Monday, 15 September 2025

ह्युंदाई कंपनीने राज्यात अधिकाधिक गुंतवणूक करीत रोजगार निर्मिती वाढवावी

 ह्युंदाई कंपनीने राज्यात अधिकाधिक गुंतवणूक करीत

रोजगार निर्मिती वाढवावी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबईदि. १५ : वाहन उद्योगात ह्युंदाई कंपनीचे मोठे नाव आहे. कंपनीने राज्यातही गुंतवणूक केली आहे. पुणे येथील प्रकल्पातून वाहन उत्पादनात वाढ होणार आहे. ह्युंदाई कंपनीने राज्यात वाहन उद्योगात अधिकाधिक गुंतवणुक करीत रोजगार निर्मितीमध्ये वाढ करावीअसे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी ह्युंदाई कंपनीच्या शिष्टमंडळासोबत आयोजित बैठकीत केले.

ह्युंदाई कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक उन्सू किम यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची भेट घेतली. बैठकीस मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव अश्विनी भिडेउद्योग सचिव डॉ. पी. अनबलगनमुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसेकंपनीचे कार्यकारी संचालक जिओन्जीक लीउपाध्यक्ष (वित्त) सारावनन टीसहायक उपाध्यक्ष पुनीत आनंदकार्तिक एलवरिष्ठ व्यवस्थापक विनोद बनसोड आदी उपस्थित होते.

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल वाहतूक व्यवस्थेसाठी महत्वाचा

  

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल वाहतूक व्यवस्थेसाठी महत्वाचा  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         पुण्यातील सर्वात मोठ्या उड्डाणपुलाचे लोकार्पण

·         पुणेकरांना  भेट

·         तीन टप्प्यात कोटी ११८.३७ रूपये निधीतून उभा राहिला उड्डाणपूल

·          तीस मिनिटाचा वाहतूक कालावधी आला केवळ सहा मिनिटावर

 

पुणेदि. १ (जिमाका वृत्तसेवा) : पुणे शहरातील वाढत्या वाहनांच्या वाहतूक व्यवस्थापनासाठी सिंहगड रस्त्यावरचा तीन टप्यातला अडीच किलोमीटरचा पुल हा अत्यंत महत्वाचा असून या पुलामुळे पुणेकरांची वाहतूक कोंडी मधून तर सुटका होणारच आहे. याबरोबरच प्रदूषण कमी होणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात पुणेकरांसाठी ही भेट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुलाच्या लोकार्पणानंतर सांगितले.

     सिंहगड रस्त्यावर उभारण्यात आलेला राजाराम पुलापासून ते फन टाईम थिएटरपर्यंतचा उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत दाखल झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुसरा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

   

सिंहगरस्त्यावरून धायरीनऱ्हेखडकवासलावडगाव बुद्रुकनांदेड सिटी तसेच बेंगळुरू-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर दररोज सुमारे दीड लाखाहून अधिक वाहनांची वाहतूक होते. या मार्गाच्या एका बाजूला मुठा नदी व दुसऱ्या बाजूस डोंगर असल्याने पर्यायी रस्ता शक्य नसल्यामुळे उड्डाणपूल उभारणे आवश्यक होते. पुणे महानगरपालिकेमार्फत उड्डाणपुलाचे भूमिपूजन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २१ सप्टेंबर २०२१ रोजी करण्यात आले.

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून बाल अवस्थेतील आरोग्य सुदृढ राखण्यावर भर

 राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून

बाल अवस्थेतील आरोग्य सुदृढ राखण्यावर भर

– सचिव डॉ. निपुण विनायक

 

मुंबईदि. १५ : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग राज्यातील बाल अवस्थेतील आरोग्य सुदृढ राखण्यावर भर देत आहे.  तसेचअसंसर्गजन्य आजारांबाबत इतर  अधिक सजग असूनविविध विभागांच्या समन्वयातून प्रभावी उपाययोजना राबवत असल्याचे आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक यांनी सांगितले.

 

युनिसेफ इंडिया आणि प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) यांच्या संयुक्त विद्यमाने बाल अवस्थेतील असंसर्गजन्य आजारांवरील राज्यस्तरीय कार्यशाळा हॉटेल ताज प्रेसिडेंटमुंबई येथे पार पडली. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. निपुण विनायक यांच्यासह PIB पश्चिम विभागाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा, AIIMS नागपूरचे मुख्य संचालक डॉ. प्रशांत जोशीयुनिसेफचे महाराष्ट्र प्रमुख संजय सिंग आणि विवेक सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

सचिव डॉ. विनायक यांनी सांगितले कीराज्य शासनाच्या आरोग्य विभागाने बाल अवस्थेतील असंसर्गजन्य आजार टाळण्यासाठी विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गर्भारपणाच्या काळापासून काळजी घेतल्यास भविष्यात असे आजार टाळता येऊ शकतात.

त्यांनी दुर्लक्षित घटकांवर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे असल्याचे सांगून म्हणाले कीसमाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचण्यासाठीविशेषतः दुर्लक्षित समुदायांसाठीआपण सर्वांनी मिळून काम करणे गरजेचे आहे.

 

यावेळी स्मिता वत्स - शर्मा यांनी माध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. तसेच सत्य माहिती समाजापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. चुकीच्या आणि असत्य माहितीमुळे समाजात गैरसमज वाढतातत्यामुळे माध्यमांनी काळजीपूर्वक सत्य माहितीचे प्रसारण करणे आवश्यक आहे. तसेच असंसर्गजन्य आजारआहारजीवनशैली आणि काळजी यासंदर्भात जनजागृती करणे आवश्यक आहे. राज्यस्तरीय कार्यशाळांमुळे विविध विषयांवर चर्चा होऊन त्याचा सकारात्मक परिणाम आरोग्य व्यवस्थेवर दिसून येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

 

कार्यशाळेत युनिसेफ व अन्य तज्ज्ञांनी असंसर्गजन्य आजारांची वाढती तीव्रतालहान वयात होणारे परिणामआणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर सखोल चर्चा केली.

००००

अंगणवाडी बांधकामात युनीफॉर्मिटी व आधुनिक तंत्राचा वापर आवश्यक

 अंगणवाडी बांधकामात युनीफॉर्मिटी व आधुनिक तंत्राचा वापर आवश्यक

राज्यातील अंगणवाड्यांच्या बांधकामात एकसमान पद्धत असावी तसेच आधुनिक तंत्राचा वापर करून अंगणवाड्या उभाराव्यात असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. अंगणवाड्या उभारताना राज्यभर एकच पद्धत वापरावी तसेच आधुनिक तंत्राचा वापर करावा. वीज पुरवठा करताना ऊर्जा बचतीसाठी सोलार प्रकल्पाला प्राधान्य द्यावे.  तसेच अंगणवाडीमध्ये पुरवठा करण्यात येणाऱ्या पोषण आहाराची गुणवत्ता वाढावी यासाठी तातडीने उपाययोजना आखाव्यात. बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी अंगणवाडी महत्वपूर्ण भूमिका बजावत असताना त्यांचे आरोग्य आणि शिक्षण उत्तम दर्जाचे देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्या म्हणाल्या.

०००

मुंबई बँकेला व्याज परतावा योजनांसाठी प्राधिकृत करून तातडीने सामंजस्य करार करावा.

 मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या कीमुंबई बँकेला व्याज परतावा योजनांसाठी प्राधिकृत करून तातडीने सामंजस्य करार करावा. महामंडळाच्या व्याज परतावा योजनेच्या लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार असल्याने यांना अपात्र ठरवता येणार नाही. यासंदर्भात्‍ विशेष सूचना जारी करण्यात याव्यात. या योजनेच्या माध्यमातून मुंबईतील पात्र महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यास सहकार्य लाभणार आहे.

