Monday, 15 September 2025

ह्युंदाई कंपनीने राज्यात अधिकाधिक गुंतवणूक करीत रोजगार निर्मिती वाढवावी

 ह्युंदाई कंपनीने राज्यात अधिकाधिक गुंतवणूक करीत

रोजगार निर्मिती वाढवावी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबईदि. १५ : वाहन उद्योगात ह्युंदाई कंपनीचे मोठे नाव आहे. कंपनीने राज्यातही गुंतवणूक केली आहे. पुणे येथील प्रकल्पातून वाहन उत्पादनात वाढ होणार आहे. ह्युंदाई कंपनीने राज्यात वाहन उद्योगात अधिकाधिक गुंतवणुक करीत रोजगार निर्मितीमध्ये वाढ करावीअसे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी ह्युंदाई कंपनीच्या शिष्टमंडळासोबत आयोजित बैठकीत केले.

ह्युंदाई कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक उन्सू किम यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची भेट घेतली. बैठकीस मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव अश्विनी भिडेउद्योग सचिव डॉ. पी. अनबलगनमुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसेकंपनीचे कार्यकारी संचालक जिओन्जीक लीउपाध्यक्ष (वित्त) सारावनन टीसहायक उपाध्यक्ष पुनीत आनंदकार्तिक एलवरिष्ठ व्यवस्थापक विनोद बनसोड आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi