Wednesday, 26 March 2025

ठाणे जिल्ह्यातील आंबिवली येथील इराणी वस्तीमध्ये कोंम्बिग ऑपरेशनसह ऑल आऊट ऑपरेशन राबवणार

 ठाणे जिल्ह्यातील आंबिवली येथील इराणी वस्तीमध्ये

कोंम्बिग ऑपरेशनसह ऑल आऊट ऑपरेशन राबवणार

- गृह राज्यमंत्री योगेश कदम

 

मुंबईदि. २६ : ठाणे जिल्ह्यातील आंबिवली येथील इराणी वस्तीमध्ये गुन्हेगारांना पकडण्यासाठी तसेच गुन्हेगारांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ले होण्याचे प्रकार  वारंवार घडले आहेत. त्यामुळे या इराणी वस्तीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन  आणि ऑल आऊट ऑपरेशन राबवण्यात येणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधानपरिषदेत दिली.

            सदस्य प्रविण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री कदम बोलत होते. यावेळी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे,  सदस्य अनिल परब यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.

            अनेक वर्षांपासून आंबिवली येथे इराणी वस्ती असल्याचे सांगून राज्यमंत्री कदम म्हणाले कीएखाद्या आरोपीवर कारवाईसाठी पोलीस या वस्तीमध्ये गेले असता त्याठिकाणी  महिला समोर येऊन पोलीसांवर हल्ले करतात. याठिकाणी अनेक सराईत गुन्हेगार लपतात.  तसेच या वस्तीमध्ये अनेक अनधिकृत बांधकामे देखील आहेत. या बांधकामांवरही कारवाई करण्यात येणार आहे. या वस्तीमध्ये आश्रय घेणाऱ्या गुन्हेगारांवर आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल. तसेच अनेकवेळा गुन्हेगार हे पडीक इमारतीवापरात नसलेल्या इमारतींचा आश्रय घेत असल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे अशा बांधकामांवरही कारवाई करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सराईत गुन्हेगारांवर कारवाईसाठी एटीएसचीही मदत घेतली जाणार असल्याची माहिती राज्यमंत्री कदम यांनी दिली.


*अर्जंट पाहिजेत....*

 *अर्जंट पाहिजेत....*


*🤲इच्छुक व्यक्तींनी संपर्क साधावा🤲*


*एक शिंपी पाहिजे,*

*जो एकमेकांची तुटलेली नाती शिवु शकेल*


*एक इलेक्ट्रिशियन पाहिजे,*

👉🏻 *जो एकमेकांशी न*

     *बोलणाऱ्या दोन व्यक्तीमध्ये पुन्हा*

     *एकदा कनेक्शन जोडून देईल,✌🏻*


*एक ऑप्टिशियन पाहिजे,*

👉🏻 *जो लोकांची दृष्टी आणि*

     *दृष्टीकोन नीट करून देईल,👍🏻*


*एक कलाकार पाहिजे,*

👉🏻 *जो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित*

     *हास्याच्या रेषा रेखाटू शकेल,😊*


*एक बांधकाम कामगार पाहिजे,*

👉🏻 *जो दोन शेजाऱ्यांमध्ये*

     *उत्तम सेतू उभारू शकेल,*


*एक माळी काका पाहजे,*

👉🏻 *जो चांगल्या विचारांच*

      *रोपण करू शकेल,☝🏻*


*एक प्लंम्बर पाहिजे,*

👉🏻 *जो तुंबलेल्या मनांना*

     *मोकळं करू शकेल,🤗*


*एक शास्त्रज्ञ पाहिजे,*

👉🏻 *जो एकमेकांबद्दलची*

     *ओढ शोधू शकेल,😌*


*आणि सर्वात महत्वाचे म्हणजे,*


*एक शिक्षक पाहिजे,*

👉🏻 *जो एकमेकांशी संवाद कसा*

     *साधायचा ते शिकवू शकेल,*☝🏻


*आज तुम्हा-आम्हा, सर्वांना*

*याचीच नितांत गरज आहे..!!*

" या जन्मावर, या जगण्यावर, शतदा ( शंभर  वेळा ) प्रेम करावे." 


*संपर्क :- माणसाने माणसाशी करावा .*


    🚩तुमचा दिवस आनंदात जाओ 🚩

मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांवर नियंत्रणासाठी आयएएस दर्जाचा अधिकारी नेमणार

 मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाच्या कामांवर नियंत्रणासाठी


आयएएस दर्जाचा अधिकारी नेमणार


- मंत्री उदय सामंत


 


मुंबई, दि. 25 : मुंबईमध्ये रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर काँक्रिटीकरण सुरू आहे. या कामावर नियंत्रण ठेवणे आणि दर्जा राखण्यासाठी भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस दर्जाच्या) अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.


                सदस्य प्रसाद लाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते.


                मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाबाबत महत्वपूर्ण बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाल्याचे सांगून मंत्री सामंत म्हणाले की, नेमणूक करण्यात आलेला अधिकारी हा काँक्रिटीकरणाच्या कामावर देखरेख ठेवण्यासोबतच कामाचा दर्जा तपासणे

अहिल्यादेवींच्या कारकिर्दीतील बारव स्थापत्य कॉफीटेबल बुकचे प्रकाशन

 अहिल्यादेवींच्या कारकिर्दीतील बारव स्थापत्य कॉफीटेबल बुकचे प्रकाशन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त विशेष ग्रंथाचे आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या कारकीर्दीतील बारव स्थापत्य या कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

पाण्याचे महत्व जाणून राज्यातील जनतेसाठीच नव्हे तर विविध प्रांतातील लोकांसाठी जलस्त्रोताचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने अळिल्यादेवींनी बारवांची निर्मिती केली व आवश्यक त्या ठिकाणी त्यांचे जिर्णोद्धारही केले. या ग्रंथात अहिल्यादेवींच्या कारकिर्दीतील तसेच अन्य जीर्णोद्धारित काही निवडक बारवपायविहिरतलावपुष्करणी या जलव्यवस्थापनाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्वाच्या असलेल्या स्थानांची. छायाचित्रांसह संक्षिप्तपणे माहिती देण्यात आली आहे.

जन्मशताब्दी निमित्त प्रकाशीत ग्रंथात जन्मस्थळ चौंडीराजधानी महेश्वरीउपराजधानी चांदवडइंदूर येथील राजवाडाकारकिर्दीतील प्रशासनलोककल्याणकारी धोरणन्यायदानआर्थिक नियोजनचलनराजचिन्ह अश्या महत्वपूर्ण पैलू संदर्भात परंतु महत्वपूर्ण माहिती या ग्रंथात देण्यात आली आहे.


चित्रीकरण परवानगीसाठी एक खिडकी प्रणालीचे,चित्रीकरणासाठी सात दिवसांत परवानगी

 चित्रीकरण परवानगीसाठी एक खिडकी प्रणालीचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

चित्रीकरणासाठी सात दिवसांत परवानगी

सांस्कृतिक कार्य विभागाच्या 100 दिवस कार्यपूर्तीसंदर्भात सादरीकरण

 

 मुंबई दि 25 चित्रीकरणासाठी लागणाऱ्या विविध विभागांच्या परवानग्या सुलभरीतीने व मुदतीमध्ये मिळाव्यात या दृष्टीने ऑनलाईन प्रणालीद्वारे एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे.  मुंबई व उपनगर परिसरात चित्रीकरण परवानगीसाठी एक खिडकी प्रणाली अंतर्गत सात दिवसांत परवानगी मिळणार आहे. या प्रणालीचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. 

विधीमंडळ येथे सांस्कृतिक कार्य विभागाच्या 100 दिवसांची कार्यपुर्तीसंदर्भात सादरीकरण करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारसांस्कृतिक कार्य विभाग मंत्री ॲड आशिष शेलारउद्योग मंत्री उदय सामंतविधानपरिषदेचे सभापती राम शिंदेराज्यमंत्री आशिष जयस्वालमुख्य सचिव सुजाता सौनिकविभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेफिल्म सिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. 100 दिवस कार्यक्रम अंतर्गत उद्दिष्ट पुर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी विभागाचे अभिनंदन केले.

ईज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत मुंबई व मुंबई उपनगरातील चित्रपटटीव्ही मालिकाजाहिरातपट व माहितीपट इत्यादींच्या चित्रीकरणांसाठी एक खिडकी योजनेअंतर्गत आता सात दिवसांत परवानगी मिळणार असल्याची माहिती यावेळी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी दिली.  'एक खिडकी प्रणाली ही राज्यभरातील चित्रीकरणाची परवानगी मिळविण्यासाठी निर्मातेनिर्मिती संस्थांना आणि लोकेशन मॅनेजर यांना माहिती देणारी एकमेव ऑनलाईन प्रणाली असून महाराष्ट्रभर या प्रणालीचा विस्तार करण्यात आला असून त्या दृष्टीने प्रणालीचे अद्यावतीकरण करण्यात आले आहे.

भंडारा तहसीलदार यांची नियमबाह्य कामांच्या प्रकरणात विभागीय चौकशी करणार

 भंडारा तहसीलदार यांची नियमबाह्य कामांच्या

प्रकरणात विभागीय चौकशी करणार

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि. 25 : भंडाऱ्याच्या तहसीलदार विनीता लांजेवार यांनी नियमबाह्य कामे केल्यामुळे निलंबित करण्यात आले होते. मात्र त्यांला 'मॅट'ने स्थगिती दिली. त्यामुळे त्यांची बदली करण्यात येईल. व विभागीय चौकशी सुरू करण्यात येत असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

याबाबत सदस्य नरेंद्र भोंडेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली.

महसूल मंत्री बावनकुळे म्हणालेशेतीला अकृषक परवानगीचे आदेश दिल्याप्रकरणी भंडाऱ्याच्या तहसीलदार विनीता लांजेवार यांना महसूल खात्याने निलंबित केले होते.  या निलंबन आदेशाला मॅट ने स्थगिती दिली.

यासंदर्भात भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या चौकशी संदर्भातही कार्यवाही सुरु करण्यात येईलअसे मसहूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

0000

सिंहगड किल्ला विकासासाठी तीन महिन्यांत एकत्रित विकास आराखडा

 सिंहगड किल्ला विकासासाठी तीन महिन्यांत एकत्रित विकास आराखडा

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबईदि. 25 : सिंहगड किल्ल्याशी संबंधित विविध प्रश्न सोडवण्यासाठी पर्यटन विभागपुरातत्व विभागवन विभागसार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यासह जिल्हाधिकारीमहानगरपालिका यांची पालकमंत्र्यांच्या संमतीने  एकत्रित बैठक घेऊन 15 दिवसांत प्रस्ताव पाठवला जाईल. तसेच तीन महिन्यात एकत्रित विकास आराखडा तयार करण्यात येईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

याबाबत सदस्य भीमराव तापकीर यांनी लक्षवेधी सूचना मांडली.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार म्हणालेपुरातत्व विभागाच्या प्राप्त निधीतून वेळोवेळी जतन व संवर्धनाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये छत्रपती राजाराम महाराज समाधी परिसर व वाडा जतन व दुरुस्तीसाठी पुरातत्व विभागाने निधी मंजूर केला आहे. तसेच पर्यटकांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा निर्माण करण्यासाठी सुसज्ज स्वच्छता गृह बांधणे व 30 वर्षापर्यंत देखरेख करण्यासाठी मंजूरी प्राप्त असून त्याबाबतचे कार्यारंभ आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.किल्ल्याच्या स्वच्छतेसाठी सीएसआर (CSR) फंडातून गेल्या 4 वर्षापासून 5 कर्मचारी व विभागाचा एक पूर्णवेळ कर्मचारी यांची नियुक्ती पुरातत्व विभागाकडून करण्यात आली असून स्थळाची दैनंदिन देखभालस्वच्छता व परिक्षण ही कामे केली जात आहेत.

Featured post

Lakshvedhi