Tuesday, 16 September 2025

महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण २०२५ ला मंजुरी - सन २०५० पर्यंतचे नियोजन. ३ हजार २६८ कोटी रुपयांचा आराखडा

 महाराष्ट्र ॲनिमेशनव्हिज्युअल इफेक्ट्सगेमिंग,

कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण २०२५ ला मंजुरी

- सन २०५० पर्यंतचे नियोजन. ३ हजार २६८ कोटी रुपयांचा आराखडा

नवीन २ लाख रोजगार संधी५० हजार कोटींची गुंतवणूक येणार

 

राज्याच्या ॲनिमेशनव्हिज्युअल इफेक्ट्सगेमिंगकॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी (एव्हीजीसी-एक्सआर)  धोरण २०२५ ला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मुंबईला मनोरंजन व पर्यटन क्षेत्राची राजधानी बनविण्याच्या दिशेने टाकलेले हे महत्वाचे पाऊल असून माध्यममनोरंजन आणि ॲनिमेशनव्हिज्युअल इफेक्ट्सगेमिंगकॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी (एव्हीजीसी-एक्सआर) या क्षेत्राला आता उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे.

या धोरणात सन २०५० पर्यंतचे नियोजन करण्यात आले असूनत्यासाठी सुमारे ३ हजार २६८ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या धोरणामुळे राज्यात या वीस वर्षांच्या कालावधीत सुमारे ५० हजार कोटींची गुंतवणूक येणे अपेक्षित आहे. तसेच या क्षेत्राशी निगडीत उच्च तंत्रज्ञानावर आधारित २ लाख नवीन रोजगार निर्माण होणार आहेत.

ॲनिमेशनव्हिज्युअल इफेक्ट्सगेमिंगकॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी (एव्हीजीसी-एक्सआर) हे क्षेत्र देशाच्या मीडिया आणि एंटरटेनमेंट (एम अँण्ड ई) उद्योगाचा महत्वाचा घटक मानले जाते. भारतात हे क्षेत्र झपाट्याने वाढू लागले आहे. मीडिया अँड एंटरटेनमेंट बाजारपेठ सध्याच्या २७ अब्ज डॉलर्सवरून २०३० पर्यंत शंभर अब्ज डॉलर्सहून अधिक विस्तारण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भारतात या क्षेत्रात ३० लाखांहून अधिक प्रत्यक्ष रोजगार आणि ५१ लाख ५० हजारांहून अधिक अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा आहे.

प्रत्येक वर्षी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतर्फे घेण्यात येणाऱ्या पात्रता परीक्षेत यशस्वी झालेल्या नववीतील

 प्रत्येक वर्षी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतर्फे घेण्यात येणाऱ्या पात्रता परीक्षेत यशस्वी झालेल्या नववीतील एक लाख विद्यार्थ्यांना प्रत्येकी 12,000 रुपये वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्ती दहावी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे नूतनीकरण पद्धतीने सुरू राहते. ही योजना केवळ स्थानिक स्वराज्य संस्था किंवा शासकीय अनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.

31 ऑगस्ट 2025 पर्यंत एकूण 85,420 नवे व 1,72,027 नूतनीकरण अर्ज अंतिम स्वरूपात सादर झाले आहेत. शिष्यवृत्तीची रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (PFMS) च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

शिष्यवृत्तीसाठी पात्रतेच्या अटींमध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न 3.50 लाख रुपयांपेक्षा अधिक नसणे आवश्यक आहे. तसेच सातवीत किमान 55 टक्के गुण मिळणे गरजेचे आहे (SC/ST विद्यार्थ्यांसाठी 5 टक्के सूट आहे).अर्जांच्या पडताळणीसाठी दोन स्तर आहेत – पहिला स्तर (L1) संस्थेच्या नोडल अधिकाऱ्याकडे (INO) असून त्यासाठी अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2025 आहे. दुसरा स्तर (L2) जिल्हा नोडल अधिकाऱ्याकडे (DNO) असून त्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.

0000000

राष्ट्रीय माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर

 राष्ट्रीय माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज

करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर

 

नवी दिल्ली, 16 : राष्ट्रीय माध्यमिक शिष्यवृत्ती योजना (National Means-cum-Merit Scholarship Scheme - NMMSS) अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. अर्ज सादरीकरणाची प्रक्रिया राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) वर 2 जून 2025  पासून सुरू आहे.

या वर्षी विद्यार्थ्यांना प्रथम एक-वेळ नोंदणी (One-Time Registration) करणे आवश्यक असून त्यानंतर निवडलेल्या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करावा लागणार आहे. नोंदणीसंदर्भातील वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) https://scholarships.gov.in/studentFAQs येथे उपलब्ध आहेत.

महोत्सव महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा आणि धार्मिक श्रद्धेचा संगम ठरेल

 स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल : प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे

 प्रधान सचिव डॉ.अतुल पाटणे म्हणाले कीश्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रमुख महोत्सवाचा दर्जा देण्याचा हा निर्णय ऐतिहासिक आहे. यामुळे पर्यटनवृद्धीचे उद्दिष्ट साध्य होईलस्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळेल आणि महाराष्ट्राची धार्मिक व सांस्कृतिक ओळख अधिक दृढ होईल. हा महोत्सव स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.

