Thursday, 10 July 2025

मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती,सिडको, म्हाडा, ‘एमआयडीसी’, बृहन्मुंबई महानगरपालिका, ‘एमएमआरडीए’, ‘एमएसआरडीसी’, ‘महाप्रित’ (MAHAPREIT) यांचा समावेश,pl share

 मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देणार

- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

 

मुंबई, दि. ९ : सायन कोळीवाडा झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाला संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक घेऊन रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्यात येईलअसे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य कॅप्टन तमिल सेल्वन, अनंत नरमुरजी पटेल यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री.देसाई म्हणालेबृहन्मुंबई परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (SRA) मार्फत राबविण्यात येणाऱ्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांपैकी  ५१७ प्रकल्प विविध कारणांमुळे रखडले असूनराज्य शासन  आणि संबंधित प्राधिकरणाकडून या प्रकल्पांना गती देण्यासाठी विविध उपाययोजना  करण्यात येत आहेत. तसेच या रखडलेल्या प्रकल्पांसाठी 'अभय योजनाराबविण्यात आलीआहे त्या अंतर्गत २३ प्रकल्पांमध्ये नवीन विकासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे २५ हजारांहून अधिक झोपडीधारकांना योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

तसेच या  झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांना अधिक गती देण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि  सात शासकीय संस्था/महामंडळांमध्ये भागीदारी तयार करण्यात आली आहे. यामध्ये सिडकोम्हाडा‘एमआयडीसी’बृहन्मुंबई महानगरपालिका‘एमएमआरडीए’‘एमएसआरडीसी’‘महाप्रित’ (MAHAPREIT) यांचा समावेश आहे, असेही पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

विधानसभा लक्षवेधी सूचना : फुलंब्री शहरातील चुकीच्या गट फोडप्रकरणी तलाठी व मंडळ अधिकारी निलंबित

 विधानसभा लक्षवेधी सूचना :

फुलंब्री शहरातील चुकीच्या गट फोडप्रकरणी

तलाठी व मंडळ अधिकारी निलंबित

- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

        मुंबईदि. 9 : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फुलंब्री शहरात चुकीच्या पद्धतीने गट नंबर 17 ची फोड करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. यामुळे या भागातील 157 कुटुंब अडचणीत सापडले आहेत. या गटाची चुकीच्या पद्धतीने परस्पर फोड करणाऱ्या मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना निलंबित करण्यात येत असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. 

फुलंब्री शहरातील चुकीच्या पद्धतीने केलेल्या गट फोड व बनावट अकृषक परवानगी बाबत सदस्य श्रीमती अनुराधा चव्हाण यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेत सदस्य अमित देशमुख यांनीही सहभाग घेतला.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेफुलंब्री शहरात परस्पर व चुकीच्या पद्धतीने गट फोड केल्यामुळे चुकीची अकृषक परवानगी देण्यात आली आहे. याबाबत संबंधितांवर 17 एप्रिल 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची विभागीय आयुक्त यांच्यामार्फत चौकशी करण्यात येईल. तसेच या निर्णयामुळे अडचणीत सापडलेल्या 157 घरांच्या संरक्षणासाठी शासन निश्चित कार्यवाही करेल. तसेच लातूर तालुक्यातील चुकीच्या पद्धतीने रेखांकन झालेल्या भागाची चौकशी करण्यात येऊन संबंधित लोकप्रतिनिधी सोबत बैठक घेण्यात येईल, असेही श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

00000

औषध खरेदी प्रक्रियेत अधिक सुसुत्रीकरण आणावे

 औषध खरेदी प्रक्रियेत अधिक सुसुत्रीकरण आणावे

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई, दि. 9 : औषध खरेदी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता व सुसुत्रीकरण आणल्यास औषधांचा तुटवडा भासणार नाही. वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागाने औषधसाधनसामुग्री आणि वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी एकाच ई- औषध संगणक प्रणालीचा वापर करावा. गुणवत्तेनुसार एकसमान दराने विहित वेळेत औषध पुरवठा करण्यासह दोन वर्षांचा दर करार निश्च‍ित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

