Wednesday, 9 July 2025

Flood Situation Under Control in Eastern Vidarbha: SDRF and NDRF Deployed, Citizens Urged to Stay Safe

 Flood Situation Under Control in Eastern Vidarbha:

SDRF and NDRF Deployed, Citizens Urged to Stay Safe

— CM Devendra Fadnavis

 

Mumbai, July 9: Owing to heavy rainfall, flood-like conditions have developed in parts of Eastern Vidarbha. However, the situation is currently under control, and teams from the National Disaster Response Force (NDRF) and State Disaster Response Force (SDRF) are fully prepared, informed Chief Minister Devendra Fadnavis in the Legislative Assembly today.

The issue was raised in the Assembly by MLA Nana Patole.

CM Fadnavis stated that due to the floods, some passengers had been stranded in a state transport (ST) bus. They were safely relocated to a nearby school and later sent home unharmed.

The Gadchiroli-Nagpur (Armori) route remains closed, but traffic is running smoothly through alternate routes. Due to the release of water from Gosikhurd Dam, a high alert has been issued for residents up to Gadchiroli. In low-lying areas of Nagpur city, water has accumulated, and the authorities are fully focused on addressing the situation.

Rescue operations are currently underway. Unfortunately, one person has been reported missing due to being swept away in the floodwaters. SDRF and NDRF teams are on standby at critical points.

An orange alert remains in effect for Nagpur district today. CM Fadnavis appealed to all residents in the affected areas to remain cautious and follow safety guidelines.
0000

प्रदूषण नियंत्रणासाठी रिअल टाईम मॉनिटरिंग अनिवार्य; ग्रीन क्रेडिटसाठीही नियोजन – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे मुंबई, दि. ९ : राज्यातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी रिअल टाईम मॉनिटरिंग अनिवार्य असल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीमती मंत्री मुंडे बोलत होत्या. यावेळी सदस्य सर्वश्री अभिजित वंजारी, प्रसाद लाड, सतेज पाटील, प्रवीण दरेकर यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला. पाणी, वायू, ध्वनी तसेच औद्योगिक प्रदूषणाचे तंत्रज्ञानाच्या मदतीने रिअल टाईम परीक्षण केले जावे आणि ही माहिती सर्वसामान्य नागरिकांसाठी सुलभ व उपलब्ध असावी यासाठी काम सुरू असल्याचे सांगून मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, सध्या पाणी, वायू व ध्वनी प्रदूषणाचे परीक्षण करत आहोत, पण औद्योगिक प्रदूषणाचाही डेटा लोकांसाठी ॲक्सेसिबल व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांना त्यांच्या परिसरातील प्रदूषण स्थितीबाबत माहिती मिळावी यासाठी हायटेक पद्धतीने प्लॅटफॉर्म विकसित केला जाणार आहे. प्रत्येक उद्योगाला त्यांच्या भागात हरित आच्छादन (Green Cover) राखणे बंधनकारक आहे. परंतु काही जुने उद्योग आहेत, ज्यांच्याकडे पुरेशी जागा उपलब्ध नसते. अशा वेळी त्यांना गायरान किंवा दुसऱ्या उपलब्ध जागांमध्ये वृक्षारोपण करून ग्रीन क्रेडिट मिळवण्याची संधी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. उद्योगांना परवानग्या देताना पर्यावरणाशी संबंधित कठोर निकष पाळावे लागतात. या प्रक्रियेत वेगवेगळ्या स्तरांवर बैठक होतात आणि अंतिम निर्णय संबंधित प्राधिकरणामार्फत घेतला जातो, असेही श्रीमती मुंडे यांनी यावेळी सांगितले. मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, राज्यात वायू प्रदूषण नियंत्रणासाठी नियमित चाचण्या घेतल्या जात असून, नियमभंग करणाऱ्या उद्योगांवर सक्त कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत 311 उद्योगांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्या, 279 उद्योगांना सूचनात्मक आदेश (Proposed Directions), 204 उद्योगांना अंतिम निर्देश (Final Directions) आणि 218 उद्योगांवर बंद करण्याचे आदेश दिले गेले आहेत. तंत्रज्ञान आधारित नियंत्रणाची गरज मंत्री श्रीमती मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “प्रदूषणाचे प्रभावी नियंत्रण तंत्रज्ञानाच्या आधारेच शक्य आहे. रिअल टाईम डेटा, डिजिटल सेन्सर्स, AI आधारित विश्लेषण यांचा वापर करून प्रदूषणाचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षमपणे करता येईल. या सर्व उपाययोजना राबवल्यास महाराष्ट्र राज्य पर्यावरणीय व्यवस्थापनामध्ये मोठी प्रगती करेल, असेही मंत्री मुंडे म्हणाल्या.

