प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमाच्या कामांना गती देण्याचे निर्देश
- अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई, दि. 23 : प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत विविध विकास कामे करण्याकरता आवश्यक प्रस्ताव सादर करणे, अल्पसंख्याक बहुल ग्रामीण तसेच शहरी क्षेत्रातील वस्तीमध्ये पायiभूत सुविधा निर्माण करण्याकरिता वितरित केलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे तसेच शासनाच्या विविध योजनाची अंमलबजावणी प्रभावीरित्या करण्याबाबत जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी यांना अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे यांनी निर्देश दिले.
या कार्यक्रमाअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सचिव रूचेश जयवंशी, सहसचिव किरण वाघोल, अवर सचिव मिलिंद शेणॉय तसेच राज्यातील सर्व जिल्हा नियोजन अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री.भरणे म्हणाले की, प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत अल्पसंख्याक बहुल क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधा उभारणे, मागास भागांचा विकास आणि सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कामे सुरू आहेत. विभागाकडून मिळणारा निधी योग्य पद्धतीने वापरणे आवश्यक आहे. निधी उपयोगिता प्रमाणपत्र सादर झाल्यास पुढील निधी उपलब्ध करून विकासकामांना गती देता येईल.
000
No comments:
Post a Comment