महाराष्ट्र वस्तु खरेदी प्राधिकरणाची बैठक विधानभवन येथे झाली. यावेळी प्राधिकरणाच्या कामकाजाचा आढावा घेताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचना दिल्या. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवारवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफसार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकरवित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वालसार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकरअन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदममुख्य सचिव राजेश कुमारवित्त अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ताप्रधान सचिव डॉ.के.एच.गोविंदसार्वजनिक आरोग्य सचिव डॉ. निपुण विनायकउद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगनवैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग सचिव धीरज कुमारसार्वजनिक आरोग्य विभाग सचिव विरेंद्र सिंहवैद्यकीय शिक्षण विभाग आयुक्त अनिल भंडारीमहाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश आव्हाड आदिसह अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीदरवर्षी ७० टक्के औषध खरेदी एकसमान होत असते. यासंदर्भात एक सामाईक योजना आखून त्याचा प्रस्ताव सादर करण्यात यावा. सर्व शासकीय रूग्णालयात एकाच वेळी औषध खरेदी व वितरणपारदर्शक निविदा प्रक्रियागुणवत्तेवर भरप्रत्येक जिल्ह्यात साठवणूक व्यवस्थाप्रत्येक रूग्णालयाला आवश्यक औषधांची मागणी ऑनलाईन पद्धतीने करावी.

ग्रामीण रूग्णालयात जास्तीत जास्त डॉक्टर उपलब्ध असावेत यासाठी रिक्त पदांची तातडीने भरती करण्यात यावी. 15 जिल्ह्यात औषध भांडार कार्यरत असूनउर्वरित 20 जिल्ह्यात औषध भांडार उपलब्ध करण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जागेची उपलब्धता तपासणे किंवा शासन आणि खासगी संस्थेच्या भागीदारीने (पीपीपी तत्वावर) औषध भंडार देण्यासंदर्भात कार्यवाही करावी.  भांडारात योग्य तापमानथंड साठवणूक व्यवस्थासाठा व्यवस्थापनगुणवत्ता नियंत्रण या सुविधा असणे आवश्यक असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

औषध निर्मिती एक महिन्याअंतर्गत असून त्यांची वैधता समाप्ती कालावधी किमान दोन वर्ष असावी असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सूचित केले. ग्रामीण भागात सर्व वैद्यकीय सुविधा देण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्टस्, गेमिंग विकासासाठी धोरण तयार करण्यात येणार

 महाराष्ट्र उदयोन्मुख तंत्रज्ञान निधी स्थापन करण्याचा निर्णय

- उद्योग मंत्री उदय सामंत

ॲनिमेशनव्हिज्युअल इफेक्टस्गेमिंग विकासासाठी धोरण तयार करण्यात येणार

प्रादेशिक मराठी आशय निर्माण करणाऱ्या स्टुडिओंना देखील स्वतंत्ररित्या प्रोत्साहन

 

मुंबई दि. ९ :- राज्यात गेमिंग व इतर उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्राकरीता नवोन्मेषरोजगारमहसूलनिर्यात व बौद्धिक संपदा निर्मितीला चालना देण्यासाठी राज्य शासनाने रुपये ३०० कोटी रकमेचा महाराष्ट्र उदयोन्मुख तंत्रज्ञान निधी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे समर्पित ॲनिमेशनव्हिज्युअल इफेक्टस्गेमिंग आणि कॉमिक्स-एक्सटेंडेट रियालिटी (AVGC-XR) धोरण तयार करण्याची कार्यवाही शासन स्तरावर सुरु केली आहे, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

विधान परिषदेत सदस्य श्रीकांत भारतीय यांनी लक्षवेधी सूचना मांडली. या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते.  

