Monday, 15 September 2025

कोविड काळात सुरू झालेली मिशन वात्सल्य योजना

 

कोविड काळात सुरू झालेली मिशन वात्सल्य योजना अधिक विस्तार करण्याच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आली आहे. राज्यातील सर्व विधवाएकल व परित्यक्त्या महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत आत्मनिर्भरतेकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. या माध्यमातून महिलांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेला बळकटी मिळणार आहे.

-आदिती वरदा सुनिल तटकरे,

महिला व बालविकास मंत्री

 

महाराष्ट्रात नाफेडकडून सध्या कांद्याची विक्री नाही मोठ्या प्रमाणावर विक्री करीत नसल्याबाबत नाफेडचे स्पष्टीकरण

 महाराष्ट्रात नाफेडकडून सध्या कांद्याची विक्री नाही

मोठ्या प्रमाणावर विक्री करीत नसल्याबाबत नाफेडचे स्पष्टीकरण

 

मुंबईदि. 14 - नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड) महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री करत असल्याने कांद्याच्या दरात घट होऊन शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चुकीची माहिती पसरविली जात आहे. याबाबत नाफेड ने स्पष्ट केले आहे कीग्राहक व्यवहार विभाग (DoCA), भारत सरकार यांच्या निर्देशांनुसार नाफेडने या वर्षी महाराष्ट्रात केवळ १२ मेट्रिक टन (MT) कांद्याचीच विक्री केली आहे. या पेक्षा अधिक विक्री झालेली नाही. त्याचप्रमाणे सध्या राज्यात नाफेडकडून कांद्याची विक्री केली जात नसल्याचेही नाफेडच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

 

शेतकऱ्यांचे हित जपणे व बाजारातील स्थिरता राखणे हेच नाफेडचे सर्वोच्च प्राधान्य असून नाफेड शासनाच्या निर्देशांनुसारच सातत्याने कार्यरत राहीलअसे सांगून नाफेड अशा प्रकारच्या खोट्या बातम्या व अफवांचा तीव्र निषेध करते आणि त्या पसरविणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईलअसा इशाराही नाफेड मार्फत देण्यात आला आहे.

00000

पंतप्रधानांच्या 75 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांच्या निबंध आणि चित्रकला स्पर्धा

 पंतप्रधानांच्या 75 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांच्या

निबंध आणि चित्रकला स्पर्धा

 

मुंबईदि. 14 - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दि. 17 सप्टेंबर, 2025 रोजी 75 वा वाढदिवस आहे. या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. 

 

सर्वसाधारणपणे राष्ट्र प्रथमआत्मनिर्भर भारतस्वदेशऑपरेशन सिंदूरपर्यावरण हे या स्पर्धांचे विषय असणार आहेत. यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना वाढीस लागेलअसा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला आहे. 

 

तालुका आणि जिल्हास्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या  या निबंध व चित्रकला स्पर्धांमधील प्रथमद्वितीय व तृतीय क्रमांकावरील विजेत्या स्पर्धकांना सन्मानपत्र / प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. 

जय महाराष्ट्र’ मध्ये कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा ‘शाश्वत पर्यावरण विकास परिषद’ या विषयावर विशेष संवाद*

 जय महाराष्ट्र’ मध्ये कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा शाश्वत पर्यावरण विकास परिषद’ या विषयावर विशेष संवाद*

 

मुंबईदि. 14 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष तसेच मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कृती समितीचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत ते शाश्वत पर्यावरण विकास परिषद’ या महत्त्वपूर्ण विषयावर सविस्तर संवाद साधणार आहेत.

 

ही मुलाखत मंगळवारदि. 16 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येणार असूनमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरदेखील उपलब्ध होईल. ही मुलाखत निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी घेतली आहे.

 

X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

 

दरवर्षी 18 सप्टेंबर रोजी जागतिक बांबू दिन’ साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने वाढत्या जागतिक तापमानवाढीवर तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले असूनया दिशेने भारतासह महाराष्ट्रानेही पुढाकार घेतला आहे. वातावरणीय बदलाच्या आव्हानावर मात करण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण धोरणात्मक पावले उचलली आहेत. याच अनुषंगाने हरित महाराष्ट्र’ घडविण्याच्या संकल्पांतर्गत लाखो हेक्टरवर बांबू लागवड सुरू आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्यउद्योगांना मुबलक कच्च्या मालाचा पुरवठा तसेच पर्यावरणाला शाश्वत दिशा मिळणार आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून 18 सप्टेंबर रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे बांबू परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेसंदर्भात तसेच शासनाच्या विविध उपक्रमांविषयी अध्यक्ष पाशा पटेल यांनी जय महाराष्ट्र’ कार्यक्रमामध्ये सविस्तर माहिती दिली आहे.

