वेव्हज का?
तुम्ही या उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक असा अथवा, गुंतवणूकदार, सर्जक अथवा नाविन्यपूर्ण निर्मिती करणारे असा, या शिखर परिषदेत तुम्हाला इतरांशी जोडले जाण्यासाठी, सहयोगासाठी, नव्या संशोधनासाठी तसेच माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या परीदृश्यात योगदान देण्यासाठी अनोखा जागतिक मंच उपलब्ध होईल.
वेव्हज हे भारतातील अशा प्रकारचे पहिलेच जागतिक व्यासपीठ आहे जे आशय सामग्री निर्मिती, बौद्धिक संपदा आणि तांत्रिक नवोन्मेष यांसाठीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून भारताचे स्थान उंचावत देशाच्या सर्जनशील क्षमतेला बळकटी देईल. हा कार्यक्रम उद्योगातील आघाडीच्या व्यावसायिकांना एकत्र आणेल : प्रसारण, मुद्रित माध्यमे, दूरदर्शन, आकाशवाणी, चित्रपट, ऍनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, ध्वनी आणि संगीत, जाहिरात, डिजिटल माध्यम, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता, वर्धित वास्तव (अग्युमेन्तेड रियालिटी), आभासी वास्तव (व्हीआर) आणि विस्तारित वास्तव (एक्सआर).
प्रमुख ठळक कार्यक्रम जे तुम्ही चुकवू शकत नाही
‘क्रिएट इन इंडिया चॅलेंज - जगभरातील नवोदित निर्मात्यांच्या प्रतिभेचा अविष्कार साजरा करणारा एक अभूतपूर्व उपक्रम, अर्थात मुंबईत होणाऱ्या वेव्हज 2025 मध्ये आपल्या प्रतिभेची झलक दाखवण्यासाठी ‘वेव्हज’ हे एक आघाडीचे व्यासपीठ म्हणून सज्ज आहे.
वेव्हेक्स 2025 - हा उपक्रम एक मैलाचा दगड ठरणारा असून यामाध्यमातून मीडिया-टेक स्टार्टअप्स त्यांच्या नवकल्पना आघाडीच्या उद्योग धुरिणांसमोर आणि सेलिब्रिटी एंजल गुंतवणूकदारांसमोर सादर करतील, ज्यामुळे भारताच्या माध्यम आणि मनोरंजन परिसंस्थेच्या भविष्याला नवीन दिशा मिळेल.
वेव्हज बाजार: चित्रपट, गेमिंग, संगीत, जाहिरात आणि एक्सआर, निर्माते, गुंतवणूकदार आणि इतर व्यवसायांना जोडणारी एक अद्वितीय जागतिक बाजारपेठ. यातूनच उद्योग व्यावसायिकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडण्याच्या संधी देखील देते.
मास्टरक्लासेस आणि परस्परसंवादी सत्रे - उद्योगातील दिग्गज आणि जागतिक नेत्यांकडून शिकण्याची, माध्यम, मनोरंजन आणि तंत्रज्ञानाच्या भविष्याबद्दल अंतर्दृष्टी मिळविण्याची एक दुर्मिळ संधी.
या आमच्याबरोबर या लाटांवर स्वार व्हा, जर तुम्ही अभ्यागत असाल तर येथे नोंदणी करा; आणि जर विद्यार्थी असाल तर येथे नोंदणी करा
पीआयबीच्या टीम वेव्हज कडून येणाऱ्या नवीनतम घोषणांसह अपडेट राहा.
तुम्हाला काही प्रश्न आहेत का ? येथे त्यांची उत्तरे मिळावा.
* * *
No comments:
Post a Comment