 प्रदूषण नियंत्रणासाठी रिअल टाईम मॉनिटरिंग अनिवार्य;

ग्रीन क्रेडिटसाठीही नियोजन

– पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

मुंबईदि. ९ : राज्यातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी रिअल टाईम मॉनिटरिंग अनिवार्य असल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीमती मंत्री मुंडे बोलत होत्या. यावेळी सदस्य सर्वश्री अभिजित वंजारीप्रसाद लाडसतेज पाटीलप्रवीण दरेकर यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.

पाणीवायूध्वनी तसेच औद्योगिक प्रदूषणाचे तंत्रज्ञानाच्या मदतीने रिअल टाईम परीक्षण केले जावे आणि ही माहिती सर्वसामान्य नागरिकांसाठी सुलभ व उपलब्ध असावी यासाठी काम सुरू असल्याचे सांगून मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या कीसध्या पाणीवायू व ध्वनी प्रदूषणाचे परीक्षण करत आहोतपण औद्योगिक प्रदूषणाचाही डेटा लोकांसाठी ॲक्सेसिबल व्हावायासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांना त्यांच्या परिसरातील प्रदूषण स्थितीबाबत माहिती मिळावी यासाठी हायटेक पद्धतीने प्लॅटफॉर्म विकसित केला जाणार आहे. प्रत्येक उद्योगाला त्यांच्या भागात हरित आच्छादन (Green Cover) राखणे बंधनकारक आहे. परंतु काही जुने उद्योग आहेतज्यांच्याकडे पुरेशी जागा उपलब्ध नसते. अशा वेळी त्यांना गायरान किंवा दुसऱ्या उपलब्ध जागांमध्ये वृक्षारोपण करून ग्रीन क्रेडिट मिळवण्याची संधी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

उद्योगांना परवानग्या देताना पर्यावरणाशी संबंधित कठोर निकष पाळावे लागतात. या प्रक्रियेत वेगवेगळ्या स्तरांवर बैठक होतात आणि अंतिम निर्णय संबंधित प्राधिकरणामार्फत घेतला जातोअसेही श्रीमती मुंडे यांनी यावेळी सांगितले. 

मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की राज्यात वायू प्रदूषण नियंत्रणासाठी नियमित चाचण्या घेतल्या जात असूननियमभंग करणाऱ्या उद्योगांवर सक्त कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत 311 उद्योगांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्या279 उद्योगांना सूचनात्मक आदेश (Proposed Directions), 204 उद्योगांना अंतिम निर्देश (Final Directions) आणि 218 उद्योगांवर बंद करण्याचे आदेश दिले गेले आहेत.

तंत्रज्ञान आधारित नियंत्रणाची गरज

मंत्री श्रीमती मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितले कीप्रदूषणाचे प्रभावी नियंत्रण तंत्रज्ञानाच्या आधारेच शक्य आहे. रिअल टाईम डेटाडिजिटल सेन्सर्स, AI आधारित विश्लेषण यांचा वापर करून प्रदूषणाचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षमपणे करता येईल. या सर्व उपाययोजना राबवल्यास महाराष्ट्र राज्य पर्यावरणीय व्यवस्थापनामध्ये मोठी प्रगती करेलअसेही मंत्री मुंडे म्हणाल्या.

सांगली महापालिकेतील वीजबिल गैरव्यवहार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई

 सांगली महापालिकेतील वीजबिल गैरव्यवहार प्रकरणी

दोषींवर कडक कारवाई

- राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

 

मुंबईदि. ९ सांगली महापालिकेतील पथदिव्यांच्या वीजबिल देयकांमध्ये तब्बल १ कोटी २९ लाख ९५ हजार रुपयांच्या झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी सुरू असून यामध्ये दोषी असलेल्यावर कडक कारवाई करण्यात येईलअशी माहिती राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत दिली.  

सदस्य सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री डॉ.भोयर बोलत होते. यावेळी सदस्य सर्वश्री प्रसाद लाडपरिणय फुके यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.

महावितरणकडे महापालिकेने ९ कोटी ८८ लाख ६६ हजार १३३ रुपयांचा धनादेश दिलामात्र प्रत्यक्षात महापालिकेचे वीजबिल केवळ ८ कोटी ८५ लाख ७० हजार रुपये होतेअसे सांगून राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले कीउर्वरित रक्कम खासगी ग्राहकांच्या वीजबिलापोटी भरल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी आतापर्यंत ११ आरोपींची नावे निश्चित झाली आहेत. तपासासाठी तीन सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटीनेमण्यात आले आहे. या पथकात पोलीस निरीक्षकचार्टर्ड अकाउंटंट आणि तत्कालीन उपायुक्त वैभव साबळे यांचा समावेश होता. मात्रतपासादरम्यान श्री.साबळे स्वतः लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकले आणि त्यांनी ज्या प्रकरणात लाच घेतलीत्याचा संबंध सांगलीचे तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांच्याशी असल्याचा संशय व्यक्त झाला आहे.

            राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले कीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून एक महिन्याच्या आत संपूर्ण चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. चौकशी दरम्यान खासगी ग्राहकांचे वीजबिल महापालिकेच्या निधीतून भरल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात महापालिकेतील तसेच बँकेतील काही अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा संशय एसआयटी चौकशीत व्यक्त करण्यात आला असल्याचेही राज्यमंत्री डॉ.भोयर यांनी सांगितले.

राज्यमंत्री डॉ.भोयर यांनी सांगितले कीशुभम गुप्ता दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. सर्व संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई लवकरच केली जाईल.

जेएनपीटी परिसरातील तरंगता कचरा आणि तेलगळती संदर्भात तपासणी करणार

 जेएनपीटी परिसरातील तरंगता कचरा आणि तेलगळती संदर्भात

तपासणी करणार

- मंत्री पंकजा मुंडे

मुंबईदि. ९ : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या (जेएनपीटी) परिसरातील तेलगळती रोखण्यासाठी आणि समुद्रातील तरंगता कचरा गोळा करण्यासाठी जेएनपीटीने एमटीयूएलच्या माध्यमातून यंत्रणा कार्यान्वित केली आहे. तथापिया बाबींवर समाधानकारक कारवाई व्हावीयासाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जेएनपीटीच्या यंत्रणांची पाहणी करण्यासाठी पाठवण्यात येईलअसेही मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांनी जेएनपीटीने बंदरात होणारी तेलगळतीकोळसा वाहतूक होऊन प्रदूषण आणि त्यामुळे मासेमारीचे नुकसान होत असल्याच्या प्रश्न विचारलात्यावर मंत्री श्रीमती मुंडे यांनी उत्तर दिले. यात सदस्य भाई जगताप यांनीही उपप्रश्न विचारला.

मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या कीजेएनपीटीच्या आजूबाजूच्या समुद्र परिसरात मत्स्यमारीस बंदी आहे. हा परिसर मत्स्यमारीसाठी अधिसूचित क्षेत्र नसल्यामुळे आणि तिथे जहाजांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असल्यामुळे प्रदूषणाचा धोका वाढतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्या भागात मत्स्यमारीस परवानगी नाहीअशी माहिती मंत्री श्रीमती मुंडे यांनी दिली.

