Monday, 11 August 2025

राज्यात ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ स्थापन करणार,संगणक केंद्रे व प्रवेश मार्गदर्शनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

 राज्यात विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ स्थापन करणार

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  • संगणक केंद्रे व प्रवेश मार्गदर्शनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

मुंबईदि. २३ : ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत सुलभता व पारदर्शकता मिळावीतसेच आवश्यक मार्गदर्शन मिळावे यासाठी  विद्यार्थी सहाय्यता केंद्रे’ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहेअशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डीराज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाईतसेच तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर हे मान्यवर उपस्थित होते.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले कीराज्यातील विद्यार्थ्यांना तांत्रिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत सहकार्य  करण्यासाठी संगणक सुविधांसह सुसज्ज अशी 'विद्यार्थी सहाय्यता केंद्रेस्थापन करण्यात येत आहेत. ही केंद्रे विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रियाआवश्यक कागदपत्रांची तपासणीसमुपदेशन आणि मार्गदर्शन याबाबत मदत करतील.

प्रत्येक जिल्ह्यातील दोन नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ही 'विद्यार्थी सहाय्यता केंद्रेकार्यान्वित केली जाणार आहेत. प्रवेश प्रक्रियेची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणेऑनलाईन अर्ज भरताना तांत्रिक सहाय्यता देणेतसेच विविध शंका निरसन करणे ही केंद्रांची प्रमुख भूमिका असेल.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून सुरू होणाऱ्या विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत या केंद्रांची मदत होईल, असेही श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi