Saturday, 13 September 2025

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी ३० सप्टेंबरपर्यंत

अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबई, दि. १२ : जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडू आणि गुणवंत क्रीडा मार्गदर्शकांना गौरवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणांतर्गत जिल्हा क्रीडा पुरस्कार योजना राबविण्यात येत आहे.  इच्छुकांनी  ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी  रश्मी आंबेडकर यांनी केले आहे.

सन २०२४-२५ या वर्षासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील खेळाडू (पुरुषमहिला व दिव्यांग) तसेच क्रीडा मार्गदर्शक या चार गटांतून पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. इच्छुक खेळाडूंनी मुंबई उपनगर च्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी  मनिषा गारगोटे यांच्याशी मो. ८२०८३७२०३४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi