Thursday, 27 March 2025

नवीन सुटसुटीत व पारदर्शक पीक विमा योजना आणण्याचे शासनाच्या विचाराधीन

 नवीन सुटसुटीत व पारदर्शक पीक विमा योजना

आणण्याचे शासनाच्या विचाराधीन

- कृषी मंत्री माणिकराव कोकाटे

 मुंबईदि. २६ : केंद्र शासनाच्या पंतप्रधान पीक विमा योजनेतून राज्यात विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येत आहे. नवीन पारदर्शक व सुटसुटीत पीक विमा योजना आणण्याचे शासनाच्या विचाराधीन आहेअसे कृषी मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत नियम २९३ अन्वये ठरावाला उत्तर देताना सांगितले.

 या उत्तरात कृषी मंत्री ॲड कोकाटे म्हणालेजागतिक बँक सहकार्याने पोकरा दोन योजना राज्यात सुरू आहे. याच योजनेच्या धर्तीवर राज्यशासन योजना आणण्याचा विचार करीत आहे. राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आणि डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान सुरू आहे. मात्र दोन्ही योजनांचे एकच उद्दिष्ट असल्यामुळे डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान राष्ट्रीय अभियानात विलिनीकरण करण्यात येणार आहे.

 नैसर्गिक शेती अभियानाचे मुख्यालय अकोला येथे ठेवण्याबाबत तपासून कार्यवाही करण्यात येईल. तसेच  राज्यात मिलेट बोर्ड स्थापन करण्याबाबतही पडताळणी करण्यात येईल. पिक विमा योजनेतून देण्यात येणारी नुकसान भरपाई लवकरच देण्यात येणार आहेअसेही कृषीमंत्री कोकाटे यांनी सांगितले.

नादुरुस्त रोहित्र ४८ तासात बसवण्याची व्यवस्था

 नादुरुस्त रोहित्र ४८ तासात बसवण्याची व्यवस्था

- ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मुंबईदि. २६ : नादुरुस्त रोहित बसविण्यासाठी ३० ते ४० दिवसांचा कालावधी लागत असल्याच्या तक्रारी येत आहेत. मात्र नादुरुस्त रोहित्र ४८ तासात बसविण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधानसभेत नियम २९३ अन्वये ठरावाला उत्तर देताना सांगितले.

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्याराज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना व मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून राज्यात कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जेचा उपयोग करण्यात येत आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून १० टक्के अनुदानावर कृषी पंप देण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या कुसुम आणि राज्याच्या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून २०१५ ते २०२३ पर्यंत १ लाख ८९ हजार ८२० सौर कृषी पंप लावण्यात आले आहे.

  राज्यात मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या लाभासाठी १२ लाख शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज  केले करण्यात आले आहे. आतापर्यंत सौर कृषी पंप योजनेतून ४ लाख ६९ हजार ४४२ कृषी पंप लावण्यात आले आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेतून ४५ लाख कृषी पंपधारक शेतकऱ्यांचे वीज देयक झिरो करण्यात येत आहे. राज्यातील वीज दर कमी करण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगात वीज दर याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्यात पुढील एक वर्षात १० हजार मेगावॉट सौर विजेचे उत्पादन करण्यात येणार आहे. या सर्व प्रयत्नामुळे पहिल्यांदा औद्योगिक विजेचे दर कमी होणार आहेअसेही राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले.

०००

वेव्हज हे भारतातील अशा प्रकारचे पहिलेच जागतिक व्यासपीठ आहे जे आशय सामग्री निर्मिती, बौद्धिक संपदा आणि तांत्रिक नवोन्मेष यांसाठीचे महत्त्वाचे केंद्र

 वेव्हज का?

तुम्ही या उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक असा अथवागुंतवणूकदारसर्जक अथवा नाविन्यपूर्ण निर्मिती करणारे असाया शिखर परिषदेत तुम्हाला इतरांशी जोडले जाण्यासाठीसहयोगासाठीनव्या संशोधनासाठी तसेच  माध्यम आणि मनोरंजन  क्षेत्राच्या परीदृश्यात योगदान देण्यासाठी अनोखा जागतिक मंच उपलब्ध होईल.

