Wednesday, 9 July 2025

विधान परिषद इतर कामकाज आमदाराकडून कॅन्टीन कर्मचाऱ्याला झालेली मारहाण अयोग्य

 विधान परिषद इतर कामकाज

आमदाराकडून कॅन्टीन कर्मचाऱ्याला झालेली मारहाण अयोग्य

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. ९ : आमदार निवासात स्वच्छतेच्या संदर्भात काही तक्रारी असल्यास त्याबाबत अधिकृतरित्या तक्रार मांडून त्यासंदर्भात कारवाईची मागणी करता येवू शकते. भाजीपाला, पदार्थ खराब असणेदुर्गंधी येणेया गोष्टी निश्चितच दुर्लक्षित करता येणार नाहीत. तथापि, तेथील कर्मचाऱ्यांना मारहाणीचा मार्ग योग्य नाहीअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

एका आमदारांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल झाल्यासंदर्भात विधानपरिषद सदस्य ॲड.अनिल परब यांनी सभागृहात विशेष सूचना मांडली. यावर मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशा प्रकारचे वर्तन कोणत्याही लोकप्रतिनिधीला भूषणावह नाही. यामुळे संपूर्ण विधिमंडळाची आणि आमदार पदाची प्रतिमा मलीन होतेअसेही त्यांनी नमूद केले.

यासंदर्भात अध्यक्षांनी या घटनेची दखल घ्यावीअसेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi