Friday, 28 March 2025

राज्यातील ६४ लाख शेतकऱ्यांना मिळणार रु. २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई मिळणार

 राज्यातील ६४ लाख शेतकऱ्यांना मिळणार

रु. २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई

-         कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

 

मुंबईदि.२८ : राज्यातील तब्बल ६४ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा  निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असूनत्यांच्या खात्यावर थेट रु. २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे. शासनाने विमा कंपन्यांना देय असलेला प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून रु. २८५२ कोटी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.

 

या निर्णयामुळे मागील विविध हंगामांतील प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा होणार आहे. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना विमा कंपन्यांना देण्यात आल्या असूनशेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार असल्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

 

या अंतर्गत खरीप २०२२ आणि रब्बी २०२२-२३ या हंगामांसाठी रु. २.८७ कोटीखरीप २०२३ साठी रु. १८१ कोटीरब्बी २०२३-२४ साठी रु. ६३.१४ कोटी आणि खरीप २०२४ साठी रु. २३०८ कोटी इतकी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना वितरित होणार आहे. एकूण रु. २५५५ कोटी रकमेचा लाभ राज्यातील ६४ लाख लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार आहे.

 

शासनाने विमा कंपन्यांना निधी वितरित केला असूननुकसान भरपाईची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे म्हणाले.


अभय योजना २०२५ अंतर्गत एचएएल मार्फत

 अभय योजना २०२५ अंतर्गत एचएएल मार्फत

एकाच वेळी २,४७०.९७ कोटींची भरपाई

प्रलंबित कर देयक असलेल्या सार्वजनिक उपक्रमांना (पीएसयू)

कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

मुंबईदि. २८ : सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसोबत (पीएसयू) जीएसटीपूर्व कर कालावधीसाठी दीर्घकाळ चालणाऱ्या कर विवादांचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अभय योजना - २०२५ ची घोषणा केली आहे.

"जीएसटीपूर्व कर कायद्यांसाठी महाराष्ट्राच्या अभय योजना २०२५" अंतर्गत कर थकबाकी निकाली काढणारी हिंदुस्तान ऍरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ही महाराष्ट्रातील पहिली सार्वजनिक उपक्रम ठरली आहे. महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर (एमजीएसटीडी) विभागासाठी एक मोठी प्रगती म्हणूनमेसर्स हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ही महाराष्ट्र करव्याजदंड किंवा विलंब शुल्क (सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांद्वारे देय) कायदा२०२५ अंतर्गत दीर्घकाळ प्रलंबित कर थकबाकी यशस्वीरित्या निकाली काढणारी पहिली सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू) बनली आहे. या योजनेंतर्गत एचएएल ने २,४७०.९७ कोटी रुपयांची एकाच वेळी भरपाई केली. ९,७५२.५३ कोटी रुपयांच्या एकूण थकबाकीची ही विक्रमी निवारण महाराष्ट्राच्या कर इतिहासातील एक मोठी एकत्रित वसुली ठरली आहेजी राज्याच्या कर पालनाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि दीर्घकाळाच्या वादांचे समाधान करण्यासाठीच्या वचनबद्धतेला दृढ करते.

विवादाचा कालावधी आणि तडजोडीचे फायदे

या योजनेंतर्गत निकाली काढलेले कर विवाद ३५ वर्षांहून अधिक काळ प्रलंबित होतेकाही प्रकरणे १९८६ पासूनची होती. ही तडजोड जीएसटीपूर्वीच्या विविध कर प्रणालींच्या अंतर्गत उभ्या राहिलेल्या वादांचे समाधान झालेज्यात बॉम्बे सेल्स टॅक्स (बीएसटी)सेंट्रल सेल्स टॅक्स (सीएसटी) आणि महाराष्ट्र व्हॅल्यू अ‍ॅडेड टॅक्स (एमव्हीएटी) अधिनियमांचा समावेश आहे.

जीएसटीपूर्व कर कायद्यांतर्गत प्रलंबित कर देयक असलेल्या इतर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना (पीएसयू) या कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यास प्रोत्साहित केले जाते (केवळ सार्वजनिक उपक्रमांसाठी आणले आहे जिथे ३१ मार्च २००५ पर्यंतच्या कालावधीसाठी प्रलंबित कर थकबाकीच्या फक्त ३० टक्के आणि ०१ एप्रिल २००५ ते ३० जून २०१७  या कालावधीतच्या थकबाकीवर ५० टक्के कराची भरपाई करावी लागेल आणि व्याज आणि दंडाची पूर्णपणे माफी मिळेल) आणि ३१ डिसेंबर २००२५ या अंतिम मुदतीपूर्वी त्यांचे दीर्घ थकबाकी निकाली काढू शकतात. अधिक माहितीसाठीकरदात्यांनी www.mahagst.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा त्यांच्या जवळच्या एमजीएसटीडी कार्यालयाशी संपर्क साधावाअसे महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभाग यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे.

