Saturday, 13 September 2025

अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे शेत पिकांच्या नुकसानीपोटी

  शासनातर्फे मदत देण्यास मान्यता देण्यात आलेल्या कोकण विभागातील रायगडरत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जून २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे शेत पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना ३७ लाख ४० हजार रुपये तर नागपूरवर्धाचंद्रपूरहिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यात जून २०२५  ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत शेत पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ५४ लाख ३ हजार मदतीचा समावेश असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितले.

अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे शेत पिकांच्या नुकसानीपोटी रायगड जिल्ह्यातील ९८० बाधित शेतकऱ्यांच्या ५५.६५ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ११ लाख ८१ हजार रुपयेरत्नागिरी जिल्ह्यातील ५६० शेतकऱ्यांच्या ७१.५४ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १२ लाख ९६ हजार रुपये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३३५ शेतकऱ्यांच्या ५०.६४ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १२ लाख ६३ हजार रुपये असे १ हजार ८७५ शेतकऱ्यांच्या १७७.८३ हेक्टरवरील  बाधित झालेल्या पिकांसाठी मदत म्हणून ३७  लाख ४० हजार रुपये इतक्या निधीस मान्यता देण्यात आली आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१ लाख ४३ हजाराच्या मदतीस मान्यता

 आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी

७३ कोटी ९१ लाख ४३ हजाराच्या मदतीस मान्यता

 

मुंबईदि. १२ : राज्यात जून २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधितांना ७३ कोटी ९१ लाख ४३ हजाराच्या मदतीस राज्य शासनाने मान्यता दिली असून याबाबतचे शासन निर्णय जारी करण्यात आले असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितलेनैसर्गिक आपत्तीत बाधित शेतकऱ्यांना मदत आणि दिलासा देण्यास शासनाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. शासनाने बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करुन मदत देण्याच्या घेतलेल्या या निर्णयामुळे अतिवृष्टी व अवकाळी पाऊस या आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना उभारी मिळेलअसा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद  जाधव-पाटील यांनी व्यक्त केला.

ही मदत देण्यास मान्यता देण्यात आलेल्या कोकण विभागातील रायगडरत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जून २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे शेत पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना ३७ लाख ४० हजार रुपये तर नागपूरवर्धाचंद्रपूरहिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यात जून २०२५  ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत शेत पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ५४ लाख ३ हजार मदतीचा समावेश असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितले.

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी ३० सप्टेंबरपर्यंत

अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबई, दि. १२ : जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडू आणि गुणवंत क्रीडा मार्गदर्शकांना गौरवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणांतर्गत जिल्हा क्रीडा पुरस्कार योजना राबविण्यात येत आहे.  इच्छुकांनी  ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी  रश्मी आंबेडकर यांनी केले आहे.

सन २०२४-२५ या वर्षासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील खेळाडू (पुरुषमहिला व दिव्यांग) तसेच क्रीडा मार्गदर्शक या चार गटांतून पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. इच्छुक खेळाडूंनी मुंबई उपनगर च्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी  मनिषा गारगोटे यांच्याशी मो. ८२०८३७२०३४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांनी कळविले आहे.

मुंबई शहर जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन १५ सप्टेंबर रोजी

 मुंबई शहर जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन १५ सप्टेंबर रोजी

 

मुंबईदि. १२ : महिला व बालविकास विभागामार्फत समस्याग्रस्त व पीडित महिलांना आपले प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांचे हक्क संरक्षित व्हावेत या उद्देशाने महिला लोकशाही दिन जिल्हा स्तरावर आयोजित केला जातो.

 मुंबई शहर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात  १५ सप्टेंबर  रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या वेळेत जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुंबई शहर महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

तक्रार दाखल करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय११७बी.बी.डी. चाळपहिला मजलावरळीमुंबई येथे अर्ज करावा. असे मुंबई शहरच्या महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यांनी कळविले आहे.

