Monday, 11 August 2025

कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपारिक क्रीडा महाकुंभ २०२५’चे१३ ते २२ ऑगस्ट दरम्यान

 कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपारिक क्रीडा महाकुंभ २०२५चे

क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेत होणार उद्घाटन

कौशल्यरोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांची विशेष उपस्थिती

 

मुंबईदि. ११ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या पुण्यतिथीनिमित्त "कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपारिक क्रीडा महाकुंभ २०२५" चे आयोजन  महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाकुर्ला क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. पारंपारिक खेळांचे जतन आणि प्रसार करणाऱ्या या महाकुंभचे उद्घाटन १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेत होणार आहे. यावेळी कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढाकुस्तीगीर खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजीत खाशाबा जाधव यांची विशेष उपस्थिती असणार  आहे.

कौशल्य विकास विभाग आणि क्रीडाभारती यांच्या संयुक्त विद्यमाने "कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपारिक क्रीडा महाकुंभ २०२५" चे आयोजन १३ ते २२ ऑगस्ट दरम्यान कुर्ला येथील क्रीडा संकुलात करण्यात आले आहे.  या महाकुंभात एकूण १६ प्रकारच्या पारंपारिक खेळांच्या स्पर्धा होणार असूनमल्लखांबकबड्डीखो-खोभालाफेकविटी - दांडूकुस्तीलगोरी,  लंगडीरज्जूमलखांबपारंपारिक धाव स्पर्धा इत्यादी स्पर्धांचा समावेश असणार आहे. पारंपारिक खेळांचे जतन आणि प्रसार हे या स्पर्धांचे वैशिष्ट्य आहे. कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपारिक क्रीडा महाकुंभमध्ये युवक-युवतींमध्ये शारीरिक तंदुरूस्तीसंघभावना आणि स्पर्धात्मकता वाढवण्याच्या हेतूने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

मागील वर्षी या उपक्रमात जवळपास एक लाखांहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यंदादेखील राज्यातील विविध जिल्ह्यातून खेळाडू यात सहभागी होणार आहेत. या महाकुंभ कालावधीत खेळाडूंना पारंपरिक खेळांविषयी मार्गदर्शनही केले जाणार आहे.

0000

उदगीर येथील शासकीय दूध भुकटी प्रकल्प पुन्हा सुरू करणार प्रस्ताव

 उदगीर येथील शासकीय दूध भुकटी प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील. मदर डेअरीच्या सहकार्याने हा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव सादर करावात्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईलअसे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नमूद केले. जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी जुन्या सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीची कामे गतीने पूर्ण करावीत. घरणीतिरू आणि देवर्जन या प्रकल्पांतून जलवाहिनींद्वारे सिंचनासाठी पाणी वितरण करण्याबाबत उपयुक्तता तपासून प्रस्ताव सादर करावाअसे त्यांनी सांगितले. तसेचहाडगा आणि मसलगा सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीची कामे तात्काळ पूर्ण करावीत. पांदण रस्त्यांवरील विद्युत खांब तातडीने हटवून रस्त्यावरील अडथळे दूर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले.


रेल्वे बोगी कारखान्यातील रोजगारासाठी स्थानिकांना प्राधान्य द्या

 रेल्वे बोगी कारखान्यातील रोजगारासाठी स्थानिकांना प्राधान्य द्या

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•          लातूर जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा

•          जुन्या सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीला गती देण्याचे निर्देश

•          शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रेल्वेची जागा देण्याबाबत तोडगा काढणार

लातूरदि. ११ (जिमाका) : लातूर जिल्ह्यात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी रेल्वे बोगी कारखान्याची उभारणी करण्यात आली आहे. या कारखान्यात लवकरच वंदे भारत रेल्वेच्या बोगींचे उत्पादन सुरू होणार असूनयामुळे सुमारे दहा हजार रोजगार निर्माण होतील. यामध्ये स्थानिक युवक-युवतींना प्राधान्य द्यावेअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या जिल्ह्यातील विकासकामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरेआमदार विक्रम काळेआमदार संभाजी पाटील-निलंगेकरआमदार संजय बनसोडेआमदार अभिमन्यू पवारआमदार रमेश कराडमाजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकरमाजी आमदार गोविंद केंद्रेविशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमापजिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीनापोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्रीमती मानसी उपस्थित होते. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत लातूर शहर वाढीव पाणीपुरवठा योजनाजिल्हा रुग्णालय आदीबाबत यावेळी आढावा घेण्यात आला.

रेल्वे बोगी कारखान्यासाठी स्थानिक स्तरावर कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील आयटीआय आणि पॉलिटेक्निक संस्थांमध्ये आवश्यक ट्रेड्स सुरू करून युवकांना प्रशिक्षण द्यावे. यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेलअसे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रेल्वेची जागा हस्तांतरित करण्याबाबत रेल्वे प्रशासनासोबत बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढला जाईलअसेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमाच्या कामांना गती देण्याचे निर्देश

 प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमाच्या कामांना गती देण्याचे निर्देश

- अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे

 

मुंबई, दि. 23 : प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत विविध विकास कामे करण्याकरता आवश्यक प्रस्ताव सादर करणेअल्पसंख्याक बहुल ग्रामीण तसेच शहरी क्षेत्रातील वस्तीमध्ये पायiभूत सुविधा निर्माण करण्याकरिता वितरित केलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे तसेच शासनाच्या विविध योजनाची अंमलबजावणी प्रभावीरित्या करण्याबाबत जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी यांना अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे यांनी  निर्देश दिले.

