Tuesday, 12 August 2025

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ घर तसेच आंबडवे परिसर विकसित करण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव तयार करा

 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ घर तसेच आंबडवे परिसर

विकसित करण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव तयार करा

- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

 

 मुंबई, दि. 12 : रत्नागिरी जिल्ह्यात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ घर व आंबडवे परिसर विकसित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पहिला व दुसरा टप्पा असे प्रस्ताव तयार करावेत, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.

                मंत्रालयात आयोजित बैठकीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ घर व  आंबडवे परिसर विकसित करण्याबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट बोलत होते. यावेळी राज्यमंत्री योगेश कदम, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, दूरदृश्यप्रणालीव्दारे आयुक्त दीपा मुधोळकर, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम.देवेंदरसिंह उपस्थित होते.

                मंत्री श्री. शिरसाट म्हणाले की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ घर व आंबडवे परिसराचा परिपूर्ण विकास करण्यासाठी तातडीने जिल्हाधिकारी यांनी कार्यवाही करावी. स्मारक तसेच परिसर विकासासाठी बार्टीच्या सहाय्याने  शैक्षणिक उपक्रम देखील या परिसरात सुरू करावे. स्मारकासाठी लागणाऱ्या जागेचे भूसंपादन करण्यासाठी स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन कार्यवाही करावी. ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे असे हे ठिकाण असल्याने त्या दृष्टीने या परिसरात काम करण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची स्थापना करून सर्व कामांची माहिती या समितीसमोर सादर करावी, अशा सूचना मंत्री श्री.शिरसाट यांनी यावेळी दिल्या.

स्मारक उभारण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करणे, स्मारकारसाठी आवश्यक जमीनीचे भूसंपादन करणे, वास्तुविशारद नेमणूक, स्मारकाचे  बांधकाम, प्रकल्पाचे टप्पे, मौजे आंबडवे येथील नागरिकांनाच्या पुनर्वसनाबाबत योग्य ती कार्यवाही करण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी. सर्व कामांसाठी दोन टप्प्यात प्रस्ताव सादर करावेत, असे मंत्री श्री. शिरसाट यांनी सांगितले.

                                                            ***

संध्या गरवारे/विसंअ/


फुलांना शेतमाल नियमानाखाली आणून खरेदी विक्री बाजारपेठेसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त युक्त जागा उपलब्ध करुन द्यावी

 फुलांना शेतमाल नियमानाखाली आणून खरेदी विक्री बाजारपेठेसाठी

अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त युक्त जागा उपलब्ध करुन द्यावी

- पणन मंत्री जयकुमार रावल

 

मुंबईदि. १२ : राज्यात मोठ्या प्रमाणात फुलांचे उत्पादन होते. जानेवारी आणि फेब्रुवारी वगळता मुंबई हे फुलांचे सर्वात मोठे खरेदी विक्री केंद्र आहे. वर्षभर या ठिकाणी फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात होते. फुल हा शेतमाल नियमनाखाली नसल्याने आणि सर्व सुविधायुक्त स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. बृहन्मुंबईत फुलांची स्वतंत्र बाजारपेठ सुरू करणे आवश्यक आहे. त्यासाठी तातडीने कार्यवाही करुन दादरगोरेगाव अथवा नवी मुंबई येथे अत्याधुनिक सोयी-सुविधांयुक्त फुल बाजारासाठी जागा शोधून ती उपलब्ध करून देण्यात यावीअसे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीच्या ठिकाणी शेतकरीव्यापारी आणि ग्राहकांच्या सोयीच्या ठिकाणी एक अत्याधुनिक आणि सोयी सुविधांनी युक्त अशी बाजारपेठ असावी या मागणीसाठी दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनच्या प्रतिनिधींनी मंत्री श्री.रावल यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत आमदार मनिषा चौधरीपणन विभागकृषी उत्पन्न बाजार समितीबृहन्मुंबई महानगरपालिका आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पणन मंत्री श्री.रावल म्हणालेराज्यात मोठ्या प्रमाणात फुलांची शेती केली जाते. मुंबईत फुलांची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. फुल निर्यातीच्याही संधी आहेत. मात्र फुलांची सर्व सुविधायुक्त बाजारपेठ असणे आवश्यक आहे. दादर येथे माँसाहेब मीनाताई ठाकरे फुल बाजारपेठेची अस्तित्वातील जागा लहान असल्याने तिचा पुनर्विकास होणार असल्यास महानगरपालिकेमार्फत तेथे आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. ही जागा अपुरी असल्यास गोरेगाव येथे उपलब्ध असलेल्या जागेत अथवा नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात जागा उपलब्ध करुन देण्यात यावी. परळ येथील कामगार मैदान येथे सकाळी ५ ते ९ या वेळेत जागा उपलब्ध होऊ शकेल काया पर्यायांचाही विचार करण्यात यावाअसेही त्यांनी यावेळी सुचविले.

