Wednesday, 17 September 2025

मराठी भाषेच्या प्रचारासाठी निबंध लेखन व मराठी भाषा संस्कृती ज्ञान परीक्षा स्पर्धेचे आयोजन pl share school student

 मराठी भाषेच्या प्रचारासाठी निबंध लेखन व मराठी भाषा संस्कृती

ज्ञान परीक्षा स्पर्धेचे आयोजन

 

नवी दिल्ली१६ : मराठी भाषेचा प्रसार आणि विकास व्हावा यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळनवी दिल्ली आणि राज्य मराठी विकास संस्थामुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने निबंध लेखन आणि मराठी  भाषा संस्कृती ज्ञान परीक्षा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ५ ऑक्टोबर २०२५ रोजी होणार असूनअर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ०१ ऑक्टोंबर २०२५ आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येकी २५ रुपये शुल्क आकारले जाईलआणि दोन्ही परीक्षा  प्रत्येकी दोन तासांच्या असतील.

 

स्पर्धेत विविध वयोगटांसाठी तीन गट आणि वैविध्यपूर्ण विषय ठेवण्यात आले आहेत. गट क्र. १ (१२ ते १६ वर्षे१५०-५०० शब्द) मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर - एक अलौकिक व्यक्तिमत्त्व, ‘खेळामुळे मिळणारे जीवनाचे धडे, ‘माझी आई सर्वकाही हे विषय आहेत. गट क्र. २ (१७ ते ३० वर्षे५००-१००० शब्द) मध्ये यशासाठी आहार आणि विहार, ‘फेक बातम्या व सूचनांचा अतिभार - एक गंभीर विषय’, ‘मराठी भाषेचा वापर हीच मराठी भाषेची जपणूक आहे’ हे विषय देण्यात आले आहेत. गट क्र. ३ (१०००-१५०० शब्द) मध्ये पुण्यश्लोक देवी आहिल्यादेवी होळकर यांची राष्ट्रभक्ती, ‘कुंभमेळा: एक महान परंपरा की भ्रमंती धर्म आणि विज्ञान - मित्र की शत्रू  हे विषय आहेत.

 

मराठी भाषासंस्कृती आणि साहित्याच्या माध्यमातून तरुण पिढीला प्रेरणा देण्याचे उद्दिष्ट या स्पर्धेद्वारे साध्य केले जाणार आहे. मराठी परीक्षेच्या पाच स्तरांमध्ये परिचयप्राज्ञमध्यमाकोविद प्रथम आणि कोविद द्वितीय यांचा समावेश आहे. 

 

अधिक माहितीसाठी किंवा अर्ज भरण्यासाठी संपर्क साधावा: परीक्षा कार्यालय५६-बीवैशाली नगरइंदूर - ४५२००९. फोन: ८३29423864,7389293997. इच्छुकांनी त्वरित अर्ज सादर करावेतअसे आवाहन संस्थेने केले आहे.  दिल्ली व दिल्लीच्या आसपास परिसरासाठी केंद्र प्रमुख श्रीमती शशी कुलकर्णी  (मो.क्र 9868023064) यांच्याशी संपर्क साधावा.

0000

Pm e विद्या उपक्रमासाठी राज्यस्तरावर तसेच वाहिनीनिहाय शैक्षणिक आणि तांत्रिक समन्वय रचना उभारण्यात आली आहे.

 या उपक्रमासाठी राज्यस्तरावर तसेच वाहिनीनिहाय शैक्षणिक आणि तांत्रिक समन्वय रचना उभारण्यात आली आहे. समन्वयक मंडळ प्रक्षेपणाची गुणवत्ता सुनिश्चित करणेवेळापत्रक अद्ययावत ठेवणे आणि कार्यक्रमांची शाळा व पालकांपर्यंत प्रभावी पोहोच घडवून आणणे या जबाबदाऱ्या पार पाडत आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्रामार्फत सर्व शिक्षकअधिकारी तसेच पालकांना आवाहन करण्यात येत आहे कीया सर्व शैक्षणिक वाहिन्या यूट्यूब वर सब्स्क्राइब कराव्यात. यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ मिळेल. या प्रक्षेपणाचे मासिक वेळापत्रक आणि वाहिन्यांचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी यूट्यूब लिंक परिषदेच्या संकेतस्थळावर (www.maa.ac.inपीएम-ई-विद्या वाहिन्या या टॅब अंतर्गत उपलब्ध उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पीएम-ई-विद्या वाहिन्यांचा उपयोग करण्यासाठी http://www.maa.ac.in/index.php?tcf=pmev या लिंकचा देखील उपयोग करता येईल.

