Thursday, 18 September 2025

स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाद्वारे लोकांची सेवा - मंत्री प्रकाश आबिटकर

 स्वस्थ नारीसशक्त परिवार’ अभियानाद्वारे लोकांची सेवा - मंत्री प्रकाश आबिटकर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध उपक्रम राबविण्यात येत असून आरोग्य विभागामार्फत स्वस्थ नारीसशक्त परिवार’ अभियान राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी ज्या जनभावनेने समाजकार्य केले आहेत्याच भावनेतून या अभियानाच्या माध्यमातून लोकांची सेवा व्हावीया उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

राज्यातील नगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायती यामध्ये ३९४ ‘नमो गार्डन’ तयार करण्याचा निर्णय

 राज्यातील नगरपालिकानगर परिषदानगरपंचायती यामध्ये ३९४ ‘नमो गार्डन’ तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर जलसंधारण  विभागामार्फत ७५ गावांमध्ये पाणीपुरवठा योजना राबविली जाणार आहे. शेतकऱ्यांना शेतीची अवजारेयंत्रसामग्रीचे वाटप देखील प्रधानमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त होत आहे. उद्योग विभागामार्फत नमो कौशल्य केंद्रऑटोमोबाईल कौशल्य केंद्रकृषी उद्योग कौशल्य केंद्र असे विविध उपक्रम देखील सुरू होत आहेत. मराठी भाषा विभागांतर्गत आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची संख्या ५० देशांपर्यत वाढविण्यासाठी मनो वैश्विक संपर्क समन्वय अभियान’ देखील आजपासून सुरू होत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याच्या विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याच्या विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले कीपैलवान चंद्रहार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जम्मू काश्मीर येथे एक हजार पैलवानांनी देशातील सैनिकांसाठी रक्तदान केले होते. आजच्या दिवसांचे औचित्य साधून रोजगार हमी योजनेतंर्गत २० जिल्ह्यात पाणंद रस्ते तयार करण्याचा शुभारंभ होत आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत राष्ट्र प्रथमआत्मनिर्भर भारतस्वदेशीऑपरेशन सिंदूरपर्यावरण असे विविध विषय घेऊन चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्‍याचबरोबर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व नगरपालिका शाळांमध्ये विविध योजनांद्वारे आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात येत आहे.

घरातील महिला कुटुंबांची देखभाल करताना आपल्या आरोग्याकडे लक्ष

 उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले कीघरातील महिला कुटुंबांची देखभाल करताना आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. अशा वेळी देशभरातील महिला या अभियानाचा लाभ घेऊ शकणार आहेत. रोगाचे लवकर निदान होणे महत्वाचे असून आरोग्य तपासणी ही केवळ पंधरा दिवस चालणारी बाब नाही. त्यामुळे आपल्या आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्यात येत आहेत. यापूर्वी माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित हे देखील अभियान राबविले असल्याचा दाखला त्यांनी दिला.

केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने महिलांच्या आरोग्याचा आणि त्यांच्या सक्षमीकरणांचा विचार

 

केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने महिलांच्या आरोग्याचा आणि त्यांच्या सक्षमीकरणांचा विचार करुन स्वस्थ नारीसशक्त परिवार या अभियानाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्यप्रदेशातील धार येथुन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड येथून दूरदृष्यप्रणालीद्वारे पध्दतीने आपली उपस्थिती दर्शविली.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारपशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेखासदार रजनी पाटीलखासदार बजरंग सोनवणेआमदार सर्वश्री विक्रम काळेधनंजय मुंडेविजयसिंह पंडितआमदार श्रीमती नमिता मुंदडाविभागीय आयुक्त जितेंद्र पापळकरजिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आदी  उपस्थित होते.

स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान वर्षभर सुरू राहावे

 स्वस्थ नारीसशक्त परिवार’ अभियान वर्षभर सुरू राहावे

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वस्थ नारीसशक्त परिवार’ अभियानाचा उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यस्तरीय शुभारंभ

 

मुंबईदि. १७ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून देशभरात स्वस्थ नारीसशक्त परिवार’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. हे अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत म्हणजेच पंधरवडापुरतेच मर्यादित न ठेवता ते वर्षभर सुरू ठेवावेअशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेश येथील धार येथून स्वस्थ नारीसशक्त परिवार’ अभियानाचा शुभारंभ केला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड येथून सहभाग घेतला. त्यानंतर मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथून या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलात्याप्रसंगी ते बोलत होते. या राज्यस्तरीय शुभारंभाच्या वेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकरमहिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेकेंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधवविधानपरिषद सदस्य डॉ.मनीषा कायंदेसार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंगसचिव डॉ.निपुण विनायकआरोग्यसेवा आयुक्त कादंबरी बलकवडेकेंद्रीय सहसचिव ज्योती यादव आदी उपस्थित होते.

पशुपालक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात

 अंमलबजावणीसाठी निधी : योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येणार.

या निर्णयामुळे पशुपालक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात प्रत्यक्ष वाढ होईलचपण औषध उत्पादक कंपन्याखाद्य उत्पादक कंपन्यादूध संकलक आणि प्रक्रिया उद्योगविक्रेतेवाहतूकदार यांसारख्या अप्रत्यक्षपणे संबंधित व्यवसायांनाही चालना मिळणार आहे. तसेच यामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होऊन अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होईल.

महाराष्ट्राच्या सर्वांगीण आणि संतुलित विकासासाठी पशुपालन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. हे केवळ आर्थिक स्थैर्यासाठीच नव्हेतर ग्रामीण भागातील गरीबी कमी करण्यासाठी आणि पर्यावरणीय शाश्वतता साधण्यासाठीही आवश्यक ठरणार आहे.

शेती ही केवळ जमीन जोपासण्यापुरती मर्यादित न राहताती समग्र ग्रामीण जीवनशैलीचा भाग आहे. पशुपालन हा त्यातील एक अविभाज्य घटक आहे. त्यामुळे पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय हा केवळ आर्थिक निर्णय नसून सामाजिक न्याय आणि समावेशक विकासाचा मार्ग आहे.

हा दर्जा दिल्यामुळे महाराष्ट्रातील कोट्यवधी पशुपालकांना मुख्य प्रवाहात आणता येईल आणि त्यातून महाराष्ट्रातील दुग्ध उत्पादनरोजगार निर्मितीआणि ग्रामीण विकासाला नवे बळ मिळेलयात शंका नाही.

"पशुपालनास कृषी समकक्ष दर्जा देणं हा ऐतिहासिक निर्णय असून यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था गतिमान होईल, शाश्वत शेतीला चालना मिळेल, ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होईल आणि शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य वाढेल. राज्यातील सुमारे ७६ लाख कुटुंबे पशुपालन व्यवसायात असून त्यांना याचा थेट लाभ होणार आहे. या निर्णयामुळे राज्यात पशुसंवर्धन क्षेत्रात क्रांती होईल."

Featured post

Lakshvedhi