0000

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025’ साठी अर्ज करण्याचे आवाहन

 प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025’ साठी अर्ज करण्याचे आवाहन

 

नवी दिल्ली, दि. 28 :  केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025’ साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुकांनी https://awards.gov.in या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावा.

हा पुरस्कार दरवर्षी देशतील 5 ते 18 वर्षाखालील असामान्य गुणवत्ताधारक मुलांना प्रदान करुन सन्मानित करण्यात येते. शौर्यक्रीडासमाजसेवाविज्ञान व तंत्रज्ञानपर्यावरण, कला व संस्कृती या क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो.

            या पुरस्कारासाठी कोणतेही भारतीय नागरिकत्व असलेले व भारतात वास्तव्यास असलेले 5 ते 18 वर्षे वयोगटातील मुले पात्र आहेत. अर्जदार स्वतः अर्ज करू शकतात तसेच इतर कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेद्वारे त्यांचे नाव नामांकनासाठी सुचवले जाऊ शकते. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने 1 एप्रिल 2025 ते 31 जुलै 2025 या कालावधीत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी https://awards.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

000


नवीन महाराष्ट्र सदनात दंत व नेत्रचिकित्सा शिबीर संपन्न

 नवीन महाराष्ट्र सदनात दंत व नेत्रचिकित्सा शिबीर संपन्न

 

नवी दिल्ली दि. 28 : कस्तुरबा गांधीस्थित महाराष्ट्र सदनात आयोजित दंत व नेत्रचिकित्सा शिबीराचा लाभ महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी घेतला.

नवीन महाराष्ट्र सदनात द केअरींग टच’ च्या सहकार्याने आज दंत आणि नेत्र तपासणीचे एक दिवसीय शिबीर महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या मार्गदर्शनातून आयोजित करण्यात आले.

याअंतर्गत महाराष्ट्र सदनमहाराष्ट्र परिचय केंद्रबांधकाम विभागविद्युत विभाग,महाराष्ट्र सुरक्षा रक्षक तसेच सदनातील अन्य आस्थेपनेवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तसेच त्यांच्या कुटूंबियांनीचीही नेत्र आणि दंत तपासणी मोफत करण्यात आली. यासबंधित काही समस्या असल्यास त्याची संपूर्ण माहिती तज्ज्ञाद्वारे देण्यात आली.

द केअरींग टच च्यावतीने दंत चिकित्सक डॉ. क्षितीजा भक्तेदंत सहायकनेत्र रोग तज्ज्ञ आदी उपस्थित होते.

या शिबीराचा लाभ सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावारसारीका शेलारस्मिता शेलार या अधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी घेतला.

मंत्रालयात पाणीपुरवठा सुरळीत

 मंत्रालयात पाणीपुरवठा सुरळीत

 

मुंबईदि. 28 : मंत्रालयामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे काम बृहन्मुंबई महापालिकेमार्फत करण्यात आले असून मंत्रालयामध्ये पाणीपुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.

            मंत्रालय मुख्य व विस्तार इमारतीमध्ये बृहन्मुंबई महापालिकेमार्फत पाणीपुरवठा केला जातो. ज्या पाणीपरवठा पाईपलाईनमधून पाणीपुरवठा होतो. त्यामध्ये रेती आणि खडी जमा झाल्यामुळे पाईपलाईन अंशतः जाम झाली होते. त्यामुळे कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. त्यामध्ये पाणी कमी प्रमाणात उपलब्ध झाले. पर्यायी व्यवस्था म्हणून तातडीने टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.

            सद्यस्थितीत पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे काम पूर्ण  करण्यात आले असून मंत्रालयातील पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे.

000

राज्यातील महामार्गांवर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह

 राज्यातील महामार्गांवर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह

- महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

 

मुंबई दि. २८ :- चौथ्या महिला धोरणात महिलांसाठी आरोग्य आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध करण्याबाबत अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. यानुसार महामार्गावर प्रत्येक २५ किलो मीटर अंतरावर सुसज्ज स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत. या स्वच्छतागृहांचे देखभाल व व्यवस्थापन स्थानिक महिला बचतगटामार्फत करण्यात येईल. याशिवाय महामार्गावर बचतगटांना उत्पादनांची विक्री व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

 

महिला धोरणात महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देताना राज्यातील महामार्गावरील स्वच्छतागृहांची दुरावस्था दूर करण्याबाबतही अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते. यात प्रामुख्याने राज्यातील राज्य महामार्गराष्ट्रीय महामार्गसमृद्धी महामार्गासह द्रुतगती महामार्गांवर प्रत्येक २५ किलोमीटर अंतरावर महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याचे निश्चित करण्यात आले होते. महिला व बाल विकास विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वयातून हा प्रकल्प राबविला जाणार असल्याची माहिती मंत्री तटकरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

 स्वच्छतागृहांचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग करणार असूनजन सुविधा केंद्राचे व्यवस्थापन माविम स्थापित बचत गटांमार्फत करण्यात येणार आहे.

