Wednesday, 26 March 2025

शाळा, महाविद्यालयात अँटी नार्कोटिक्स क्लबची स्थापना प्रत्येक पोलीस स्टेशनला अमली पदार्थ विरोधी सेल सुरू करण्यात आलेला आहे. या माध्यमातून अमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि साठवणुकीवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या अँटी नार्कोटिक्स क्लबची स्थापना करण्यात येणार आहे. या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थीच अंमली पदार्�

 शाळा, महाविद्यालयात अँटी नार्कोटिक्स क्लबची स्थापना


प्रत्येक पोलीस स्टेशनला अमली पदार्थ विरोधी सेल सुरू करण्यात आलेला आहे. या माध्यमातून अमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि साठवणुकीवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या अँटी नार्कोटिक्स क्लबची स्थापना करण्यात येणार आहे. या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थीच अंमली पदार्�



प्रत्येक पोलीस स्टेशनला अमली पदार्थ विरोधी सेल सुरू करण्यात आलेला आहे. या माध्यमातून अमली पदार्थांची विक्रीवाहतूक आणि साठवणुकीवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच शाळामहाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या अँटी नार्कोटिक्स क्लबची स्थापना करण्यात येणार आहे. या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थीच अंमली पदार्�


राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानार्थ कृतज्ञता भिंतीचे भूमिपूजन

 राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत


स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानार्थ कृतज्ञता भिंतीचे भूमिपूजन


 


मुंबई, दि. २५ : राज्यपाल सी पी राधाकृष्णन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयाशेजारील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याशेजारी देशातील स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानार्थ कृतज्ञता भिंतीच्या निर्मितीसाठी भूमिपूजन करण्यात आले. 


चक्र व्हिजन इंडिया फाउंडेशन ट्रस्टच्या पुढाकाराने या कृतज्ञता भिंतीची (Tribute Wall: The Wall of Honour for Freedom Fighters) निर्मिती केली जात आहे.


भूमिपूजन सोहळ्याला विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पुडुचेरी विधानसभेचे अध्यक्ष एम्बलम आर सेल्वम, राज्याचे माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार श्रीकांत भारतीय, चक्र व्हिजन इंडिया फाउंडेशन ट्रस्टचे संस्थापक चक्र राजशेखर, उपाध्यक्ष गगन महोत्रा आदी उपस्थित होते.  


यावेळी बोलताना चक्र व्हिजन ट्रस्टचे संस्थापक चक्र राजशेखर यांनी कृतज्ञता भिंत निर्मितीची संकल्पना स्पष्ट केली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी विविध राज्यांमधील स्वातंत्र्य सैनिकांनी योगदान दिले आहे. परंतु इतर राज्यांमधील स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाची लोकांना कल्पना नसते. 70 फूट लांब व दहा फूट रुंद अश्या प्रस्तावित भिंतीवर देशभरातील स्वातंत्र्य सैनिकांची नावे कोरलेली असतील असे त्यांनी सांगितले. या ठिकाणी क्यूआर कोड असेल ज्यामुळे प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकांची माहिती मिळू शकेल असे त्यांनी सांगितले.


तामिळनाडू व महाराष्ट्राचे संबंध पूर्वापार अतिशय घनिष्ट असून छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील तामिळनाडूला भेट दिली होती व तंजावूर येथील सरस्वती ग्रंथालय आजही उभे असल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण देशभरात अश्याप्रकारे 108 भिंतींची निर्मिती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या 980 आश्रमशाळा

 राज्यात इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या 980 आश्रमशाळा

इमाव व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

मुंबईदि. 25 : राज्यात इतर मागास व बहुजन कल्याण विभागांतर्गत 980 विजाभज खासगी अनुदानित निवासी आश्रमशाळा सुरू आहे. यामध्ये 530 प्राथमिक शाळा, 302 माध्यमिक आणि 148 उच्च माध्यमिक आश्रमशाळा आहेअशी माहिती इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य बबनराव लोणीकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. प्रश्नाच्या चर्चेमध्ये सदस्य नारायण कुचे यांनी सहभाग घेतला.

या प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना मंत्री सावे म्हणालेप्राथमिक निवासी आश्रम शाळांपैकी 59 प्राथमिक आश्रम शाळांना 19 जुलै 2019 रोजी बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार इयत्ता 8 वी चा वर्ग मंजूर केला आहे. या भागात अन्य कुठलीही शाळा नसल्याने वित्त विभागातील नियमांच्या अधीन राहून ही मान्यता देण्यात आली. विभागाने 29 ऑक्टोबर 2020 नुसार प्राथमिक आश्रम शाळांनी नैसर्गिक वाढीने वर्गवाढ मिळण्याबाबत केलेल्या मागणीनुसार पायाभूत सोयी सुविधांची पूर्तता करणाऱ्या 96 प्राथमिक आश्रम शाळांना इयत्ता 8 वी वर्ग, 61 आश्रम शाळांना इयत्ता नववी वर्ग व त्यापुढील वर्षात त्यातील 31 आश्रम शाळा इयत्ता दहावीचे वर्ग वित्त विभागाच्या मान्यतेच्या आधीन राहून स्वखर्चाने चालवण्याच्या अटीवर नैसर्गिक वाढीने मंजूर केले आहे.