उद्योग मंत्री श्री. सामंत म्हणालेराज्यात नवोपक्रमांना गुंतवणुकीच्या माध्यमातून साहाय्य करण्यासाठीतसेच ॲनिमेशनव्हिज्युअल इफेक्टस्गेमिंग आणि कॉमिक्स या उद्योग क्षेत्राचे महत्वपूर्ण स्थान असल्याने माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण-२०२३ जाहीर करण्यात आले आहे. या धोरणाद्वारे महाराष्ट्राला देशातील एव्हीजीसी (AVGC) हब म्हणून विकसित करण्यासाठी जागतिक कंपन्याव्यावसायिक आणि विद्यार्थी यांना राज्यात येण्यासाठी प्रोत्साहने देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

प्रस्तावित धोरणामध्ये नवोपक्रमगुंतवणूकदारविकासक व डिझायन स्टुडिओ यांना अतिरिक्त प्रोत्साहने देण्याची तरतूद करण्यात येत आहे. त्याचबरोबर प्रस्तावित धोरणांतर्गत गॅम्बलिंग आधारित गेम्स वगळून इतर सर्व गेम्सच्या नवोपक्रम घटकांना विशेष प्रोत्साहने अनुज्ञेय करण्याचा मानस आहे. याव्यतिरिक्त धोरणामध्ये प्रादेशिक मराठी आशय निर्माण करणाऱ्या स्टुडिओना देखील स्वतंत्ररित्या प्रोत्साहने अनुज्ञेय करण्याचे प्रस्तावित आहे, असे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

  मंत्री श्री. सामंत म्हणालेआर्टीफिशिअल इंटेलिजन्सब्लॉक चेनथ्रीडी प्रिटींगइंटरनेट ऑफ थिंग्जरोबोटिक्सनॅनो टेक्नॉलॉजीबिग डेटाक्वार्टम कम्पुटिंग इत्यादी उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या विकासासाठी विशेष प्रोत्साहने अनुज्ञेय करण्यात आली आहेत. या प्रोत्साहनामध्ये मुद्रांक शुल्क माफीविद्युत शुल्क सवलतभांडवली अनुदानवीज दर अनुदानऊर्जा सुसूत्रीकरण साहाय्यप्रमाणपत्र साहाय्यबाजार विकास साहाय्यपेटंट संबंधी साहाय्यकौशल्य विकास साहाय्य व भरती साहाय्य यांचा समावेश आहे.

 तसेच या धोरणांतर्गत डेटा सेंटरच्या विकासावर विशेष भर देण्यात आला असून डेटा सेंटरच्या विकासकांना विविध वित्तीय व बिगर वित्तीय प्रोत्साहने अनुज्ञेय देण्यात आली आहेत. ॲनिमेशनविज्युअल इफेक्टस्गेमिंग आणि कॉमिक्स तसेच उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासाकरिता विविध स्तरावर कार्यवाही करण्यात येत आहे. दृक-श्राव्य परिषद-२०२५ मध्ये (WAVES २०२५) मीडिया व मनोरंजन क्षेत्रात ८,००० कोटी रकमेचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत.

            विशेषतः मुंबई व पुणे ही शहरे माहिती तंत्रज्ञानमाध्यमे व मनोरंजनाची प्रमुख केंद्रे असून कुशल मनुष्यबळाची उपलब्धतासक्रिय नवोपक्रम परिसंस्थागुंतवणूकदारांची उपस्थितीहायस्पीड इंटरनेट व अत्याधुनिक तंत्रसुविधा ही राज्याची बलस्थाने आहेत. यामुळे गेमिंग क्षेत्रातील उद्योग उभारण्याकरीता या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. जागतिक स्तरावर गेमिंग उद्योगाचा वेगाने विस्तार होत असून भारताला गेमिंग उद्योगामध्ये भरीव संधी उपलब्ध आहेत, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे, खते मिळण्यासाठी यंत्रणा अधिक सक्षम ,,अनधिकृत ‘एच टी बी टी’ बियाणे विक्रीस परवाना नाही -

 शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणेखते मिळण्यासाठी

कृषी विभागाच्या यंत्रणा अधिक सक्षम करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. ९ :- शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणेखते व कृषी निविष्ठा मिळाव्यात यासाठी कृषी विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येईलयात कृषी विभागास तपासणीसाठी अधिकार देण्यासाठी आवश्यक ते बदल करण्यात येतीलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे अधिकार कमी केल्याबाबत चर्चेत उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. विधान परिषदेत सदस्य सदाभाऊ खोत यांनी याबाबतची लक्षवेधी मांडली होती. यावेळी चर्चेत सदस्य एकनाथ खडसे यांनी सहभाग घेतला.

अनधिकृत ‘एच टी बी टी’ बियाणे विक्रीस परवाना नाही - राज्यमंत्री डॉ.भोयर

एच टी बी टी बियाणे जप्त केल्याबाबत प्रश्नांना उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, जनुकीय बदल बियाणे विक्रीस परवाना देण्यात आलेपण कपाशी ‘एच टी बी टी’ बियाणे विक्रीस परवाना नाही. आता सध्या राज्यामध्ये पेरणी हंगाम सुरू असून मोठ्या प्रमाणात ‘एच टी बी टी’ बियाणे साठवणूक करण्यात येत असल्याच्या माहितीनुसार ‘एच टी बी टी’ बियाणे जप्त करण्याचे निर्देश कृषी आयुक्तांनी ७ मार्च २०२५ रोजी पत्राद्वारे जिल्हा प्रशासनाला दिले होते.

             अनधिकृत ‘एच टी बी टी’ बियाणे जप्त केले आहे. त्या संबंधित बियाणे उत्पादकावर देखील गुन्हा दाखल केला आहेअसे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.


मुंबईत भूस्खलनाचा धोका असणाऱ्या ठिकाणांचा पुन्हा सर्व्हे करणार

 मुंबईत भूस्खलनाचा धोका असणाऱ्या ठिकाणांचा पुन्हा सर्व्हे करणार

-         आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

 

मुंबईदि. ९:- मुंबईत भूस्खलनाचा धोका असणाऱ्या ठिकाणांचा यापूर्वी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण  (Geological Survey of India) संस्थेमार्फत सर्व्हे करण्यात आला असून पुन्हा एकदा अशा धोकादायक ठिकाणांचा सर्व्हे केला जाईलअसे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी सांगितले.

सदस्य सुनील राऊत यांनी मुंबई शहरात डोंगराळ भागात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेतेबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सर्वश्री राम कदमहारून खानअजय चौधरीअशोक पाटील यांनीही सहभाग घेतला.

आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. महाजन यांनी सांगितलेसन २०१७ मध्ये भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने मुंबईतील २४९ ठिकाणांचा सर्व्हे केला होता. यातील ७४ ठिकाणे धोकादायक तर ४६ ठिकाणे ही अतीधोकादायक असल्याचे नमूद केले होते. या ४६ ठिकाणांपैकी ४० ठिकाणे मुंबई उपनगरात आहेत. भूस्खलनाचा धोका असलेल्या ठिकाणी आयआयटीपवई यांच्या  सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक कामे हाती घेण्यात आल्याचेही मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

मंत्री श्री.महाजन यांनी सांगितलेसूर्यानगरविक्रोळी येथील संभाव्य भूस्खलनाच्या ठिकाणी जिओ नेटिंगसंरक्षक भिंतीची कामे करण्यात आली आहेत. या ठिकाणी ११ कोटी ६३ लाखाची ४७ कामे घेण्यात आली असून यातील ४५ कामे पूर्ण आहेत तर दोन कामे प्रगतीपथावर आहेत. जिओ नेटिंगचे काम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास बृहन्मुंबई महापालिकेमार्फत कळविण्यात आले असून हे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

घाटकोपरभांडूप या भागात सन २०२२-२३ व २०२३-२४ या वर्षात धोकादायक असलेल्या ठिकाणी १७७ कामांना मान्यता देण्यात आली असून यातील ११३ कामे पूर्ण३८ कामे  प्रगतीपथावर आणि २६ कामे निविदा प्रक्रियेत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच धोकादायक असलेल्या ठिकाणी संरक्षक भिंतजिओ नेटिंग यासारख्या कामांना निधी उपलब्ध करून दिला जाईलअसेही आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री महाजन यांनी सांगितले.


दरवर्षी चातुर्मासात मनुष्याने कोणते तरी व्रत अवश्य करावे, अन्यथा त्याला संवत्सरोद्भव.. ऋतू बदलच्या परिणामाला सामोरे जावे लागते.*

 🌹⚜️🚩🔆🕉🔆🚩⚜️🌹


      🌻 *li.आनंदी°पहाट.il* 🌻


                  *हरिभजनाची*


            ⚜️⚜️🚩⚜️⚜️

                *चातुर्मास विशेष*

            ⚜️⚜️⚜️⚜️⚜️


🚩⚜️🚩🔆🛕🔆🚩⚜️🚩


        *वार्षिकांश्चतुरो मासान् वाहयेत् केनचिन्नरः ।*

        *व्रतेन न चेदाप्नोति किल्मिषं वत्सरोद्भवम् ॥*

        *दरवर्षी चातुर्मासात मनुष्याने कोणते तरी व्रत अवश्य करावे, अन्यथा त्याला संवत्सरोद्भव.. ऋतू बदलच्या परिणामाला सामोरे जावे लागते.*  

        *भारतीय संस्कृतीने मानवी जीवनाचा सखोल अभ्यास करून आरोग्याला 'धनसंपदा' मानले. निरामय आरोग्यासाठी धर्म संस्कार  दिलेत.*

        *चातुर्मास प्रारंभ झालाय. आषाढ शु. एकादशी ते कार्तिक शु. एकादशी असा हा चार महिन्याचा काळ. या काळात पावसाळ्यामुळे धरणीचे रूप पालटते. फारसे स्थलांतर घडत नाही. याकाळात चातुर्मास्य व्रत एका स्थानी राहूनच करावे, असा प्रघात पडला. यामुळेच जैन मुनीं तसेच वासुदेवानंद सरस्वतींसह अनेक संतांनी चातुर्मास अनेकदा एकाच ठिकाणी केलाय.*

        *या काळात मानवाचे मानसिक रूपही पालटते. देहातील पचनादी संस्थांचे कार्यही निराळ्या ढंगात चालते. मग निरामय आरोग्यासाठी अनेक खाद्य पदार्थ वर्ज्य सांगितलेत. याला आधुनिक विज्ञानाचाही दुजोरा आहे. परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी आणि प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचे वैशिष्ट्य होय.*

        *चातुर्मासात आरोग्यदायी आणि मानसिक आनंद देणारी व्रत वैकल्ये सांगितलीत. मनुष्याला देवाची आठवण संकटकाळात होते. संकट येणे हा जीवनाचा अविभाज्य भागच. मग देवाचे नाव घेतले की संकट दुःख कमी होते.. त्यातून सुटका होते.. किमान उत्तम मनस्वास्थ्य लाभून संकटाचा सामना करता येतो. पण नेहमीच त्याची आठवण यावी म्हणून कुंती मातेने दुःखातच ठेव असे मागणे मागितले होते.*

        *चातुर्मासात कोणते व्रत करु असे भक्तानी विचारताच संत गोंदवलेकर महाराज म्हणाले.. चार महिने कुणालाही दुखावू नकोस. जिभेवर ताबा ठेव.*

        *या सोबच हवं ते नाम.. संत साहित्य वाचन.. श्रवण.  संतांनी चातुर्मासासाठी विपुल ग्रंथ संपदा प्रदान केलीय. या पैकीच एक संत सोहिरोबानाथ.*

        *संत सोहिरोबानाथ आंबिये हे गहिनीनाथ यांचे शिष्य. ज्ञानेश्वरांचा मोठा प्रभाव असलेले सोहिरोबा यांची कोकणातील ज्ञानेश्वर म्हणून ओळख आहे. हे कोकणातील (बांदे) सावंतवाडीचे. बालवयापासूनच धार्मिक प्रवृत्तीचे. गुरुंची भेट झाली. मग त्यांच्या जीवनाचा उद्देश गुरुंनी त्याना समजावीला. गुरु आदेशाने ते सोहsम् मंत्र जप.. साधना करु लागले. मग जीवनच बदलले. गुरुकृपेने सारस्वत प्रतिभा लाभली.*

        *सावंतवाडी संस्थानातील नोकरी सोडून गृहत्याग करुन तिर्थाटन केले. लोकांना भक्तीचा उपदेश करु लागले. महाराष्ट्राबाहेरही म.प्र, गुजराथ येथे त्यांचा शिष्यवर्ग मठ होते. महादजी शिंदे यांनीही त्यांना दरबारी बोलवून सत्कार केला.. क्षीप्रा नदीकाठी मठ बांधून दिला.*

        *मराठीसह हिंदी आणि संस्कृत मध्येही असलेल्या त्यांच्या अभंग.. श्लोक.. आरत्या, कटिबद्ध.. सवाया इ. रचना म्हणजे संगीतकार आणि गायकांना खुणावणारा शास्त्रशुद्ध चिजांचा अनमोल खजिनाच. या योगी नाथांची दैवी प्रतिभा थक्क करणारी आहे. सिद्धान्तसंहिता मध्ये संस्कृत श्लोक ७२९, मराठी ओवी ४९१७, अक्षयबोध ओवी ४०८, अव्दयानंद ५५४, पूर्णाक्षरी ४८९, महदनुवेश्वरी ९०९३ ओवी हे सारे वेदान्तसार सांगणारे त्यांचे ग्रंथ. जन्मभर भक्तीमार्ग प्रसाराने लाखो जीवांचा उद्धार करणारे हे योगी.*

        *जीवन काळ क्षणाक्षणानी कमी होतोय, पण परमेश्वर प्रेम जागृत होतच नाही. सांसारीक अडचणीत.. सुख.. दुःखात मन अडकते, शिवाय मनात परमेश्वर अस्तित्वाविषयी संदेहाचा.. शंकांचा चिखलही मनात कालवला जातो. नाम स्मरण महत्वाचे. तेव्हा नाथ आम्हांला सावध करत आहेत की..*


🌷🌿🌸🔆🛕🔆🌸🌿🌷


  *हरिभजनाविण काळ*

  *घालवू नको रे ॥१॥*


  *दोरीच्या सापा भिवुनी भवा ।*

  *भेटी नाही जिवा-शिवा ।*

  *अंतरीचा ज्ञानदिवा*

  *मालवू नको रे ॥२॥*


  *विवेकाची ठरेल ओल ।*

  *ऐसे की बोलावे बोल ।*

  *आपुल्या मते उगीच चिखल*

  *कालवू नको रे ॥३॥*


  *संत संगतीने उमज ।*

  *आणुनि मनी पुरते समज ।*

  *अनुभवावीण मान*

  *हालवू नको रे ॥४॥*


  *सोहिरा म्हणे ज्ञानज्योती ।*

  *तेथ कैचि दिवस-राती ।*

  *तयावीण नेत्रपाती*

  *हालवू नको रे ॥५॥*


🌺🌿🌸🔆🙏🔆🌸🌿🌺


  *रचना : संत सोहिरोबानाथ*  ✍

  *संगीत : पं. जितेंद्र अभिषेकी*

  *स्वर : पं. जितेंद्र अभिषेकी*


  🎼🎶🎼🎶🎼  🎧


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

                *०९.०७.२०२५*


🌻🌿🥀🌺🌻🌺🥀🌿🌻

Featured post

Lakshvedhi