या कार्यक्रमाअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सचिव रूचेश जयवंशीसहसचिव किरण वाघोलअवर सचिव मिलिंद शेणॉय तसेच राज्यातील सर्व जिल्हा नियोजन अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.भरणे म्हणाले कीप्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत अल्पसंख्याक बहुल क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधा उभारणेमागास भागांचा विकास आणि सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कामे सुरू आहेत. विभागाकडून मिळणारा निधी योग्य पद्धतीने वापरणे आवश्यक आहे. निधी उपयोगिता प्रमाणपत्र सादर झाल्यास पुढील निधी उपलब्ध करून विकासकामांना गती देता येईल.

000

राज्यात ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ स्थापन करणार,संगणक केंद्रे व प्रवेश मार्गदर्शनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

 राज्यात विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ स्थापन करणार

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  • संगणक केंद्रे व प्रवेश मार्गदर्शनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

मुंबईदि. २३ : ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत सुलभता व पारदर्शकता मिळावीतसेच आवश्यक मार्गदर्शन मिळावे यासाठी  विद्यार्थी सहाय्यता केंद्रे’ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहेअशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डीराज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाईतसेच तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर हे मान्यवर उपस्थित होते.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले कीराज्यातील विद्यार्थ्यांना तांत्रिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत सहकार्य  करण्यासाठी संगणक सुविधांसह सुसज्ज अशी 'विद्यार्थी सहाय्यता केंद्रेस्थापन करण्यात येत आहेत. ही केंद्रे विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रियाआवश्यक कागदपत्रांची तपासणीसमुपदेशन आणि मार्गदर्शन याबाबत मदत करतील.

प्रत्येक जिल्ह्यातील दोन नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ही 'विद्यार्थी सहाय्यता केंद्रेकार्यान्वित केली जाणार आहेत. प्रवेश प्रक्रियेची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणेऑनलाईन अर्ज भरताना तांत्रिक सहाय्यता देणेतसेच विविध शंका निरसन करणे ही केंद्रांची प्रमुख भूमिका असेल.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सुरू होणाऱ्या विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत या केंद्रांची मदत होईल, असेही श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

0000

राज्य कामगार विमा योजनेचा लाभ गरजू कामगारांपर्यंत पोहोचवावा

 राज्य कामगार विमा योजनेचा लाभ गरजू कामगारांपर्यंत पोहोचवावा

- आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबईदि. 23 : राज्य कामगार विमा योजना ही केंद्र सरकार व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविली जात असून या योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा उत्तम प्रकारच्या असून यांचा लाभ तळागाळातील गरजू कामगारांपर्यंत पोहोचवावेतअसे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राज्य कामगार विमा महामंडळाच्या कामकाजाबाबतच्या आढावा बैठकीत श्री.आबिटकर बोलत होते. यावेळी राज्य कामगार विमा सोसायटीचे आयुक्त रमेश चव्हाणजिल्हाधिकारी जितेंद्र डूडीराज्य कामगार विमा महामंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी सुकांतचंद्र दासकामगार विमा सोसायटीचे वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. बालकृष्ण रंगदळबिबवेवाडी येथील विमा महामंडळाच्या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिमन्यू पांडा आदी मान्यवर उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणालेया योजनेत कामगारांची नोदणी वाढविण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतळेगावरांजणगावचाकणइ. कामगार असोसिएशनचे सहकार्य घ्यावे. ‘एमआयडीसी’ मधील विविध कंपन्या तसेच इतर आस्थापनांनी कामगारांच्या विमा नोंदणीसाठी शिबीराचे आयोजन करावे व या माध्यमातून जास्तीत जास्त कामगारांना या योजनेत सहभागी करुन घ्यावेअसे आवाहन त्यांनी यावेळी केले.

राज्य कामगार विमा विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उद्दीष्ट निश्चित करुन जास्तीत जास्त कामगारांपर्यंत या योजनेचा प्रचार प्रसार करुन पुणे जिल्ह्यातील २१ कामगार सेवा दवाखान्यात नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेतअशा सूचना त्यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी श्री. डूडी म्हणालेबिबवेवाडीच्या कामगार रुग्णालयाचे काम उत्तमप्रकारे सुरू असून त्याठिकाणी दुय्यम आरोग्यसेवा उपलब्ध आहेत. पुणे जिल्हा रुग्णालयात उत्तम सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी मार्गदर्शक आराखडा तयार करावा. पुणे जिल्ह्यातील कामगारांसंबंधित सर्व आस्थापनांनी समन्वय साधून विमा कामगारांची नोंदणी वाढविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करुन एका महिन्यात उद्दीष्ट साध्य करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

राज्य कामगार विमा सोसायटीचे आयुक्त रमेश चव्हाण यांनी कामगार विमा योजनेंतर्गत येणाऱ्या विविध सुविधांची माहिती दिली व आभार मानले

शासनाच्या आरोग्य विषयक योजनांचा प्रत्येक गरजू रुग्णांना लाभ देण्याकरिता

 डॉ.ओमप्रकाश शेटे म्हणालेशासनाच्या आरोग्य विषयक योजनांचा प्रत्येक गरजू रुग्णांना लाभ देण्याकरिता राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे रुग्णालयाने पात्र रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा देवून सहकार्य करावेया कामात हलगर्जीपणा होणार नाहीयाबाबत रुग्णालय व्यस्थापनाने दक्षता घ्यावीअसेही डॉ. शेटे म्हणाले.

यावेळी पिंपरी-चिंचवड मोहन नगर येथील राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयाला आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी भेट देऊन बाहय रुग्ण विभागआंतररुग्ण विभागऔषधी भंडारआहार विभागयांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच रुग्णांशी संवाद साधला व अडीअडचणी जाणून घेतल्या. रुग्णांना चांगल्या सेवा सुविधा देण्यासाठी डॉक्टर व प्रशासन यांनी अधिक काळजीपूर्वक लक्ष द्यावे व दर्जेदार सेवा द्याव्यात अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

Featured post

Lakshvedhi