०००

शासन आपल्या दारी संकल्पनेच्या माध्यमातून मिशन वात्सल्य योजनेचा सर्व विधवा व एकल महिलांना मिळणार लाभ

 शासन आपल्या दारी संकल्पनेच्या माध्यमातून

मिशन वात्सल्य योजनेचा सर्व विधवा व एकल महिलांना मिळणार लाभ

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई दि. 14 – कोविड 19 या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ बालकांना तसेच विधवा महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता करून देण्याच्या उद्देशाने शासनाने मिशन वात्सल्य योजना यशस्वीपणे राबविली होती. या योजनेची व्याप्ती वाढवून राज्यातील सर्व विधवाएकलपरित्यक्त्या महिलांना 'शासन आपल्या दारीया संकल्पनेनुसार या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

कोविड काळात सुरू केलेल्या मिशन वात्सल्य योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी तालुका स्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. अनाथ मुलेविधवा व एकल महिलांना शासकीय कागदपत्रे व त्यांना लागू होणाऱ्या योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला होता. या योजनेअंतर्गत दोन्ही पालकांचे निधन झालेल्या अनाथ मुलांना शासकीय मदतमृत्यू दाखलाउत्पन्न दाखलाजातीचा दाखलाविधवा पेन्शनरेशनकार्डनिवारा व इतर सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभअत्यावश्यक कागदपत्रे शिबीरांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

आता याच योजनेत सर्व विधवा महिलांचा समोवश करण्यात आला असूनजिल्हास्तरावर विविध शिबीरे व मेळावे आयोजित करून समितीच्या माध्यमातून महिलांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. राज्यातील सर्व एकल महिलांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

 

कोविड काळात सुरू झालेली मिशन वात्सल्य योजना अधिक विस्तार करण्याच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आली आहे. राज्यातील सर्व विधवाएकल व परित्यक्त्या महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत आत्मनिर्भरतेकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. या माध्यमातून महिलांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेला बळकटी मिळणार आहे.


मुख्यमंत्री के हाथों सीओईपी प्रौद्योगिकी विश्वविद्यालय के पुस्तकालय व कंप्यूटर इंजीनियरिंग विभाग की नई इमारत का उद्घाटन नवाचार शोध के लिए उच्च एवं तकनीकी शिक्षा देने वाले संस्थानों को स्वायत्तता देना समय की मांग

 मुख्यमंत्री के हाथों सीओईपी प्रौद्योगिकी विश्वविद्यालय के पुस्तकालय व कंप्यूटर इंजीनियरिंग विभाग की नई इमारत का उद्घाटन

 

नवाचार शोध के लिए उच्च एवं तकनीकी शिक्षा देने वाले संस्थानों को स्वायत्तता देना समय की मांग

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

सीओईपी जीवन गौरव और अभिमान पुरस्कारों का वितरण

 

पुणेदि. 14 सितंबर (जिमाका समाचार सेवा): देश के उच्च एवं तकनीकी शिक्षा देने वाले संस्थानों को नवाचार शोध और सक्षम मानव संसाधन निर्माण के लिए स्वायत्तता देना समय की मांग है और इस दृष्टि से केंद्र एवं राज्य स्तर पर सरकार की ओर से प्रयास शुरू हैंऐसा प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने किया।

 

सीओईपी प्रौद्योगिकी विश्वविद्यालय में पुस्तकालय और कंप्यूटर इंजीनियरिंग की नई इमारत का उद्घाटन तथा इंजीनियरिंग दिवस के अवसर पर आयोजित सीओईपी अभिमान पुरस्कार’ समारोह में मुख्यमंत्री श्री फडणवीस बोल रहे थे। इस अवसर पर उच्च व तकनीकी शिक्षा मंत्री चंद्रकांतदादा पाटीलसीओईपी प्रौद्योगिकी विश्वविद्यालय के कुलगुरु सुनील भरुडकुलसचिव डॉ. दयाराम सोनवणेपूर्व निदेशक शैलेश सहस्त्रबुद्धेपूर्व विद्यार्थी संगठन के अध्यक्ष भरत गीतेसचिव सुजीत परदेशी आदि उपस्थित थे।

 

मुख्यमंत्री फडणवीस ने कहास्वायत्तता मिलने से सीओईपी जैसे संस्थान वैश्विक स्तर पर भागीदारी कर सकेंगेप्रौद्योगिकी का आदान-प्रदान और सहयोगी शोध कर सकेंगे। इससे महाराष्ट्र की 3 ट्रिलियन और भारत की 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था की ओर बढ़ते समय सक्षम मानव संसाधन का सेतु खड़ा होगा। आने वाले समय में अधिक से अधिक संस्थानों को स्वायत्तता देने का राज्य सरकार का रणनीतिक निर्णय हैऐसा मुख्यमंत्री श्री फडणवीस ने स्पष्ट किया।

 

ग्रंथालय व संगणक अभियांत्रिकी विभागाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

 ग्रंथालय व संगणक अभियांत्रिकी विभागाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

 

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील नव्याने बांधलेल्या ग्रंथालय व संगणक अभियांत्रिकी विभागाच्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

१५० वर्षांचा अभिमानास्पद वारसा असलेले केंद्रीय ग्रंथालय आता आधुनिकविशेष उद्देशाने उभारलेल्या इमारतीत स्थलांतरित झाले आहे. हे ग्रंथालय ४ हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाची गरज भागवेल. येथे गेल्या शतकातील मौल्यवान साहित्यसंदर्भग्रंथांचे जतनआधुनिक डिजिटल साधनेसहयोगी अध्ययन व संशोधनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

नवीन संगणक अभियांत्रिकी विभाग अत्याधुनिक प्रयोगशाळा व पायाभूत सुविधांनी सुसज्ज असून नाविन्यपूर्ण संशोधन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील नवकल्पनांचे केंद्र ठरणार आहे.

Featured post

Lakshvedhi