आश्रम शाळातील निवासी विद्यार्थ्यांचे परिपोषण तसेच वेतनेतर अनुदानासाठी सन 2024 - 25 मध्ये 250 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. त्यापैकी 160 कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला असून 90 कोटींच्या निधीचेही वितरण आश्रमशाळांना होणार आहेअसेही इमाव व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

नोंदीत बांधकाम कामगारांसाठी निवृत्ती वेतन • कामगार मंत्री आकाश पुंडकर यांचे विधानसभेत निवेदन

 नोंदीत बांधकाम कामगारांसाठी निवृत्ती वेतन

•       कामगार मंत्री आकाश पुंडकर यांचे विधानसभेत निवेदन

 

मुंबईदि. 25 : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी केलेल्या कामगारांना निवृत्ती वेतन देण्याबाबतचे निवेदन कामगार मंत्री आकाश पुंडकर यांनी विधानसभेत केले.

इमारत व इतर बांधकाम व्यवसायातील कामगारांच्या हिताच्या रक्षणार्थ केंद्र शासनाने 1996 मध्ये कायदा  केला आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने सन 2007 मध्ये नियम बनविले. या नियमांतर्गत 2011 मध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळमुंबई स्थापना करण्यात आले.

वय 18 ते 60 वर्षे वयोगटातील बांधकाम कामगारांना मंडळाकडे नोंदीत करुन घेतले जाते व त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी होऊ शकत नाही व त्यांना कोणताही मिळत नाही.

ही बाब विचारात घेऊन मंडळाकडे नोंदीत असलेल्या व वयाची 60 वर्ष पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी 12000 रुपये इतके निवृत्तीवेतन देण्यात येईल. यामध्ये 10 वर्षे नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना 50 टक्केच्या मर्यादेत प्रतिवर्षी 6000 रुपये,  15 वर्षे नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर 75 टक्केच्या मर्यादेत प्रतिवर्षी 9000 रुपये आणि 20 वर्षे नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रतिवर्षी 12000 रुपये इतके निवृत्तीवेतन देण्यात येईल.

 कायद्यामधील तरतूदी व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन याबाबतची सविस्तर कार्यपध्दती निश्चित करण्यात येईल.

सध्या मंडळाकडे नोंदीत असलेल्या 58 लाख बांधकाम कामगारांच्या कुटुंबियांचे भवितव्य या योजनेमुळे सुरक्षित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

००००

विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड सर्वसामान्य कार्यकर्त्याची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड हे संविधानाचे सामर्थ्य

 

विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड

सर्वसामान्य कार्यकर्त्याची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड हे संविधानाचे सामर्थ्य

-         उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

मुंबईदि. २६: एक सामान्य कार्यकर्ता विधानसभेच्या उपाध्यक्ष या महत्त्वाच्या पदावर विराजमान होतो हे आपल्या संविधानाचे सामर्थ्य आहेअसे स्पष्ट करत विधानसभेच्या उपाध्यक्षपदी सदस्य अण्णा बनसोडे यांची  निवड झाल्याबद्दल त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अण्णा बनसोडे यांच्या सामाजिक व राजकीय  कारकिर्दीचा उल्लेख करत सांगितले कीएक साधा कार्यकर्ता ते विधानसभेचा उपाध्यक्ष हा प्रवास प्रेरणादायी आहे. ते जनतेच्या विश्वासावर पुढे आले असूनत्यांच्या अनुभवाचा सभागृहाला निश्चितच लाभ होईल.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणालेहे शासन सर्वसामान्यांना न्याय देणारे आहे. सर्वसामान्यांना न्याय देणाऱ्या या सभागृहात सामान्य कार्यकर्त्याची उपाध्यक्षपदी निवड झाली याचा मला मनस्वी आनंद झाला आहे. उपाध्यक्ष पदावरून अण्णा बनसोडे सभागृहातील सदस्याच्या प्रश्नातून राज्यातील जनतेला न्याय देतीलअसा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री शिंदे अभिनंदनपर भाषणात म्हणालेविधानसभेच्या उपाध्यक्ष पदी सदस्य अण्णा बनसोडे यांच्या निवड प्रक्रियेत सर्वपक्षीय सहकार्याचे वातावरण दिसून आले. विरोधी पक्षातील नेत्यांनीही सकारात्मक भूमिका घेत श्री.बनसोडे यांच्या निवडीला पाठिंबा दर्शवलायाबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधी पक्षातील नेत्यांचेही आभार मानले आणि उपाध्यक्षपदी विराजमान झालेल्या अण्णा बनसोडे यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र विधानमंडळाला संविधानिक गौरवशाली परंपरा संविधानाने सामान्य माणसाला दिली संधीची समानता

