Wednesday, 9 July 2025

जेएनपीटी परिसरातील तरंगता कचरा आणि तेलगळती संदर्भात तपासणी करणार

 जेएनपीटी परिसरातील तरंगता कचरा आणि तेलगळती संदर्भात

तपासणी करणार

- मंत्री पंकजा मुंडे

मुंबईदि. ९ : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या (जेएनपीटी) परिसरातील तेलगळती रोखण्यासाठी आणि समुद्रातील तरंगता कचरा गोळा करण्यासाठी जेएनपीटीने एमटीयूएलच्या माध्यमातून यंत्रणा कार्यान्वित केली आहे. तथापिया बाबींवर समाधानकारक कारवाई व्हावीयासाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जेएनपीटीच्या यंत्रणांची पाहणी करण्यासाठी पाठवण्यात येईलअसेही मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांनी जेएनपीटीने बंदरात होणारी तेलगळतीकोळसा वाहतूक होऊन प्रदूषण आणि त्यामुळे मासेमारीचे नुकसान होत असल्याच्या प्रश्न विचारलात्यावर मंत्री श्रीमती मुंडे यांनी उत्तर दिले. यात सदस्य भाई जगताप यांनीही उपप्रश्न विचारला.

मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या कीजेएनपीटीच्या आजूबाजूच्या समुद्र परिसरात मत्स्यमारीस बंदी आहे. हा परिसर मत्स्यमारीसाठी अधिसूचित क्षेत्र नसल्यामुळे आणि तिथे जहाजांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असल्यामुळे प्रदूषणाचा धोका वाढतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्या भागात मत्स्यमारीस परवानगी नाहीअशी माहिती मंत्री श्रीमती मुंडे यांनी दिली.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi