Saturday, 16 August 2025

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी

 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी

'ऑपरेशन सिंदूरआणि 'स्वदेशीविषयी जनजागृती करावी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा

गणेशोत्सव निमित्त कायदा व सुव्यवस्था बैठक

मुंबईदि. 13 : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये भारताने जगाला ऑपरेशन सिंदूरद्वारे दाखविलेली शक्ती आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करावी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनासोबत समन्वय ठेवून हा गणेशोत्सव शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावाअसे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करीत ऑपरेशन सिंदूरवर आधारित देखावे हे जवानांसाठी समर्पित असण्याची अपेक्षाही व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवा दरम्यान गणेश भक्तांना कुठल्याही प्रकारे अडचणी येणार नाहीतत्यापद्धतीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या. सार्वजनिक गणेशोत्सव निमित्त कायदा व सुव्यवस्था बैठकीचे आयोजन सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. 

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाप्रमाणे मूर्तीकरांनाही सलग पाच वर्ष परवानगी देण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेमूर्तीकारांनी या परवान्यांचे दरवर्षी नूतनीकरण करावे. परवानगीसाठी महापालिके मार्फत सुरू करण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीवर आधारित एक खिडकी योजनेचा लाभ घेण्यात यावा. गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावांची संख्या आणि उंच मूर्तींचे खोल समुद्रात विसर्जनासाठी बोटींची संख्याही समुद्रकिनारी वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

देशातील सगळ्यात मोठी मेट्रो प्रशिक्षण संस्था मुंबई मुंबई मेट्रो प्रशिक्षण संस्था (एमएमटीआय) चे अनावरण

 देशातील सगळ्यात मोठी मेट्रो प्रशिक्षण संस्था मुंबई

मुंबई मेट्रो प्रशिक्षण संस्था (एमएमटीआय) चे अनावरण

• एमएमआरडीएमार्फत 300 कि.मी.हून अधिक प्रस्तावित मेट्रो प्रकल्पांसाठी कुशल आणि सक्षम मनुष्यबळ घडवणे याकरिता प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊनमुं.प्र.वि.प्रा. मार्फत मुंबई मेट्रो प्रशिक्षण संस्था (एमएमटीआय) मंडाले डेपो येथे विकसित करण्यात आली आहे.

• प्रकल्पाच्या पहिला टप्प्यात प्रगत मेट्रो ड्रायव्हिंग सिम्युलेटर, 12 मॉड्यूल देखभाल सिम्युलेटरसैद्धांतिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण कक्ष इत्यादी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. प्रशिक्षण केंद्राचा एकूण बांधकामसिम्युलेटर आणि प्रणाली या करिता रुपये 69 कोटी इतका खर्च झाला आहे.

• या केंद्रामुळे प्रशिक्षणाचा दर्जा वाढेलखर्चाची बचत होईलतसेचकर्मचाऱ्यांची आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची तयारी व देखभाल कौशल्ये इ. विकसित होतील. या केंद्रामुळे पुढील 10 वर्षांत आवश्यकप्रशिक्षणावरीलसुमारे 225 कोटी रुपयांची बचत होईल.

• निवासी सुविधाडिजिटल-आधारित शिक्षण व जागतिक मानकांची पायाभूत व्यवस्था यामुळे हे केंद्र केवळ मुंबईसाठीच नव्हे तर देशभरातील मेट्रो प्रकल्पांसाठी उपयुक्त ठरेल.

मालवणी, मालाड (प), मुंबई येथील कर्मचारी निवासस्थान इमारत

 मालवणीमालाड (प)मुंबई येथील कर्मचारी निवासस्थान इमारत

• मुंबई महानगर क्षेत्रात (MMR), मुं.म.प्र.वि.प्रा मार्फत एकूण 337 कि.मी. लांबीचे मेट्रो रेल्वेचे विस्तृत जाळे उभारले जात आहे. मेट्रो संचलनासाठी अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय करणेकरीता विस्तृत प्रकल्प अहवालांमध्ये (DPR) विविध मेट्रो डेपोच्या ठिकाणी कर्मचारी निवास्थाने बांधणे प्रस्तावित होते.