नवउपक्रम व संशोधन प्रशिक्षण सुविधा असलेला रामटेक

 नवउपक्रम व संशोधन प्रशिक्षण सुविधा असलेला रामटेक येथील प्रकल्प टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणार आहे. या कौशल्यवर्धन केंद्रात इनोवेशनडिझाईन ॲण्ड इन्क्युबेशन यासह नऊ प्रकाराच्या प्रशिक्षणाच्या सुविधा असतील. टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्यामार्फत यापूर्वी गडचिरोलीचंद्रपूर तसेच कर्नाटकतामिळनाडूबिहारआसामगोवाउत्तरप्रदेश व तेलंगणा येथे कौशल्यवर्धन केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.

कौशल्यवर्धन केंद्र इमारत बांधकाम व प्रशिक्षण सुविधांसह ११५ कोटी रूपयांचा प्रकल्प असून टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडतर्फे ९८ कोटी रूपये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे कुशल मनुष्यबळाची वाढती गरज पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात येणार असून उत्पादन क्षेत्रातील आवश्यक असलेले अभियंतेऑपरेटरतंत्रज्ञ आणि मनुष्यबळ निर्माण होईल. या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांनाउद्योग व्यवसायिकांना नवकल्पना आणि कौशल्यविकास याद्वारे उद्योगात कुशल संसाधने आणि उद्योजकात निर्माण होणार असल्याचे टाटा टेक्नॉलॉजीचे प्रकल्प प्रमुख सुशिलकुमार यांनी यावेळी सांगितले.

टाटा टेक्नॉलॉजीतर्फे रामटेक येथे कौशल्यवर्धन केंद्र; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित सामंजस्य करार

 टाटा टेक्नॉलॉजीतर्फे रामटेक येथे कौशल्यवर्धन केंद्र;

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित सामंजस्य करार

 

          दरवर्षी ३ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची सुविधा

          नवउपक्रमासह विविध प्रशिक्षणाची सुविधा

          आधुनिक तंत्रज्ञान व प्रशिक्षीत मनुष्यबळाची निर्मिती

 

नागपूरदि. १२ : टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्यामार्फत रामटेक येथे कौशल्यवर्धन केंद्र (सीआयआयटी) सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेडतर्फे प्रकल्प प्रमुख सुशीलकुमार व महाराष्ट्र शासनातर्फे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या.

रामगिरी येथे नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्यामार्फत खासगी सहभागातून कौशल्यवर्धन केंद्राची उभारणी करण्यासंदर्भात करार झाला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेअर्थ व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वालप्रकल्प समन्वयक प्रितम गंजेवार आदी उपस्थित होते.

रामटेक येथे टाटा टेक्नॉलॉजी लिमिटेड यांच्यामार्फत खासगी सहभागातून सेंटर फॉर इन्व्हेंन्शनइनोवेशनइन्क्युबेशनआणि ट्रेनिंग सेंटर (सीआयआयटी) ची उभारणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक नवउपक्रमावर आधारित प्रशिक्षण देण्‍यासोबतच औद्योगिक उत्पादनास चालना देण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. दरवर्षी ३ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे या करारामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षणाची सुविधा निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Friday, 12 September 2025

Expected Benefits of the Partnership:

 Governor Kim Reynolds expressed optimism, saying, “It is an honor to partner with one of India’s most dynamic states, Maharashtra. This agreement is a strategic step towards promoting innovation, economic growth, and global cooperation. Both states will collaborate on industrial, educational, and agricultural projects, with delegations exchanging visits annually.”

Expected Benefits of the Partnership:

  • Adoption of Iowa’s advanced agri-tech in Maharashtra to boost productivity
  • Growth of food processing industries and increased export opportunities
  • Digital governance, e-services, and smart farming initiatives
  • Enhanced healthcare services through research and training collaborations
  • Skill development and job creation via vocational training and industrial partnerships
  • Expansion of renewable energy projects, reducing pollution and ensuring sustainable growth
  • Promotion of tourism, cultural exchanges, and sports collaborations
  • Increased U.S.–India investments, industrial growth, and direct business partnerships
  • Global exposure for students and researchers through academic linkages
  • Strengthened global reputation of Maharashtra as an industrial and technology partner

Featured post

Lakshvedhi