स्वादिष्ट आगीनफुलांची*

 🌹⚜️🌹🔆🌅🔆🌹⚜️🌹


      🌻 *li.आनंदी°पहाट.il* 🌻


         *स्वादिष्ट आगीनफुलांची*

                                       

🌸🥀😋🌺🌶️🌺😋🥀🌸

       

        *आमचे शेतकरी धार्मिक प्रवृत्तीचे.. कष्टाळू आहेत. उन.. वारा.. पावसातही शेतातील कामे आनंदाने करतात. त्याचे कष्ट जाणवत नाहीत उलट कामात आनंद शोधतात. शेतात पिके डोलतात तेव्हा त्यांचा आनंद व्दिगुणीत होतो. त्यांच्या कष्टानेच आमच्या ताटात चौरस.. आरोग्यदायी स्वादिष्ट आहार प्राप्त होतो.*

        *मिरची.. आमच्या अन्नातील महत्त्वाचा घटक. मिरची मग ती हिरवी.. पिवळी वा लाल असो पण हवीच. मिरचीने पदार्थाची चव.. लज्जत वाढते. एवढेच नाही तर मिरचीमध्ये शरीरास आवश्यक असे अ,ब,क आणि ई जीवनसत्त्वे आहेत. कॅल्शियम.. फॉस्फरस खजिने पण आहेत. मिरचीमधील कॅपसायसीन पदार्थामुळे तिखट चव प्राप्त होते. भारतात तर मिरची अत्यंत लोकप्रिय. ताटातील पदार्थात मिरचीचा वापर हवाच हा आग्रह.*

        *मिरचीच्या उत्पादनात भारत हा जगातील प्रथम क्रमांकाचा देश. १५ पेक्षा जास्त प्रकारच्या मिरचीचे उत्पादन होते. आंध्र प्रदेशात गुंटुर प्रमाणेच महाराष्ट्रात नंदुरबार, भिवापूर, मांडळ, पथरोट येथे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. शेतात लहान लहान झाडावर लागलेल्या या मिरच्या तोडून टोपल्यात जमा करुन.. उन्हात वाळवून बाजारात विक्रीस येतात.*

        *डोक्यावर सूर्य आग ओकतो. घामाच्या धारा लागतात. तेव्हा या जहाल मिरच्या तोडून वाळविण्यासाठी जमिनीवर पसरल्या जातात. मिरच्या तोडणे.. जमिनीवर दूरवर पसरलेले लाली लाल मिरच्याचे ढीग बघणे सुखद असले तरीही डोक्यावर उन आणि ठसका यामुळे हे काम अत्यंत कष्टाचे ठरते.*

        *पण तरीही या कामात शेतकरी भगिनी आनंद शोधतात हे सांगणारे हे गाणे.*


🌹🌼🌾😋🌶️😋🌾🌼🌹


  *भर उन्हात जळते धरती,*

  *तिच्या काळजाला चटकं बसती* 

  *त्या ठिणग्या मातीतून फुलती,* 

  *त्यांचा माणसाकडं ओढा*


  *आगीनफुलं ही तोडा बायांनो,*

  *आगीनफुलं ही तोडा* 

  *लाल लाल मिरची तोडा बायांनो,*

  *लवंगी मिरची तोडा* 


  *ही किमया ग मायाळू धरतीची*

  *ही जादूगिरी मातीच्या पिरतीची*

  *दर वर्षाला बाग-फुलं नवतीची*

  *तिखट मिरची हिकडं पिकली,*

  *तिकडं उसाचा पेढा*


  *आली वयात ग,*

  *तांबूस पिवळी झाली*

  *कशी किरणानं उन्हात*

  *चमके लाली*

  *वर पांघरल्या पानांच्या*

  *हिरव्या शाली*

  *हलक्या हाती पिकली वेचा,*

  *कवळी कवळी तोडा*


🌹🌾😋🔆🌶️🔆😋🌾🌹


  *गीत : जगदीश खेबूडकर*  ✍️

  *संगीत : राम कदम*

  *स्वर : जयवंत कुलकर्णी,*

  *बकुळ पंडित, केशर सोलापूरकर,*

  *आणि कांचन*

  *चित्रपट : कुंकू माझं भाग्याचं*

  *(१९७२)*


  🎼🎶🎼🎶🎼    🎧


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

                *२८.०३.२०२५*


🌻🥀🌸🎼🌺🎼🌸🥀🌻

Featured post

Lakshvedhi