मुंबई बँकेच्या या उपक्रमांतर्गत महिलांना एक लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. यामध्ये 5 ते 10 महिला एकत्र येऊन व्यवसाय करू शकतात.  ₹१०,००० ते ₹१,००,००० पर्यंत कर्ज उपलब्ध करण्यात येणार आहे असे मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सांगितले. मुंबई बँकेची मुंबईत एकूण १६.०७ लाख बचत खाती आहेत. त्यापैकी "माझी लाडकी बहीण योजना" अंतर्गत ५३,३५७ महिलांची शून्य शिल्लक खाती उघडली. पात्र महिलांना शासनाकडून दरमहा ₹१५०० थेट खात्यात जमा होत आहेत.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष कर्ज धोरण योजनेचा लाभ द्यावा

 महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष कर्ज धोरण योजनेचा लाभ द्यावा

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई दि 11 –अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळमहाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळवसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामध्ये वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजनेच्या लाभार्थी महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी व आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी विशेष कर्ज धोरण राबविण्यात येत आहे. या कर्ज योजनेशी सांगड घालण्यासाठी महामंडळांनी मुंबई बँकेशी करार करावा असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

मुंबई बँकेने सुरू केलेल्या विशेष कर्ज योजनाअंगणवाडी बांधकाम संदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. या बैठकीस बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकरआमदार चित्रा वाघअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटीलविभागाचे सहसचिव वि. रा.ठाकूरवित्त विभागाचे सहसचिव स्मिता निवतकरसहसचिव मु. प्र. साबळेवसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रताप पवारमहाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक आनंद लोमटे आदि अधिकारी उपस्थित होते.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या कीमुंबई बँकेला व्याज परतावा योजनांसाठी प्राधिकृत करून तातडीने सामंजस्य करार करावा. महामंडळाच्या व्याज परतावा योजनेच्या लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार असल्याने यांना अपात्र ठरवता येणार नाही. यासंदर्भात्‍ विशेष सूचना जारी करण्यात याव्यात. या योजनेच्या माध्यमातून मुंबईतील पात्र महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यास सहकार्य लाभणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने रक्षा क्षेत्र में उत्पादनों के साथ-साथ निर्यात को भी प्रोत्साहन दिया है।

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने रक्षा क्षेत्र में उत्पादनों के साथ-साथ निर्यात को भी प्रोत्साहन दिया है। इसके कारण नागपुर में रक्षा उत्पादन उद्योगों की शुरुआत हुई है। नागपुर रक्षा उत्पादन का प्रमुख केंद्र बन रहा हैइसलिए इस विश्वविद्यालय को विशेष महत्व प्राप्त होगाऐसा मुख्यमंत्री फडणवीस ने कहा।

 

भोसला डिफेंस यूनिवर्सिटी की स्थापना और भविष्य की दिशा को लेकर चर्चा सत्र आयोजित किया गया था। रक्षा उत्पादन करने वाली विभिन्न संस्थाओं ने अपेक्षा जताई कि विश्वविद्यालय के माध्यम से इस क्षेत्र को सहायक पाठ्यक्रम तैयार किए जाएँ। विश्वविद्यालय ने स्नातकडिप्लोमा और मास्टर प्रोग्राम तैयार किए हैं जिनमें रक्षा उत्पादन व तकनीकलीडरशिप एंड मैनेजमेंटइनोवेशन एंड डिजाइनइंटरनेशनल रिलेशन एंड पब्लिक पॉलिसी तथा नॉन कन्वेंशनल डिफेंस स्टडी जैसे पाठ्यक्रमों का समावेश करने का सुझाव दिया गया।

 

भोसला एजुकेशन संस्थान के उपाध्यक्ष शैलेश जोगळेकर ने कहा कि लगभग 52 एकड़ परिसर में डिफेंस यूनिवर्सिटी की शुरुआत हो रही है। इसमें रक्षाउत्पादन और अनुसंधान से संबंधित पाठ्यक्रम शामिल होंगे। यहाँ सुसज्ज प्रयोगशालाएँ और टेस्टिंग फील्ड उपलब्ध होंगी और इसे देश के अग्रगण्य विश्वविद्यालयों में विकसित करने का लक्ष्य है।

Featured post

Lakshvedhi