• त्याप्रमाणेमेट्रो मार्ग 2-अ च्या चारकोपमालवणी येथील मेट्रो डेपोच्या जागेमध्ये एकूण चार इमारती कर्मचारी निवास्थानांसाठी व एक इमारत वाहनतळासाठी बांधण्यात येत आहेत. यापैकी दोन इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

• या दोन इमारतींमध्ये एकूण 156 सदनिका असूनइमारत 'अ मध्ये 1 बेडरुम-हॉल- किचन असलेल्या 78 सदनिका असून इमारत 'ब मध्ये 2 बेडरुम-हॉल-किचन असलेल्या 78 सदनिका आहेत. 1 बेडरुम हॉल- किचन असणाऱ्या सदनिकेचे चटई क्षेत्रफळ 655 स्क्वे. फूट असून 2 बेडरुम-हॉल- किचन चे चटई क्षेत्रफळ 885 स्क्वे. फूट इतके आहे. या दोन इमारतींचा एकूण बांधकाम खर्च 90 कोटी रु. इतका आहे.

कलानगर उड्डाणपुलाचा आर्म डी (सायन-वांद्रे लिंक रोडपासून वांद्रे वरळी सी लिंककडे)

 कलानगर उड्डाणपुलाचा आर्म डी (सायन-वांद्रे लिंक रोडपासून वांद्रे वरळी सी लिंककडे)

• कलानगर उड्डाणपुलाचे टप्याटप्याने काम पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण करण्यात आले असून त्याचा धारावी ते वांद्रे वरळी सी लिंक या उन्नतमार्गाचा आर्म डी हा अंतिम भाग वाहतुकीसाठी खुला होत आहे.

• कलानगर उड्डाणपुलाचा धारावीच्या दिशेने येणारा हा उपउड्डाणपूल सायन-बांद्रा लिंक रोडला थेट बांद्रा-वरळी सी लिंकशी जोडला जातो. या 340 मीटर लांबी आणि 8.5 मीटर रुंदीच्या पुलासाठी 20 कोटी रुपये इतका खर्च झाला आहे.

• उपउड्डाणपूल केवळ एक रस्ता नसून मुंबईच्या पश्चिम भागाला धारावीशी जोडणारा सी-लिंक हा एक महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे कलानगर जंक्शनवरील वाहतूक कोंडी कमी होईल. मुंबईसारख्या वेगाने धावणाऱ्या शहरात, ही केवळ काही मिनिटांची नव्हे, तर दररोज हजारो तासांची बचत होईल.

मालवणी, मालाड (प), मुंबई येथील कर्मचारी निवासस्थान इमारत

 मालवणीमालाड (प)मुंबई येथील कर्मचारी निवासस्थान इमारत

• मुंबई महानगर क्षेत्रात (MMR), मुं.म.प्र.वि.प्रा मार्फत एकूण 337 कि.मी. लांबीचे मेट्रो रेल्वेचे विस्तृत जाळे उभारले जात आहे. मेट्रो संचलनासाठी अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय करणेकरीता विस्तृत प्रकल्प अहवालांमध्ये (DPR) विविध मेट्रो डेपोच्या ठिकाणी कर्मचारी निवास्थाने बांधणे प्रस्तावित होते.

• त्याप्रमाणेमेट्रो मार्ग 2-अ च्या चारकोपमालवणी येथील मेट्रो डेपोच्या जागेमध्ये एकूण चार इमारती कर्मचारी निवास्थानांसाठी व एक इमारत वाहनतळासाठी बांधण्यात येत आहेत. यापैकी दोन इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

• या दोन इमारतींमध्ये एकूण 156 सदनिका असूनइमारत 'अ मध्ये 1 बेडरुम-हॉल- किचन असलेल्या 78 सदनिका असून इमारत 'ब मध्ये 2 बेडरुम-हॉल-किचन असलेल्या 78 सदनिका आहेत. 1 बेडरुम हॉल- किचन असणाऱ्या सदनिकेचे चटई क्षेत्रफळ 655 स्क्वे. फूट असून 2 बेडरुम-हॉल- किचन चे चटई क्षेत्रफळ 885 स्क्वे. फूट इतके आहे. या दोन इमारतींचा एकूण बांधकाम खर्च 90 कोटी रु. इतका आहे.

देशातील सगळ्यात मोठी मेट्रो प्रशिक्षण संस्था मुंबई मुंबई मेट्रो प्रशिक्षण संस्था (एमएमटीआय) चे अनावरण

 देशातील सगळ्यात मोठी मेट्रो प्रशिक्षण संस्था मुंबई

मुंबई मेट्रो प्रशिक्षण संस्था (एमएमटीआय) चे अनावरण

• एमएमआरडीएमार्फत 300 कि.मी.हून अधिक प्रस्तावित मेट्रो प्रकल्पांसाठी कुशल आणि सक्षम मनुष्यबळ घडवणे याकरिता प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊनमुं.प्र.वि.प्रा. मार्फत मुंबई मेट्रो प्रशिक्षण संस्था (एमएमटीआय) मंडाले डेपो येथे विकसित करण्यात आली आहे.

• प्रकल्पाच्या पहिला टप्प्यात प्रगत मेट्रो ड्रायव्हिंग सिम्युलेटर, 12 मॉड्यूल देखभाल सिम्युलेटरसैद्धांतिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण कक्ष इत्यादी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. प्रशिक्षण केंद्राचा एकूण बांधकामसिम्युलेटर आणि प्रणाली या करिता रुपये 69 कोटी इतका खर्च झाला आहे.

• या केंद्रामुळे प्रशिक्षणाचा दर्जा वाढेलखर्चाची बचत होईलतसेचकर्मचाऱ्यांची आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची तयारी व देखभाल कौशल्ये इ. विकसित होतील. या केंद्रामुळे पुढील 10 वर्षांत आवश्यकप्रशिक्षणावरीलसुमारे 225 कोटी रुपयांची बचत होईल.

• निवासी सुविधाडिजिटल-आधारित शिक्षण व जागतिक मानकांची पायाभूत व्यवस्था यामुळे हे केंद्र केवळ मुंबईसाठीच नव्हे तर देशभरातील मेट्रो प्रकल्पांसाठी उपयुक्त ठरेल.

दक्षिण आशियातील 100 मीटर त्रिज्येची वक्रता असलेला पहिलाच केबल स्टेड ब्रीज आहे.

 केबल स्टेड ब्रीजमध्ये 215 मीटर लांबीचा स्पॅनआहे. तसेच हा दक्षिण आशियातील 100 मीटर त्रिज्येची वक्रता असलेला पहिलाच केबल स्टेड ब्रीज आहे. ज्यामध्ये ऑथॉट्रॉफिक स्टीलडेकचा समावेश आहे. ब्रीजमधील केबल स्टेड ब्रीजच्या सुपरस्ट्रक्चरचा भार केबलद्वारे 'वाय 'आकाराच्या एका पायलॉनवर हस्तांतरीत होत असल्यामुळे ब्रीजच्या-पिअर्सची संख्या कमी होण्यास मदत झाली आहे. केबल स्टेड ब्रीजची रुदी 10.50 मी. ते 17.20 मी. पर्यंत असून हा दोन मार्गिकेचा ब्रीज आहे. सदर ब्रीज जमिनीपासून सुमारे 25 मीटर उंचीवर असून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाकोला फ्लायओव्हर वरून जातो. पुढे हि मार्गिका सांताक्रुझ येथील पानबाई इंटरनॅशनल स्कूलजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गामध्ये विलीन होते.

Featured post

Lakshvedhi