वेव्हज हे भारतातील अशा प्रकारचे पहिलेच जागतिक व्यासपीठ आहे जे आशय  सामग्री निर्मितीबौद्धिक संपदा आणि तांत्रिक नवोन्मेष यांसाठीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून भारताचे स्थान उंचावत देशाच्या  सर्जनशील क्षमतेला बळकटी देईल. हा कार्यक्रम उद्योगातील आघाडीच्या व्यावसायिकांना एकत्र आणेल : प्रसारणमुद्रित माध्यमेदूरदर्शनआकाशवाणीचित्रपटऍनिमेशनव्हिज्युअल इफेक्ट्सगेमिंगकॉमिक्सध्वनी आणि संगीतजाहिरातडिजिटल माध्यमसोशल मीडिया प्लॅटफॉर्मनिर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता,  वर्धित वास्तव  (अग्युमेन्तेड रियालिटी)आभासी वास्तव (व्हीआर) आणि विस्तारित वास्तव (एक्सआर).

प्रमुख ठळक कार्यक्रम जे तुम्ही चुकवू शकत नाही

क्रिएट इन इंडिया चॅलेंज -  जगभरातील नवोदित निर्मात्यांच्या प्रतिभेचा अविष्कार साजरा करणारा एक अभूतपूर्व उपक्रमअर्थात मुंबईत होणाऱ्या वेव्हज 2025 मध्ये आपल्या प्रतिभेची झलक दाखवण्यासाठी  वेव्हज’ हे एक आघाडीचे व्यासपीठ म्हणून सज्ज आहे.

वेव्हेक्स 2025 - हा उपक्रम एक मैलाचा दगड ठरणारा असून यामाध्यमातून मीडिया-टेक स्टार्टअप्स त्यांच्या नवकल्पना आघाडीच्या उद्योग धुरिणांसमोर आणि सेलिब्रिटी एंजल गुंतवणूकदारांसमोर सादर करतीलज्यामुळे  भारताच्या माध्यम आणि मनोरंजन परिसंस्थेच्या भविष्याला नवीन दिशा मिळेल.

वेव्हज बाजार: चित्रपटगेमिंगसंगीतजाहिरात आणि एक्सआरनिर्मातेगुंतवणूकदार आणि इतर व्यवसायांना जोडणारी एक अद्वितीय जागतिक बाजारपेठ. यातूनच उद्योग व्यावसायिकांना  उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडण्याच्या संधी देखील देते.

मास्टरक्लासेस आणि परस्परसंवादी सत्रे - उद्योगातील दिग्गज आणि जागतिक नेत्यांकडून शिकण्याचीमाध्यममनोरंजन आणि तंत्रज्ञानाच्या भविष्याबद्दल अंतर्दृष्टी मिळविण्याची एक दुर्मिळ संधी.

या आमच्याबरोबर या लाटांवर स्वार व्हाजर तुम्ही अभ्यागत असाल तर येथे नोंदणी कराआणि जर विद्यार्थी असाल तर येथे नोंदणी करा

पीआयबीच्या टीम वेव्हज कडून येणाऱ्या नवीनतम घोषणांसह अपडेट राहा.

तुम्हाला काही प्रश्न आहेत का येथे त्यांची उत्तरे मिळावा.

* * *

तुमच्या वृत्तांकनातून होऊ देत वेव्हज अर्थात आशयघन लहरींची निर्मिती ! जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद (वेव्हज) 2025 साठी माध्यम प्रतिनिधींची नोंदणी सुरू

 तुमच्या वृत्तांकनातून होऊ देत वेव्हज अर्थात आशयघन लहरींची निर्मिती !

जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद (वेव्हज) 2025 साठी

माध्यम प्रतिनिधींची नोंदणी सुरू

मुंबईत 1 ते 4 मे 2025 या कालावधीत होणाऱ्या

वेव्हज पदार्पण शिखर परिषदेत मनोरंजन क्षेत्रातील भविष्याचा अनुभुती घ्या!

 

मुंबई26 मार्च 2025 : मुंबईत 1 ते 4 मे 2025 दरम्यान होणारी पहिली वाहिली जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद (वेव्हज) ही जागतिक माध्यमे आणि मनोरंजन (एम आणि ई) उद्योगात लाटा निर्माण करण्यासाठी सज्ज आहे. परिषदेच्या आयोजनाची तयारी अंतिम टप्प्यात असताना आता परिषदेच्या वृत्तांकनासाठी येवू इच्छिणाऱ्या माध्यम प्रतिनिधींच्या नोंदणीला 25 मार्च 2025 पासून प्रारंभ झाला आहे. या नोंदणीच्या माध्यमातून  कार्यक्रमाचे वृत्तांकन करण्यासाठी पत्रकारछायाचित्रकारआशय निर्माते आणि माध्यम विश्वातील तज्ञांना आमंत्रित करण्यात आले आहे. नोंदणी करा  आणि प्रतिभेचा उत्तुंग अविष्कार दर्शवणारे वृत्तांकन करून जगातील आशयनिर्मात्यांना जोडण्यासाठी  आणि भारतातील माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्राला अधिक समृद्ध करण्यासाठी सज्ज  व्हा.  तुमचे वार्तांकन खरोखर वेव्हज अर्थात माहितीविषयक तरंग निर्मिती करेल.

जर तुम्हाला पत्रकारितामाध्यम उद्योग  किंवा  आशय कथनाची  आवड असेलतुम्ही  पत्रकार असाल कॅमेरापर्सनआशय निर्माते  किंवा समाज माध्यमातील व्यावसायिक असाल,  तर तुम्ही वेव्हज  2025 चुकवू शकत नाही! येथे होणाऱ्या चर्चासत्रात सहभागी व्हाउद्योगधुरीणांकडून शिका     आणि उदयोन्मुख क्रिएटर्सना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सहाय्य करा. वेव्हज शिखर परिषद 2025 हे  तुमच्यासाठी उद्योगांची अंतर्दृष्टी प्रदान करणारेजागतिक नेटवर्किंग तसेच  माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रातील अभूतपूर्व नाविन्यपूर्ण कल्पनांचा वेध घेण्यासाठी एक खुले प्रवेशद्वार ठरेल.

माध्यम प्रतिनिधींची नोंदणी प्रक्रिया

वेव्हज माध्यम प्रतिनिधी म्हणून नोंदणी करण्यासाठीअर्जदारांनी हे करणे आवश्यक आहे:

✅ 1 जानेवारी 2025 पर्यंत 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असावे.

✅ मान्यताप्राप्त प्रसार माध्यमांवर  वार्ताहरछायाचित्रकारकॅमेरा पर्सन किंवा डिजिटल कंटेंट क्रिएटर म्हणून काम केलेले असावे.

✅ वरील निकष पूर्ण करणारे फ्रीलांस पत्रकार देखील पात्र आहेत.

✅ ऑनलाइन नोंदणी करा: https://app.wavesindia.org/register/media

✅ नोंदणी कधी सुरु होणार : 26 मार्च 2025

✅ नोंदणी अंतिम तारीख: 10 एप्रिल 2025 रोजी रात्री 11:59 (IST)

✅ माध्यम प्रतिनिधी पास संकलन: मान्यता मिळालेल्या माध्यम प्रतिनिधींना माध्यम प्रतिनिधी पास संकलन करण्यासंदर्भातील तपशीलांची माहिती योग्य वेळी दिली जाईल.

✅ माध्यम प्रतिनिधी नोंदणी धोरणाविषयीच्या माहितीसाठी येथे पहा.

✅ परिशिष्ट ब नुसार माध्यम प्रतिनिधी नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी येथे शोधा.

✅ काही प्रश्न किंवा शंका असल्यास ‘WAVES Media Accreditation Query’. या शीर्षकासह pibwaves.media[at]gmail[dot]com वर ईमेलद्वारा संपर्क करा.

नोंदणी प्रक्रियेच्या वेळी सर्व आवश्यक कागदपत्र अपलोड केले आहेत याची कृपया खात्री करून घ्या. सर्व अर्जांची पडताळणी केल्यानंतर मीडिया अ‍ॅक्रिडिटेशनची मंजुरी ईमेलद्वारे कळवली जाईल.  फक्त पीआयबी-मान्यताप्राप्त माध्यम प्रतिनिधीचमाध्यम प्रतिनिधी  पाससाठी पात्र असतील. याविषयीची मान्यतामाध्यम संस्थेचा आवाकापुनरावृत्तीमनोरंजन क्षेत्राला दिलेले प्राधान्य आणि वेव्हज च्या अपेक्षित वृत्तांकनावर आधारित असेल.

