बैठकीत पूरव्यवस्थापन, मिरज एमआयडीसी मधील अंतर्गत रस्ते, रांजणी ड्राय पोर्ट, महापालिका ई बस चार्जिंग स्टेशन, शेतीला दिवसा वीजपुरवठा होण्याच्या दृष्टीने सौर ऊर्जा प्रकल्प, शक्तीपीठ महामार्ग, उपसा सिंचन योजना जलवाहिनीसाठी भूमिसंपादन, शिराळा नगरपंचायतीसाठी जुन्या तहसील कार्यालयाची इमारत वापरण्याची परवानगी, कासेगाव पोलीस ठाण्याची इमारत, विनाअनुदानित शाळांना व्यायाम साहित्य पुरवठा, महानगरपालिका इमारत, नाट्यगृह आदिंबाबत उपस्थित आजी माजी लोकप्रतिनिधींनी मौलिक मत मांडले.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Sunday, 17 August 2025
सांगली महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी सादरीकरण ......
महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान, फिश मार्केट बांधणे, काळीखण येथे सुशोभिकरण, कुपवाड वारणाली येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल विकसित करणे, पी.एम.ई. बस सेवा योजनेंतर्गत बस टर्मिनस बांधणे, सांगली हनुमाननगर येथे महानगरपालिकेचे नाट्यगृह व बहुउद्देशीय हॉल बांधणे, महापालिकेचे व्यापारी संकुल व प्रसूतिगृह इमारत बांधणे, महापालिका क्षेत्रात जागतिक बँक पुरस्कृत महाराष्ट्र प्रतिसादात्मक विकास कार्यक्रम अंतर्गत पावसाळी पाण्याचे नियोजन करणे आदिंबाबत सविस्तर सादरीकरण केले.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ,सांगली तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त अनुदान
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ,सांगली तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त अनुदान व प्रत्यक्ष खर्च, मॉडेल स्कूल व स्मार्ट पीएचसी व फलनिष्पत्ती, केंद्र व राज्य आवास योजना, जल जीवन मिशन, घरगुती नळ जोडणी, आरटीई प्रवेश व प्रतिपूर्ती आदिंबाबत सविस्तर सादरीकरण केले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगली जिल्ह्यातील......
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगली जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती, कृषि सिंचन व उत्पादन, औद्योगिक व आर्थिक विकास, पायाभूत सुविधा, प्रलंबित कामे व अपेक्षा, पर्यटन, पूरनियंत्रण, आरोग्य, विद्युत, सौर प्रकल्प, रोजगार निर्मिती, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, सांगली जिल्ह्यातील लोकांच्या प्रमुख अपेक्षा, अडचणींवर मात करण्याच्या उपाययोजना आदिंबाबत सविस्तर सादरीकरण केले.
राज्य शासनाने 10 कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट
राज्य शासनाने 10 कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट ठेवले असून, 150 दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यात योग्य नियोजन करून जास्तीत जास्त प्रमाणात वृक्षारोपण करण्यात यावे, असे सांगून सांगली महानगरपालिका इमारतीसाठी निधी, महापालिका क्षेत्रात पीएम ई बस चार्जिंग स्टेशन, नाट्यगृह व ऑडिटोरियम आदिंबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
सलगरेचे मल्टीमोडल लॉजस्टिक पार्क, शक्तीपीठ महामार्ग आदि प्रश्नी योग्य तो मार्ग काढू,
रांजणीचे प्रस्तावित ड्राय पोर्ट, सलगरेचे मल्टीमोडल लॉजस्टिक पार्क, शक्तीपीठ महामार्ग आदि प्रश्नी योग्य तो मार्ग काढू, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यास प्राधान्य द्यावे. जिल्हा नियोजन समितीचा निधी योग्य कामांवर व विहित वेळेत खर्च करावा. निधीचा अपव्यय होणार नाही, कामे दर्जेदार होतील, याकडे लक्ष द्यावे. तसेच, जिल्हा नियोजन समितीमधून स्थानिक स्वराज्य सस्थांना मिळणारा निधी कोणत्याही परिस्थितीत अखर्चित राहणार नाही, याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे त्यांनी सूचित केले.
ॲग्री हॅकेथॉन भरवण्यासाठी सांगली जिल्ह्याने पुढाकार घ्यावा
ॲग्री हॅकेथॉन भरवण्यासाठी सांगली जिल्ह्याने पुढाकार घ्यावा. त्याचा फळ उत्पादक व अन्य शेतकऱ्यांना लाभ होईल, असे सूचित करून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सांगली जिल्ह्यातून द्राक्ष, डाळिंब, केळी निर्यात मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्या अनुषंगाने द्राक्ष निर्यातीसाठी रेसिड्यू लॅबसाठी कृषि विभागाने आवश्यक कार्यवाही करावी. तसेच, कृषि क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधी यशस्वी प्रयोग झाले आहेत. पाणी, खत बचत आणि जास्त टनेज यासाठी एआयचा चांगला उपयोग होतो. सांगली जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदारांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करावा. त्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम करावे, असे त्यांनी सूचित केले.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...