0000

विधान परिषद इतर कामकाज आमदाराकडून कॅन्टीन कर्मचाऱ्याला झालेली मारहाण अयोग्य

 विधान परिषद इतर कामकाज

आमदाराकडून कॅन्टीन कर्मचाऱ्याला झालेली मारहाण अयोग्य

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. ९ : आमदार निवासात स्वच्छतेच्या संदर्भात काही तक्रारी असल्यास त्याबाबत अधिकृतरित्या तक्रार मांडून त्यासंदर्भात कारवाईची मागणी करता येवू शकते. भाजीपाला, पदार्थ खराब असणेदुर्गंधी येणेया गोष्टी निश्चितच दुर्लक्षित करता येणार नाहीत. तथापि, तेथील कर्मचाऱ्यांना मारहाणीचा मार्ग योग्य नाहीअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

एका आमदारांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल झाल्यासंदर्भात विधानपरिषद सदस्य ॲड.अनिल परब यांनी सभागृहात विशेष सूचना मांडली. यावर मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशा प्रकारचे वर्तन कोणत्याही लोकप्रतिनिधीला भूषणावह नाही. यामुळे संपूर्ण विधिमंडळाची आणि आमदार पदाची प्रतिमा मलीन होतेअसेही त्यांनी नमूद केले.

यासंदर्भात अध्यक्षांनी या घटनेची दखल घ्यावीअसेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी नमूद केले.

विधानपरिषद इतर कामकाज छत्रपती संभाजीनगर येथील बालसुधारगृह प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई

 वृत्त क्र. १४७

 

विधानपरिषद इतर कामकाज

छत्रपती संभाजीनगर येथील बालसुधारगृह प्रकरणी

दोषींवर कठोर कारवाई

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. ९ : छत्रपती संभाजीनगर येथील विद्यादीप बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलींवर झालेला अत्याचार ही अतिशय गंभीर बाब आहे. यामध्ये जे प्रकार उघड झाले आहेतते भयावह आहेत. यासंदर्भात दोषींवर कठोर कारवाई करत संबंधित जिल्हा महिला बाल विकास अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात येईलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

यासंदर्भात विधान परिषद सदस्य श्रीमती चित्रा वाघ आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी अल्प सूचना प्रश्नाद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीयाप्रकरणी चौकशीसाठी तीन वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षक यांच्या समितीची स्थापना करण्यात आली असून त्यांनी ८० मुलींशी संवाद साधला आहे. सुरुवातीला त्या बोलायला तयार नव्हत्यामात्र हळूहळू त्यांनी या प्रकरणाबाबत काही गंभीर माहिती दिली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर संबंधितांवरही कारवाई करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले कीसंबंधित संस्थेची मान्यता रद्द करण्यात येणार आहे. यावरील समितीचा अंतिम अहवाल लवकरच प्राप्त होणार असूनत्यानंतर दोषी ठरलेल्या प्रत्येकावर कठोर कारवाई केली जाईल.

उच्च न्यायालयानेही या प्रकरणाची दखल घेतली असूनविशेष निरीक्षकाची नियुक्ती केली असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीउच्च न्यायालयाच्या कार्यवाहीसोबतच सरकार स्वतंत्रपणे चौकशी करत आहे. यामध्ये कोणतीही व्यक्तीप्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या दोषी असल्यास त्यांच्यावर कारवाई होईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाहीअसेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.


मेट्रो प्रकल्प व वाहतूक नियोजनावर भर

 मेट्रो प्रकल्प व वाहतूक नियोजनावर भर

हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड या मार्गांवर मेट्रो प्रकल्पाचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असूनस्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत संबंधित विभाग प्रमुखवाहतूक पोलिस विभाग व पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत वेळोवेळी बैठक घेऊन आढावा घेतला जाईल. अधिवेशन संपण्यापूर्वी पुणे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पुणे शहरातील वाहतूक समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात येईलअसेही मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले.


Featured post

Lakshvedhi