मुंबई शहर हे देशाची आर्थिक राजधानी आहे. पॉलिहाऊस आणि शेडनेट मध्ये दर्जेदार फुलांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून बृहन्मुंबईमध्ये अत्याधुनिक कट फ्लॉवर्स बाजार असणे गरजेचे आहेअशी मागणी असोसिएशनच्या वतीने यावेळी करण्यात आली.

कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभ 2025’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

  

कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभ 2025’चे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

 

मुंबईदि. १२ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या पुण्यतिथीनिमित्त "कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभ 2025" चे आयोजन महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाकुर्ला क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. पारंपरिक खेळांचे जतन आणि प्रसार करणाऱ्या या महाकुंभचे उद्घाटन १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.  

कौशल्यरोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या महाकुंभात क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे अध्यक्षस्थानी असतील तर कुस्तीवीर खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजीत खाशाबा जाधव यांची विशेष उपस्थिती असणार  आहे.

कौशल्य विकास विभाग आणि क्रीडाभारती यांच्या संयुक्त विद्यमाने "कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभ 2025" चे आयोजन 13 ते 22 ऑगस्ट दरम्यान कुर्ला येथील क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. या महाकुंभात एकूण 16 प्रकारच्या पारंपरिक खेळांच्या स्पर्धा होणार असूनमल्लखांबकबड्डीखो-खोभालाफेकविटी - दांडूकुस्तीलगोरी,  लंगडीरज्जूमलखांबपारंपरिक धाव स्पर्धा इत्यादी स्पर्धांचा समावेश असणार आहे. पारंपरिक खेळांचे जतन आणि प्रसार हे या स्पर्धांचे वैशिष्ठ आहे. कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभमध्ये युवक-युवतींमध्ये शारीरिक तंदुरूस्तीसंघभावना आणि स्पर्धात्मकता वाढवण्याच्या हेतूने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

मागील वर्षी या उपक्रमात जवळपास एक लाखांहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यंदादेखील राज्यातील विविध जिल्ह्यातून खेळाडू यात सहभागी होणार आहेत. यावेळी युवक-युवतींना पारंपरिक खेळांविषयी मार्गदर्शनही केले जाणार आहे.

०००

दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा

 दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. १२ : मुंबई महानगर क्षेत्रांत प्रवेश करताना मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोल नाक्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन अनावश्यक इंधनाचा अपव्यय होतो. तसेच वाहनांच्या प्रदुषणामुळे पर्यावरणाची देखील हानी होते. त्यासाठी दहिसर टोल नाका पुढे २ किलोमीटर अंतरावरील वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मंत्री श्री. सरनाईक म्हणालेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील अनेक टोल नाके रद्द केले तसेच सर्व टोल नाक्यावरील लहान वाहनांना टोलमाफी केली. या निर्णयाचे सर्वसामान्य जनतेने स्वागत केले आहे. दहिसर टोल नाक्यामुळे मिरा भाईंदर शहरातील १५ लाख स्थानिक नागरिकवाहनचालकतसेच मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाढत असून इंधनाचा विनाकारण अपव्यय होत आहे.

परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कीमीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील हा टोल नाका शहराच्या आत असल्यानेवाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा टोल नाका २ किलोमीटर अंतरावरील वेस्टर्न हॉटेलसमोर हलवावा. यामुळे मीरा-भाईंदर व मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होईल.

या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न सोडवला जाईल अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे ही मागणी मान्य झाल्यासस्थानिक नागरिकांना टोलमुक्त प्रवासाचा लाभ मिळेल आणि वाहतुकीवरील ताण कमी होईलअसा विश्वासही परिवहन मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

रक्षाबंधन निमित्त प्रवासी वाहतुकीतून एसटीला १३७ कोटी रुपयांचे उत्पन्न

 रक्षाबंधन निमित्त प्रवासी वाहतुकीतून

एसटीला १३७ कोटी रुपयांचे उत्पन्न

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. १२ : यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे ८ ते ११ ऑगस्ट २०२५ या चार दिवसांमध्ये प्रवाशी वाहतुकीतून एसटीला १३७.३७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे ११ ऑगस्टला एका दिवशी तब्बल ३९ कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहेअशी माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

      मंत्री श्री. सरनाईक म्हणालेदरवर्षी एसटीला रक्षाबंधन आणि भाऊबीज (दिवाळी ) या दोन दिवसात विक्रमी उत्पन्न मिळत असते. कारणया दिवशी भाऊ बहिणीकडे किंवा बहिण भावाकडे असे प्रवासी दळणवळण मोठ्या प्रमाणामध्ये होते. परिणामीगेली कित्येक वर्ष रक्षाबंधन सणाच्या कालावधी एसटीला त्या वर्षातील विक्रमी उत्पन्न मिळत आले आहे. यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ३०.०६ कोटी रुपये,  रक्षाबंधन दिवशी म्हणजे शनिवारी ३४.८६ कोटी व दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी ३३.३६ कोटी रुपये तर सोमवारी तब्बल ३९.९ कोटी इतके विक्रमी उत्पन्न एसटीला मिळाले आहे. रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने ८ ते ११ ऑगस्ट या ४ दिवसात १ कोटी ९३ लाख प्रवाशांनी एसटीमधून सुरक्षित प्रवास केला आहे. त्यामध्ये महिला प्रवाशांची संख्या तब्बल ८८ लाख आहे.