 महाराष्ट्र विधानमंडळाला संविधानिक गौरवशाली परंपरा

संविधानाने सामान्य माणसाला दिली संधीची समानता

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. २६ : मातीशी नाळ जोडलेल्या सामान्य कार्यकर्त्याची महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड होणे हे भारतीय संविधानाने दिलेल्या संधीच्या समानतेचे उत्तम उदाहरण आहे. राज्याच्या विधानमंडळाला मोठी गौरवशाली परंपरा आहे. या परंपरेला पुढे नेण्याची जबाबदारी सर्वांची आहे. अण्णा बनसोडे उपाध्यक्ष झालेही घटना केवळ त्यांचा गौरव नसून राज्यातील १३ कोटी जनतेचा अभिमान आहे. संविधानाने दिलेल्या समानतेच्या हक्कामुळेच आज सामान्य माणूसही उच्च पदावर पोहोचू शकतो असे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनपर प्रस्ताव मांडलात्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा बनसोडे यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करताना त्यांचा राजकीय प्रवास आणि अनुभव यांची प्रशंसा केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेमहाराष्ट्र विधानमंडळ देशातील सर्वाधिक काळ चालणाऱ्या सभागृहांपैकी एक आहे. या सभागृहाच्या परंपरेला पुढे नेण्यासाठी अध्यक्षउपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांनी समन्वयाने काम करून या सभागृहाचा अधिक लौकिक वाढवूया. उपाध्यक्ष पद हे महाराष्ट्र विधानसभेतील सन्मानाचे पद आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी या पदाचा गौरव वाढविला आहे.अण्णा बनसोडे यांची या पदासाठी निवड त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान आहे. पिंपरीचे आमदार म्हणून ते तिसऱ्यांदा निवडून आले असूनत्याआधी महानगरपालिकेत नगरसेवक पदाची हॅटट्रिक त्यांनी केली आहे. तसेचस्थायी समितीच्या अध्यक्षपदीही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

अण्णा बनसोडे यांचा राजकीय प्रवास नगरसेवकस्थायी समिती अध्यक्षआमदार आणि आता उपाध्यक्ष असा चढता राहिला आहे. त्यांच्या निवडीने विधानसभेला सक्षम उपाध्यक्ष मिळाला असून त्यांनी या जबाबदारीतून संविधानिक परंपरेचा सन्मान वाढवावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

अध्यक्ष पदावर विधीतज्ज्ञ अँड राहुल  नार्वेकर  आणि त्यांच्यासोबत सामाजिक व राजकीय प्रश्नांची जाण असलेला सदस्य हे उपाध्यक्ष म्हणून काम करणार आहेत. आपल्या या  अनुभवातून  विधानमंडळाचा बहुमान उंचावेल. अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोघांच्या समन्वयातून या सभागृहाला निश्चितपणे न्याय मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

नद्यांच्या पूरपातळीसाठी आखलेल्या रेषांवरील वाद सोडवण्यासाठी समिती स्थापन करणार

 नद्यांच्या पूरपातळीसाठी आखलेल्या रेषांवरील वाद सोडवण्यासाठी

 समिती स्थापन करणार

-         मंत्री उदय सामंत

 

मुंबईदि. 25 :  राज्यात नद्यांच्या पूरपातळीसाठी आखलेल्या निळ्या आणि लाल रेषांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. निळ्या आणि लाल रेषामधील अपूर्ण राहिलेले सर्वेक्षण जलसंपदा विभागामार्फत करण्यात येईल. निळ्या आणि लाल रेषांमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांवर तातडीने  उपाययोजना करण्यासाठी  समिती स्थापन केली जाईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

याबाबत सदस्य शंकर जगताप यांनी लक्षवेधी सूचना मांडली.

मंत्री सामंत म्हणालेराज्यात नद्यांच्या पूरपातळीसाठी आखलेल्या निळ्या आणि लाल रेषांमुळे निर्माण झालेल्या वादांवर तोडगा काढण्यासाठी जलसंपदा विभागामार्फत नव्याने सर्वेक्षण व अभ्यास करण्यात येईल. नव्या सर्वेक्षणाच्या आधारे पूररेषांची मर्यादा निश्चित केली जाईल. तसेच या हद्दीत जमिनीवर जर अवैध विकास परवानगी दिली असल्यासती तत्काळ रद्द केली जाईल आणि संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.

Featured post

Lakshvedhi