महोत्सव महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा आणि धार्मिक श्रद्धेचा संगम ठरेल

- पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील

पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील म्हणाले कीश्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रमुख महोत्सवाचा दर्जा मिळाल्याने महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राला नवीन दिशा मिळेल. हा महोत्सव केवळ धार्मिक नाहीतर महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि सांस्कृतिक वारशाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे प्रभावी व्यासपीठ ठरेल. म्हैसूर दसरा महोत्सवाप्रमाणेया महोत्सवाची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात केली जाईलज्यामुळे अधिकाधिक पर्यटक आकर्षित होतील.

                                   

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री तुळजाभवानी मातायुट्यूब चॅनेलवर (https://www.youtube.com/@MaharashtraTourismOfficial

 मंत्री श्री.देसाई म्हणाले कीमहाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री तुळजाभवानी माता अंबाबाईच्या प्राचीन मंदिरासाठी तुळजापूर हे पवित्र तीर्थक्षेत्र देशभर प्रसिद्ध आहे. या दहा दिवसीय महोत्सवात महाराष्ट्रकर्नाटकतेलंगणा आणि देशाच्या विविध भागांतून सुमारे ५० लाख भाविक श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापुरात दाखल होतात. या कालावधीत तुळजापूर शहर धार्मिक उत्साहसांस्कृतिक वैभव आणि सामाजिक एकतेच्या रंगांनी उजळून निघते. या महोत्सवा दरम्यान स्थानिक लोककलासह राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावरील ख्यातनाम कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम या उत्सवाला विशेष रंगत आणतील. नवरात्र थीमवर आधारित ३०० ड्रोनद्वारे साकारलेला भव्य लाईट शो या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरेल.

महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळ आणि युट्यूब चॅनेलवर (https://www.youtube.com/@MaharashtraTourismOfficial), महोत्सवाचे थेट प्रक्षेपण उपलब्ध असेलज्यामुळे देश-विदेशातील भाविक आणि पर्यटक या उत्सवाचा आनंद घेऊ शकतील. याशिवायजबाबदार आणि शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी व्याख्यानेचित्रकला स्पर्धा आणि मॅरेथॉन यांचे आयोजन करण्यात येईल. फॅम टूरचे आयोजनपर्यटन विषयक कॉन्क्लेव्हफेअर इव्हेंटचे आयोजन करण्यात येईल. या महोत्सवामुळे तुळजापूर परिसरातील नळदुर्ग किल्लातेर येथील संत गोरोबा काकांचे मंदिरयेरमाळा येथील येडेश्वरी मंदिर आणि परांडा किल्ला यांसारख्या धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल. यामुळे स्थानिक पर्यटनाला गती मिळेल आणि परिसरातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

 श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला

महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण

मुंबईदि. १६ : श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला राज्यातील प्रमुख महोत्सवाचा प्रतिष्ठित दर्जा प्रदान केला असून हा भव्य महोत्सव २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर२०२५ या कालावधीतघटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंतधाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील तुळजापूर येथे साजरा होईल. या महोत्सवा दरम्यान स्थानिक लोककलागोंधळी गीतभारुडजाखडी नृत्य यांसारख्या पारंपरिक कलांचे सादरीकरण होईल. गोंधळभजन आणि कीर्तन यांसारख्या धार्मिक-सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केल्या जातील, अशी माहिती पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

नवी मुंबईतील महापे येथे देशातील अत्याधुनिक ' जेम्स अँड ज्वेलरी' पार्क

 जेम्स अँड ज्वेलरी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीनवी मुंबईतील महापे येथे देशातील अत्याधुनिक जेम्स अँड ज्वेलरीपार्क उभारण्यात येत आहे. या पार्कच्या माध्यमातून 'जेम्स अँड ज्वेलरीक्षेत्रातील व्यावसायिकांनानिर्यातदारांना सुविधा देऊन अधिकाधिक निर्यात वाढविण्यासाठी शासन काम करेल. तसेच हे क्षेत्र रोजगाराभिमुख बनविण्यासाठी 'जेम्स अँड ज्वेलरी संघटनेसोबत सहकार्याची शासनाची भूमिका आहे. भारतीय आभूषणेदागिन्यांना मोठा इतिहास आहे. जगात बऱ्याच देशांमध्ये भारतीय दागिने निर्यात होतात. जागतिक स्तरावर या क्षेत्रात भारत आघाडीवर असून ही आघाडी टिकविण्यासाठी शासनाची धोरणे त्या पद्धतीने सुसंगत करण्यात येतील.

राज्य शासन 'इज ऑफ डूइंग बिजनेस'साठी नवीन उद्योगांना परवाना पद्धतजागा खरेदी प्रक्रियासध्याच्या उद्योगांचे बळकटीकरण प्रक्रिया सोपी आणि कमी कालावधीची करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुधारणा करीत आहे. त्यासाठी मंत्रालयात 'इज ऑफ डूइंग बिजनेसवॉर रूमही तयार करण्यात आली आहे. या माध्यमातून सुधारणा प्रकल्प कुठल्या टप्प्यावर आहेकशा पद्धतीने करायची याबाबत नियमित आढावा घेण्यात येत असून राज्यात उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी शासन कटीबद्ध आहेया प्रदर्शनाच्या आयोजनामधून भारतीय दागिन्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे. तसेच या क्षेत्रात नवीन संशोधन होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Featured post

Lakshvedhi