                रक्षाबंधन सणानिमित्त एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल एसटी महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी आभार मानले आहेत. तसेच आपल्या घरी सण असून देखील कर्तव्याला प्राधान्य देत अत्यंत मेहनतीने काम करुन विक्रमी उत्पन्न आणणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे मंत्री श्री. सरनाईक यांनी अभिनंदन केले आहे.

कर्ज प्रक्रिया सुटसुटीत होणार, प्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यास चालना मिळणार NSCFDC ,(NSKFDC

 

कर्ज प्रक्रिया सुटसुटीत होणारप्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यास चालना मिळणार

 


महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या दोन लाख रुपयांपर्यतच्या कर्ज योजनेसाठी लाभार्थ्यांच्या मालमत्तेवर किंवा एका जामिनदाराच्या स्थावर मालमत्तेवर बोजा चढविण्यास मान्यता देण्यात आली. दोन ते पाच लाखापर्यंतच्या कर्जासाठी पूर्वी दोन जामिनदारांची अट होती. आता त्याऐवजी एका जामिनदारांची तरतूद करण्यात आली आहे. हा जामिनदार स्थावर मालमत्ता किंवा नावावर जमीन असलेला किंवा खासगी क्षेत्रातील नोकरदार किंवा शासकीयनिमशासकीयशासकीय अनुदानित संस्थेतील नोकरदार असावाअशी तरतूद करण्यात आली आहे. याचबरोबर लाभार्थी आणि जामिनदारांच्या स्थावर मालमत्तेवर बोजा चढविला जाणार आहे.

राष्ट्रीय अनुसूचित जाती मागासवर्ग वित्तीय विकास महामंडळ (NSCFDC), राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्तीय विकास महामंडळ (NSKFDC) यांच्या योजना राज्यातील महामंडळामार्फत राबविण्यात येतात. यासाठी राष्ट्रीय महामंडळाकडून राज्य महामंडळास कर्ज स्वरूपात निधी उपलब्ध करून दिला जातो. या कर्जनिधीमधून मुदती कर्ज योजनाबीज भांडवल योजना लघुऋण वित्त योजनातसेच शैक्षणिक कर्ज योजना राबविल्या जातात.

या योजना राबविण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळास ६०० कोटीसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळास १०० कोटीआणि संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळास ५० कोटी रुपयांच्या शासन हमीस पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात आली.  यामुळे प्रलंबित कर्ज प्रकरणे निकाली निघतील त्याचबरोबर नवीन लाभार्थ्यांनाही कर्ज मिळेल.

000

तीन महामंडळाच्या कर्ज योजनेतील जामिनदारांच्या अटी शिथिल, शासन हमीस पाच वर्षे मुदतवाढ

 तीन महामंडळाच्या कर्ज योजनेतील जामिनदारांच्या अटी शिथिलशासन हमीस पाच वर्षे मुदतवाढ

कर्ज प्रक्रिया सुटसुटीत होणारप्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यास चालना मिळणार

 

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळसंत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ यांच्या विविध योजनांतर्गत कर्ज प्रकरणातील जामिनदाराबाबतच्या अटी आणि शर्तीमध्ये सुधारणा करण्यास तसेच महामंडळाना देण्यात येणाऱ्या शासन हमीस पाच वर्षांची मुदतवाढ देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे लघुउद्योजकांना कर्ज घेण्याची प्रक्रिया आधिक सुटसुटीत होणार तसेच प्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यास चालना मिळणार आहे.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळसंत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडून स्वतःच्या आणि राष्ट्रीय महामंडळाच्या विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये मुदत कर्ज योजनाऋण योजना आणि बीज भांडवल योजना यांचा समावेश आहे.

महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या दोन लाख रुपयांपर्यतच्या कर्ज योजनेसाठी लाभार्थ्यांच्या मालमत्तेवर किंवा एका जामिनदाराच्या स्थावर मालमत्तेवर बोजा चढविण्यास मान्यता देण्यात आली. दोन ते पाच लाखापर्यंतच्या कर्जासाठी पूर्वी दोन जामिनदारांची अट होती. आता त्याऐवजी एका जामिनदारांची तरतूद करण्यात आली आहे. हा जामिनदार स्थावर मालमत्ता किंवा नावावर जमीन असलेला किंवा खासगी क्षेत्रातील नोकरदार किंवा शासकीयनिमशासकीयशासकीय अनुदानित संस्थेतील नोकरदार असावाअशी तरतूद करण्यात आली आहे. याचबरोबर लाभार्थी आणि जामिनदारांच्या स्थावर मालमत्तेवर बोजा चढविला जाणार आहे.

Featured post

Lakshvedhi