पीएम-ई-विद्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचे सामर्थ्य अनुभवायला मिळत आहे. हे पाऊल ग्रामीण व शहरी भागातील शैक्षणिक दरी कमी करून प्रत्येक मुलापर्यंत ज्ञान पोहोचवत आहे. या वाहिन्यांद्वारे अभ्यासक्रमाशी थेट निगडित तसेच मुख्य प्रवाहातील सर्व शालेय विषयांसाठी दर्जेदार व्हिडिओ सामग्री उपलब्ध होत असूनविद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेला गती मिळत आहे. शिक्षकांसाठीही हे एक प्रभावी शैक्षणिक साधन ठरत असूनशिक्षणाचा दर्जा आणखी उंचावण्यास मदत होत आहे.

पीएम-ई-विद्या हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या ज्ञानसंपन्न भविष्यासाठी महाराष्ट्र सरकारचा एक क्रांतिकारी प्रयत्न असूनपरिषदेमार्फत सर्वांना या वाहिन्या सब्स्क्राइब करण्याचे आवाहन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी केले आहे.

पीएम- ई-विद्या वाहिन्यांद्वारे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानविश्व Pl शेअर imo

 पीएम- ई-विद्या वाहिन्यांद्वारे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानविश्व

 

मुंबईदि. १६ : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या पुढाकाराने आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने पीएम-ई-विद्या शैक्षणिक वाहिन्यांचे महाराष्ट्रात प्रक्षेपण सुरू झाले आहे. भारत सरकारच्या 'वन क्लास वन टीव्ही चॅनेलया अभिनव संकल्पनेनुसार देशभरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी तब्बल २०० शैक्षणिक टीव्ही वाहिन्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या सर्व उपक्रमात महाराष्ट्र राज्यासाठी पाच समर्पित पीएम-ई-विद्या वाहिन्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

पीएम-ई-विद्या 113 (SCERTM C 113) इयत्ता १ वी व ६ वीपीएम-ई-विद्या 114 (SCERTM C114) - इयत्ता २ री व ७ वीपीएम-ई-विद्या 115 (SCERTM C115) इयत्ता ३ री व ८ वीपीएम-ई-विद्या 116 (SCERTM C116) - इयत्ता ४ थी व ९ वी आणि पीएम-ई-विद्या 117 (SCERTM C117) इयत्ता ५ वी व १० वी या वाहिन्यांवर त्यासमोर दिलेल्या इयत्तांसाठी दर्जेदार शैक्षणिक आशयाचे प्रक्षेपण केले जात आहे. या सर्व वाहिन्या डीडी-फ्री डिश व्यतिरिक्त यूट्यूब वर थेट (लाईव्ह) उपलब्ध असून प्रत्येक वाहिनीवर दररोज सहा तासांचे शैक्षणिक प्रक्षेपण केले जाते. हे कार्यक्रम २४ तासांत तीन वेळा पुनर्प्रक्षेपित होतातत्यामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना सोयीच्या वेळेस पाहणे शक्य होते.

महाराष्ट्रातील फिल्म सिटी (मुंबई), नवी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सातारा आणि नागपूर यांसारख्या ठिकाणी या पार्कच्या

 विशेषतः महाराष्ट्रातील फिल्म सिटी (मुंबई)नवी मुंबईपुणेनाशिकछत्रपती संभाजीनगरकोल्हापूरसातारा आणि नागपूर यांसारख्या ठिकाणी या पार्कच्या विकासाचे नियोजन करण्यात येईल. हे पार्क हाय-स्पीड डिजिटल कनेक्टिव्हिटीमोशन कॅप्चर स्टुडिओपोस्ट-प्रोडक्शन लॅबहाय-परफॉर्मन्स रेंडरिंग फार्मसाउंड रेकॉर्डिंग सुविधा आणि व्हर्च्युअल प्रोडक्शन स्टुडिओ यासारख्या जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज असतील. या उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एआय- आधारित अॅनिमेशनरिअल-टाइम रेंडरिंगइमर्सिव्ह अनुभव आणि मेटाव्हर्स-संबंधित उपयोजनांचा समावेश असलेल्या पायाभूत सुविधा याठिकाणी दिल्या जातील.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) ही या क्षेत्रातील प्रमुख संस्था म्हणून काम करणार आहे.

 या क्षेत्रात नवोन्मेषालाउद्योजकतेलाबौध्दिक संपदा निर्मितीला प्रचंड वाव आहे. यातून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीचा ओघही राज्यात वाढू शकतो. म्हणूनच महाराष्ट्राला या क्षेत्राच्या दृष्टीने ग्लोबल डेस्टिनेशन बनण्याची मोठी संधी आहे. त्यासाठी या धोरणांतर्गत विविध संस्थात्मक घटकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) ही या क्षेत्रातील प्रमुख संस्था म्हणून काम करणार आहे.

AVGC-XR पार्क समर्पित उद्योग हब म्हणून विकसित करण्यात येतील. हे पार्क अत्याधुनिक पायाभूत सुविधाव्यवसायासाठीच्या सर्व सुविधांनी युक्त आणि या क्षेत्रातील कार्यरत असलेल्या स्टार्टअप्सएमएसएमई व मोठ्या घटकांस प्रोत्साहन मिळेलअशा रितीने विकसित केले जातील.

विशेषतः महाराष्ट्रातील फिल्म सिटी (मुंबई)नवी मुंबईपुणेनाशिकछत्रपती संभाजीनगरकोल्हापूरसातारा आणि नागपूर यांसारख्या ठिकाणी या पार्कच्या विकासाचे नियोजन करण्यात येईल. हे पार्क हाय-स्पीड डिजिटल कनेक्टिव्हिटीमोशन कॅप्चर स्टुडिओपोस्ट-प्रोडक्शन लॅबहाय-परफॉर्मन्स रेंडरिंग फार्मसाउंड रेकॉर्डिंग सुविधा आणि व्हर्च्युअल प्रोडक्शन स्टुडिओ यासारख्या जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज असतील. या उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एआय- आधारित अॅनिमेशनरिअल-टाइम रेंडरिंगइमर्सिव्ह अनुभव आणि मेटाव्हर्स-संबंधित उपयोजनांचा समावेश असलेल्या पायाभूत सुविधा याठिकाणी दिल्या जातील.

Tuesday, 16 September 2025

महाराष्ट्रात ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी (एव्हीजीसी-एक्सआर) या क्षेत्रात

 महाराष्ट्रात ॲनिमेशनव्हिज्युअल इफेक्ट्सगेमिंगकॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी (एव्हीजीसी-एक्सआर) या क्षेत्रात २९५ हून अधिक स्टुडिओ आहेत. भारतातील सर्वाधिक म्हणजे ३० टक्के स्टुडिओ हे महाराष्ट्रात आहेत. मुंबईपुणे येथे ॲनिमेशनव्हिज्युअल इफेक्टस आणि गेमिंगसाठीच्या शैक्षणिक सुविधा देणाऱ्या २० संस्था कार्यरत आहेत. महाराष्ट्राने यापूर्वीच माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण- २०२३ अंतर्गत ॲनिमेशनव्हिज्युअल इफेक्ट्सगेमिंगकॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी (एव्हीजीसी-एक्सआर) या क्षेत्राला उदयोन्मुख उद्योग म्हणून घोषित केले आहे. या क्षेत्रातील तंत्रज्ञान आरोग्यसेवाशिक्षणविपणनसंरक्षणगेमिंगकृषि आणि रिअल इस्टेट यासारख्या क्षेत्रांत वापरले जाते. आरोग्यसेवेमध्ये एआर-व्हीआर वैद्यकीय सिम्युलेशनचा वापर केला जातो. यातून रुग्णांसाठी सुविधा देणे आणि वैद्यकीय शिक्षणांकरिताही वापर केला जातो. मार्केटिंग क्षेत्रात ब्रॅण्डिंगइमर्सिव्ह व्हिज्युअल्सचातर संरक्षण क्षेत्रातही सिम्युलेशनचा वापर केला जात आहे. रिअल इस्टेटमध्ये थ्री-डी मॉडेलिंगआभासी टूर्स यासाठी या तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते.

ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी (एव्हीजीसी-एक्सआर) हे क्षेत्र देशाच्या

 ॲनिमेशनव्हिज्युअल इफेक्ट्सगेमिंगकॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी (एव्हीजीसी-एक्सआर) हे क्षेत्र देशाच्या मीडिया आणि एंटरटेनमेंट (एम अँण्ड ई) उद्योगाचा महत्वाचा घटक मानले जाते. भारतात हे क्षेत्र झपाट्याने वाढू लागले आहे. मीडिया अँड एंटरटेनमेंट बाजारपेठ सध्याच्या २७ अब्ज डॉलर्सवरून २०३० पर्यंत शंभर अब्ज डॉलर्सहून अधिक विस्तारण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भारतात या क्षेत्रात ३० लाखांहून अधिक प्रत्यक्ष रोजगार आणि ५१ लाख ५० हजारांहून अधिक अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा आहे.

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलीयन डॉलर्सची व्हावी यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार समितीने तयार केलेल्या व्हिजन डॉक्युमेंटमध्येही या क्षेत्राचा उल्लेख केला होता. याचदृष्टीने केंद्र शासनाने मुंबईमध्ये अलिकडेच व्हेवज् २०२५ या आंतरराष्ट्रीय परिषदेचेही आयोजन केले होते. या परिषदेच्या माध्यमातून सुमारे ८ हजार कोटींचे सामंजस्य करारही करण्यात आले. या समितीच्या अहवालातही कौशल्य विकास व नवोन्मेष विकास यासाठी ॲनिमेशनव्हिज्युअल इफेक्ट्सगेमिंगकॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी (एव्हीजीसी-एक्सआर) हे क्षेत्र महत्वाचे आणि पूरक असल्याचे नमूद केले आहे. तसेच या क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याची शिफारस करण्यात आली होती. देशात कर्नाटकतेलंगणाराजस्थानकेरळ व मध्यप्रदेश या राज्यांमध्ये असे धोरण तयार करण्यात आले आहे.

Featured post

Lakshvedhi