यांनी सांगितले.

       येणाऱ्या काळात शेतकरी उत्पादक गट आणि महिला बचत गट यांच्या माध्यमातून राज्यात सोलर बेस कांदा निर्जलीकरण प्रकल्प राबवण्यात येणार असून त्यामुळे साधारण एक लाख मेट्रिक टन कांदा निर्जलीकरण करून त्यापासून पावडर व ओनियन चिप्स बनवण्यात येणार आहेत. तसेच त्या उत्पादनाचे आंतरराष्ट्रीय बाजारात मार्केटिंग करण्यात येणार आहेअशी माहितीही पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

०००००

कांदा निर्यात अनुदान दुप्पट करण्याची केंद्र सरकारकडे मागणी

 कांदा निर्यात अनुदान दुप्पट करण्याची केंद्र सरकारकडे मागणी

-         पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

 

मुंबई, दि.16:- बाजारात कांद्याचे दर टिकून राहावे व त्याचा फायदा राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना व्हावा यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीला प्रोत्साहन देन निर्यात अनुदान दुप्पट करावेअशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे केली असल्याची माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

       कांद्याच्या दरासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी मंत्रालयात पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार सर्वश्री रमेश बोरनारे, विठ्ठल लंघे, पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे पाटील, पणन विभागाचे सह सचिव विजय लहाने यांच्यासह नाफेड आणि एनसीसीएफचे अधिकारी उपस्थित होते.

       मंत्री जयकुमार रावल म्हणाले, राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. 55 लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन वाढले असले तरी वर्तमान स्थिती लक्षात घेता कांदा निर्यातीला प्रोत्साहन देणे व इतर उपाययोजना करणे आवश्यक आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यात अनुदान दुप्पट करावेअशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. त्याला केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे विविध देशात कांदा निर्यात होऊन राज्यातील कांद्याचे दर स्थिर राहण्यास मदत होईल.

       कांदा बाजारात अफवा पसरवून वेळोवेळी कांद्याचे दर पाडले जातात. त्याचा फायदा ठराविक व्यापाऱ्यांना होतो. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणात दक्षता समिती कार्यान्वित करण्यात आल्या असून त्यांना कार्यकक्षा ठरवून दिली आहे. त्यामुळे कांद्याची साठेबाजी, नफेखोरी अशा विविध गोष्टींवर लक्ष राहणार आहेअशी माहिती मंत्री श्री.रावल यांनी दिली.

ऑस्ट्रेलियाच्या खासदारांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

 ऑस्ट्रेलियाच्या खासदारांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

 

मुंबईदि. 16 : ऑस्ट्रेलियाचे माजी परराष्ट्र मंत्री तथा खासदार टिम वॅट्स यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ऑस्ट्रेलिया आणि महाराष्ट्र यांच्यात शेतीवैद्यकीय तंत्रज्ञानशिक्षण आदी क्षेत्रात वाणिज्यिक संबंध दृढ करण्याबाबत चर्चा झाली.

 

श्री. वॅटस् यांच्या नेतृत्वाखालील  शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी खासदार मिलिंद देवराउपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असिम गुप्ताप्रधाव सचिव नविन सोना आदी उपस्थित होते.

 

भारताच्या आर्थिक आणि औद्योगिक वाढीसाठी महाराष्ट्र मोलाचे योगदान देत असून पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यावर आमचा भर असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. मेट्रो रेल्वेकोस्टल रोडअटल सेतू यासारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प राज्यात पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुंबईमध्ये मेडीसिटीएज्युसिटी करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

यावेळी ऑस्ट्रेलियाचे खासदार टिम वाट्स यांचे स्वागत करतानाच उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मुंबईची ओळख असलेला वडा पाव त्यांना आग्रहाने दिला. विशेष म्हणजे श्री. वॅटस् आणि त्यांच्या समवेत असलेले ऑस्ट्रेलियाचे पश्चिम भारतासाठीचे वाणिज्यदूत पॉल मर्फी यांनी आनंदाने त्याचा स्वाद घेतला. वीस वर्षांपूर्वी आपण मुंबईत क्रिकेटचा समाना पाहण्यासाठी आलो होतो अशी आठवण श्री. वॅटस् यांनी यावेळी आवर्जून सांगितली.

पुण्यात २० सप्टेंबर रोजी अभियंता उद्योजक कार्यशाळा

 पुण्यात २० सप्टेंबर रोजी अभियंता उद्योजक कार्यशाळा

-         व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे

 

मुंबईदि. १६ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) च्या वतीने मातंग समाजातील अभियंता उद्योजकासाठी कार्यशाळेचे २० सप्टेंबर २०२५ रोजी आयोजन करण्यात आले आहेअशी माहिती आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी दिली.

 

ही कार्यशाळा २० सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सीओईपी अभियांत्रिकी विद्यापीठपुणे येथे होणार आहे. या कार्यशाळेत उद्योग क्षेत्रातील यशस्वी व तज्ञ उद्योजकशासनाच्या उद्योग विभागातील प्रशासकीय अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेतून उद्योजकांना नवीन संधी आणि मार्गदर्शन ही मिळणार असल्याने मातंग समाजातील उद्योजकअभियंते आणि होतकरू तरुणांनी या कार्यशाळेत आवर्जून उपस्थित राहावेअसे आवाहन श्री. वारे यांनी केले आहे.

Featured post

Lakshvedhi