 

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील यश क्रीडा क्षेत्रासाठी सुवर्णक्षण

 राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील यश क्रीडा क्षेत्रासाठी सुवर्णक्षण

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई दि. २६ : उत्तराखंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली. खेळाडूंची ही उल्लेखनीय कामगिरी महाराष्ट्र आणि भारताच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद व सुवर्णक्षण असल्याचे गौरवउद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या पथकातील खेळाडूनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दलनवी दिल्ली येथे पार पडलेल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष तसेच महिला संघाने  अजिंक्य पद पटकावल्याबद्दल आणि तेहरान येथे झालेल्या सहाव्या महिला आशियाई कबड्डी स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाने जेतेपद पटकावल्याबद्दल  अभिनंदनचा प्रस्ताव मांडला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या विजयी खेळाडूंचेतसेच भारतीय खो-खो संघ आणि भारतीय महिला कबड्डी संघाचे  अभिनंदन केले. तसेचरणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या विदर्भ संघालाही शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकतालिकेत प्रथम क्रमांक

मुख्यमंत्री फडणवीस अभिनंदनपर भाषणात म्हणालेया स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण २०१ पदके मिळवलीत्यात ५४ सुवर्ण७१ रौप्य आणि ७६ कांस्य पदकांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या ५८० खेळाडूंनी ३२ क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेतलात्यापैकी २६ क्रीडा प्रकारांमध्ये महाराष्ट्राने पदकांची कमाई केली. ॲथलेटिक्समध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक १२ सुवर्ण पदके पटकावली. महाराष्ट्राने तिसऱ्यांदा पदक तालिकेत प्रथम क्रमांक पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांचे राज्यभरातून कौतुक होत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

पुरुषमहिला खो-खो संघाची देदिप्यमान कामगिरी

भारतीय पुरुष आणि महिला खो-खो संघाने पहिल्या विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोअर स्टेडियममध्ये झालेल्या या स्पर्धेत दोन्ही भारतीय संघ अपराजित राहिले. या स्पर्धेत दोन्ही संघाने देदिप्यमान कामगिरी करत दमदार विजयासह इतिहास रचला.

महिला कबड्डी संघाचा अभिमान

भारतीय महिला कबड्डी संघाने सहाव्या महिला आशियाई कबड्डी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे. क्रिकेटव्यतिरिक्तही भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करत आहेतयाचा अभिमान संपूर्ण देशाला वाटते असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आपल्या अभिनंदनपर भाषणात म्हणाले.

विदर्भ क्रिकेट संघाचे अभिनंदन

देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत सर्वात प्रतिष्ठेची रणजी ट्रॉफी यंदा विदर्भ संघाने जिंकली आहे. देशभरातील विविध राज्यांच्या संघांमध्ये चुरशीच्या सामन्यांनंतर विदर्भाने अंतिम विजय मिळवला याबद्दल   मुखमंत्री श्री. फडणवीस यांनी विदर्भ क्रिकेट संघातील खेळाडू प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.

००००

भारत निवडणूक आयोगातर्फे 1 लाखांहून अधिक मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसाठी (BLO) प्रशिक्षण सुरू,pl share

 भारत निवडणूक आयोगातर्फे 1 लाखांहून अधिक मतदान केंद्रस्तरीय

अधिकाऱ्यांसाठी (BLO) प्रशिक्षण सुरू

* बिहारपश्चिम बंगाल आणि आसाम येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची पहिली तुकडी

   IIIDEM मध्ये दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी

* क्षेत्रीय स्तरावर कार्यरत निवडणूक अधिकाऱ्यांसाठी सातत्यपूर्णव्यावहारिक आणि

    परिस्थितीनुसार आधारित प्रशिक्षण

* देशभरातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे नेटवर्क मजबूत करण्यासाठी प्रशिक्षित मतदान

   केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना विधानसभा मतदारसंघ स्तरावर मास्टर ट्रेनर म्हणून नियुक्त करणार.

 

मुंबईदि. 26 : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार व निवडणूक आयुक्त डॉ. विवेक जोशी यांनी नवी दिल्ली येथील भारतीय आंतरराष्ट्रीय लोकशाही व निवडणूक व्यवस्थापन संस्था (IIIDEM) येथे प्रथमच होणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे राज्य सरकारी कर्मचारी असतातज्यांची नियुक्ती मतदार नोंदणी अधिकारी (ERO) द्वारे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या (DEO) मंजुरीनंतर केली जाते. मतदार यादी त्रुटीविरहित ठेवण्यात मतदार नोंदणी अधिकारी आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राज्य सरकारांनी मतदार नोंदणी अधिकारी म्हणून SDM स्तरावरील किंवा समकक्ष अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी आणि मतदान केंद्राच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या अधिकाऱ्यांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यावर विचार करावाअसे सांगितले.

मुख्य निवडणूक आयुक्तांनी असेही सांगितले कीभारतीय संविधानाच्या अनुच्छेद 326 आणि लोक प्रतिनिधित्व अधिनियम 1950 च्या कलम 20 नुसार18 वर्षे पूर्ण झालेले आणि संबंधित मतदान केंद्राच्या क्षेत्राचे सामान्य रहिवासी असतील असे भारतीय नागरिक हे मतदार होऊ शकतात.

