🌹⚜️🌹🔆🌅🔆🌹⚜️🌹
🌻 *li.आनंदी°पहाट.il* 🌻
*स्वादिष्ट आगीनफुलांची*
🌸🥀😋🌺🌶️🌺😋🥀🌸
*आमचे शेतकरी धार्मिक प्रवृत्तीचे.. कष्टाळू आहेत. उन.. वारा.. पावसातही शेतातील कामे आनंदाने करतात. त्याचे कष्ट जाणवत नाहीत उलट कामात आनंद शोधतात. शेतात पिके डोलतात तेव्हा त्यांचा आनंद व्दिगुणीत होतो. त्यांच्या कष्टानेच आमच्या ताटात चौरस.. आरोग्यदायी स्वादिष्ट आहार प्राप्त होतो.*
*मिरची.. आमच्या अन्नातील महत्त्वाचा घटक. मिरची मग ती हिरवी.. पिवळी वा लाल असो पण हवीच. मिरचीने पदार्थाची चव.. लज्जत वाढते. एवढेच नाही तर मिरचीमध्ये शरीरास आवश्यक असे अ,ब,क आणि ई जीवनसत्त्वे आहेत. कॅल्शियम.. फॉस्फरस खजिने पण आहेत. मिरचीमधील कॅपसायसीन पदार्थामुळे तिखट चव प्राप्त होते. भारतात तर मिरची अत्यंत लोकप्रिय. ताटातील पदार्थात मिरचीचा वापर हवाच हा आग्रह.*
*मिरचीच्या उत्पादनात भारत हा जगातील प्रथम क्रमांकाचा देश. १५ पेक्षा जास्त प्रकारच्या मिरचीचे उत्पादन होते. आंध्र प्रदेशात गुंटुर प्रमाणेच महाराष्ट्रात नंदुरबार, भिवापूर, मांडळ, पथरोट येथे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. शेतात लहान लहान झाडावर लागलेल्या या मिरच्या तोडून टोपल्यात जमा करुन.. उन्हात वाळवून बाजारात विक्रीस येतात.*
*डोक्यावर सूर्य आग ओकतो. घामाच्या धारा लागतात. तेव्हा या जहाल मिरच्या तोडून वाळविण्यासाठी जमिनीवर पसरल्या जातात. मिरच्या तोडणे.. जमिनीवर दूरवर पसरलेले लाली लाल मिरच्याचे ढीग बघणे सुखद असले तरीही डोक्यावर उन आणि ठसका यामुळे हे काम अत्यंत कष्टाचे ठरते.*
*पण तरीही या कामात शेतकरी भगिनी आनंद शोधतात हे सांगणारे हे गाणे.*
🌹🌼🌾😋🌶️😋🌾🌼🌹
*भर उन्हात जळते धरती,*
*तिच्या काळजाला चटकं बसती*
*त्या ठिणग्या मातीतून फुलती,*
*त्यांचा माणसाकडं ओढा*
*आगीनफुलं ही तोडा बायांनो,*
*आगीनफुलं ही तोडा*
*लाल लाल मिरची तोडा बायांनो,*
*लवंगी मिरची तोडा*
*ही किमया ग मायाळू धरतीची*
*ही जादूगिरी मातीच्या पिरतीची*
*दर वर्षाला बाग-फुलं नवतीची*
*तिखट मिरची हिकडं पिकली,*
*तिकडं उसाचा पेढा*
*आली वयात ग,*
*तांबूस पिवळी झाली*
*कशी किरणानं उन्हात*
*चमके लाली*
*वर पांघरल्या पानांच्या*
*हिरव्या शाली*
*हलक्या हाती पिकली वेचा,*
*कवळी कवळी तोडा*
🌹🌾😋🔆🌶️🔆😋🌾🌹
*गीत : जगदीश खेबूडकर* ✍️
*संगीत : राम कदम*
*स्वर : जयवंत कुलकर्णी,*
*बकुळ पंडित, केशर सोलापूरकर,*
*आणि कांचन*
*चित्रपट : कुंकू माझं भाग्याचं*
*(१९७२)*
🎼🎶🎼🎶🎼 🎧
*🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*
*२८.०३.२०२५*
🌻🥀🌸🎼🌺🎼🌸🥀🌻
No comments:
Post a Comment