डॉ.ओमप्रकाश शेटे म्हणाले, शासनाच्या आरोग्य विषयक योजनांचा प्रत्येक गरजू रुग्णांना लाभ देण्याकरिता राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे रुग्णालयाने पात्र रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा देवून सहकार्य करावे, या कामात हलगर्जीपणा होणार नाही, याबाबत रुग्णालय व्यस्थापनाने दक्षता घ्यावी, असेही डॉ. शेटे म्हणाले.
यावेळी पिंपरी-चिंचवड मोहन नगर येथील राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयाला आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी भेट देऊन बाहय रुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, औषधी भंडार, आहार विभाग, यांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच रुग्णांशी संवाद साधला व अडीअडचणी जाणून घेतल्या. रुग्णांना चांगल्या सेवा सुविधा देण्यासाठी डॉक्टर व प्रशासन यांनी अधिक काळजीपूर्वक लक्ष द्यावे व दर्जेदार सेवा द्याव्यात अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
No comments:
Post a Comment