तसेचमुख्य निवडणूक अधिकारीजिल्हा निवडणूक अधिकारी आणि मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील मतदारयाद्यांचे अद्यतन करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकांचे आयोजन करण्याच्या सूचना आहेत.

याशिवायमतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्या विरोधात कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास कठोर कारवाई केली जाईलअसा इशारा देतमतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधताना सौजन्यशील आणि सभ्य वर्तन ठेवण्यास सांगितले.

येत्या काही वर्षांत अशा प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे दर 10 मतदान केंद्रांसाठी एक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी या प्रमाणात एकूण 1 लाखाहून अधिक मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांना प्रशिक्षित केले जाईल. हे प्रशिक्षित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 100 कोटी मतदार आणि आयोग यांच्यातील प्रथम व सर्वांत महत्त्वाचा दुवा आहेत. विधानसभा मतदारसंघस्तरावरील मास्टर प्रशिक्षक (ALMT) यांचा गट तयार करून ते देशभरातील मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांचे नेटवर्क मजबूत करतील.

हा क्षमता बांधणीचा प्रशिक्षण कार्यक्रम टप्प्याटप्प्याने सुरु राहील. प्रथम टप्प्यात निवडणूक होणाऱ्या राज्यांवर भर दिला जाईल. सध्या बिहारपश्चिम बंगाल आणि आसाम येथील 109 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तसेच बिहारपश्चिम बंगालआसामकेरळपुद्दुचेरी आणि तामिळनाडू येथील 24 मतदार नोंदणी अधिकारी आणि 13 जिल्हा निवडणूक अधिकारी हे या दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत.

या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना लोक प्रतिनिधित्व अधिनियम 1950मतदार नोंदणी नियम 1960 आणि भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांच्या जबाबदाऱ्या समजावून सांगणे आणि मतदार यादी त्रुटीविरहित ठेवण्याच्या प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करणे हा आहे. तसेचया प्रशिक्षणामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना त्यांच्या कार्यासाठी उपयुक्त आयटी प्रणालींची माहिती दिली जाईल.

मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले कीभारतीय निवडणूक आयोग नेहमीच भारताच्या 100 कोटी मतदारांसोबत राहीलअसे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी विशेष कार्यक्रम

 शिवकालीन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी विशेष कार्यक्रम

- सांस्कृतीक कार्य मंत्री आशिष शेलार

 

मुंबईदि. २६ : राज्यातील शिवकालीन किल्ल्यांच्या जतनासाठी आणि संवर्धनासाठी राज्य शासनाने वेगळी योजना तयार केली असूनत्यावर प्रगतिपूर्वक काम सुरू आहे. केंद्र संरक्षित २४राज्य संरक्षित २३तसेच असंरक्षित १०८ किल्ल्यांच्या स्वच्छतापाणीपुरवठाघनकचरा व्यवस्थापन आदींसाठी राज्य पर्यटन योजना आणि रायगड प्राधिकरणाच्या मदतीने कामे सुरू असल्याचे सांस्कृतीक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी आज विधानसभेत नियम २९३ अन्वये ठरावाला उत्तर देताना सांगितले.

सांस्कृतीक कार्य मंत्री शेलार म्हणालेकोकणातील एकूण ४७ किल्ल्यांपैकी २४ किल्ल्यांची देखभाल भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून केली जातेतर उर्वरित २३ किल्ले राज्य संरक्षित स्मारक म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. गड-किल्ल्यांच्या दुरुस्ती आणि जतनासाठी जिल्हा नियोजनातून तीन टक्के निधी खर्च केला जात आहे. योजनेअंतर्गत सध्या १९ किल्ल्यांवर काम सुरू असूनदोन किल्ल्यांचे संवर्धन पूर्ण होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे.

सुवर्णदुर्गखांदेरीविजयदुर्गरायगडसिंधुदुर्ग यांसारख्या महत्त्वाच्या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ (World Heritage Tag) घोषित करण्यासाठी राज्य सरकारकडून पाठपुरावा केला जात आहे.

शिवकालीन किल्ल्यांचा महत्त्वाचा वारसा जतन करून त्यांच्या दुरुस्तीला गती देण्यासाठी विशेष उपक्रम सुरू केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

0000

Featured post

Lakshvedhi