केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने महिलांच्या आरोग्याचा आणि त्यांच्या सक्षमीकरणांचा विचार करुन स्वस्थ नारी, सशक्त परिवार या अभियानाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्यप्रदेशातील धार येथुन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड येथून दूरदृष्यप्रणालीद्वारे पध्दतीने आपली उपस्थिती दर्शविली.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, खासदार रजनी पाटील, खासदार बजरंग सोनवणे, आमदार सर्वश्री विक्रम काळे, धनंजय मुंडे, विजयसिंह पंडित, आमदार श्रीमती नमिता मुंदडा, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment