Wednesday, 17 September 2025

पीएम- ई-विद्या वाहिन्यांद्वारे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानविश्व Pl शेअर imo

 पीएम- ई-विद्या वाहिन्यांद्वारे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानविश्व

 

मुंबईदि. १६ : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या पुढाकाराने आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने पीएम-ई-विद्या शैक्षणिक वाहिन्यांचे महाराष्ट्रात प्रक्षेपण सुरू झाले आहे. भारत सरकारच्या 'वन क्लास वन टीव्ही चॅनेलया अभिनव संकल्पनेनुसार देशभरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी तब्बल २०० शैक्षणिक टीव्ही वाहिन्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या सर्व उपक्रमात महाराष्ट्र राज्यासाठी पाच समर्पित पीएम-ई-विद्या वाहिन्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

पीएम-ई-विद्या 113 (SCERTM C 113) इयत्ता १ वी व ६ वीपीएम-ई-विद्या 114 (SCERTM C114) - इयत्ता २ री व ७ वीपीएम-ई-विद्या 115 (SCERTM C115) इयत्ता ३ री व ८ वीपीएम-ई-विद्या 116 (SCERTM C116) - इयत्ता ४ थी व ९ वी आणि पीएम-ई-विद्या 117 (SCERTM C117) इयत्ता ५ वी व १० वी या वाहिन्यांवर त्यासमोर दिलेल्या इयत्तांसाठी दर्जेदार शैक्षणिक आशयाचे प्रक्षेपण केले जात आहे. या सर्व वाहिन्या डीडी-फ्री डिश व्यतिरिक्त यूट्यूब वर थेट (लाईव्ह) उपलब्ध असून प्रत्येक वाहिनीवर दररोज सहा तासांचे शैक्षणिक प्रक्षेपण केले जाते. हे कार्यक्रम २४ तासांत तीन वेळा पुनर्प्रक्षेपित होतातत्यामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना सोयीच्या वेळेस पाहणे शक्य होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi