Wednesday, 26 March 2025

चित्रीकरण परवानगीसाठी एक खिडकी प्रणालीचे,चित्रीकरणासाठी सात दिवसांत परवानगी

 चित्रीकरण परवानगीसाठी एक खिडकी प्रणालीचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

चित्रीकरणासाठी सात दिवसांत परवानगी

सांस्कृतिक कार्य विभागाच्या 100 दिवस कार्यपूर्तीसंदर्भात सादरीकरण

 

 मुंबई दि 25 चित्रीकरणासाठी लागणाऱ्या विविध विभागांच्या परवानग्या सुलभरीतीने व मुदतीमध्ये मिळाव्यात या दृष्टीने ऑनलाईन प्रणालीद्वारे एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे.  मुंबई व उपनगर परिसरात चित्रीकरण परवानगीसाठी एक खिडकी प्रणाली अंतर्गत सात दिवसांत परवानगी मिळणार आहे. या प्रणालीचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. 

विधीमंडळ येथे सांस्कृतिक कार्य विभागाच्या 100 दिवसांची कार्यपुर्तीसंदर्भात सादरीकरण करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारसांस्कृतिक कार्य विभाग मंत्री ॲड आशिष शेलारउद्योग मंत्री उदय सामंतविधानपरिषदेचे सभापती राम शिंदेराज्यमंत्री आशिष जयस्वालमुख्य सचिव सुजाता सौनिकविभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगेफिल्म सिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. 100 दिवस कार्यक्रम अंतर्गत उद्दिष्ट पुर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी विभागाचे अभिनंदन केले.

ईज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत मुंबई व मुंबई उपनगरातील चित्रपटटीव्ही मालिकाजाहिरातपट व माहितीपट इत्यादींच्या चित्रीकरणांसाठी एक खिडकी योजनेअंतर्गत आता सात दिवसांत परवानगी मिळणार असल्याची माहिती यावेळी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी दिली.  'एक खिडकी प्रणाली ही राज्यभरातील चित्रीकरणाची परवानगी मिळविण्यासाठी निर्मातेनिर्मिती संस्थांना आणि लोकेशन मॅनेजर यांना माहिती देणारी एकमेव ऑनलाईन प्रणाली असून महाराष्ट्रभर या प्रणालीचा विस्तार करण्यात आला असून त्या दृष्टीने प्रणालीचे अद्यावतीकरण करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi