Wednesday, 26 March 2025

बांधकाम कामगारांसाठी निवृत्तीवेतन योजना

 बांधकाम कामगारांसाठी निवृत्तीवेतन योजना

– कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

 

मुंबईदि. 25 : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या आणि वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी ₹12,000 इतके निवृत्तीवेतन देण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली.

कामगार मंत्री ॲड.फुंडकर म्हणाले कीसन 1996 मध्ये केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या हितासाठी कायदा लागू केला. त्यानुसारमहाराष्ट्र राज्याने 2007 मध्ये नियम आखले आणि 2011 मध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली. मंडळाकडे 18 ते 60 वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार नोंदणी करू शकतात व विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. मात्र, 60 वर्षांनंतर त्यांची नोंदणी होऊ शकत नाही व कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही.

ही बाब लक्षात घेऊन सरकारने निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून या योजनेच्या अनुषंगानेनोंदणी कालावधीवर आधारित लाभ निश्चित करण्यात आला असल्याचे मंत्री ॲड.फुंडकर यांनी सांगितले. यात 10 वर्षे नोंदणी पूर्ण झालेल्या कामगारांना वार्षिक ₹6,000 (50%); 15 वर्षे नोंदणी पूर्ण झालेल्या कामगारांना वार्षिक ₹9,000 (75%) आणि 20 वर्षे किंवा अधिक नोंदणी पूर्ण झालेल्या कामगारांना वार्षिक ₹12,000 (100%) असे लाभ देण्यात येईल.

या निर्णयामुळे सध्या मंडळाकडे नोंदणीकृत 58 लाख बांधकाम कामगार आणि त्यांचे कुटुंबीय तसेच भविष्यात नोंदणी होणारे बांधकाम कामगार लाभार्थी ठरणार आहेत.

कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांनी सांगितले की, "या योजनामुळे लाखो बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांचे भविष्य सुरक्षित होणार आहे. कायद्याच्या तरतुदी व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन लवकरच या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर कार्यपद्धती निश्चित करण्यात येणार असल्याचे त्यांनी निवेदनाद्वारे सांगितले.

डेटा सेंटरला पुरविणार हरित ऊर्जा

 डेटा सेंटरला पुरविणार हरित ऊर्जा

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात डेटा सेंटरमध्ये गुंतवणूक होत आहे. देशातील ६५ टक्के डेटा सेंटर येथे आहेत. त्यामुळे राज्याला आता डेटा सेंटरचे कॅपिटल म्हणूनही ओळखले जात आहे. या डेटा सेंटरला पुढील २०२३ पर्यंत हरित ऊर्जा पुरविण्यात येणार आहे. पालघरजवळ देशातील सर्वात मोठे वाढवण बंदर उभारण्यात येत आहे. जेएनपीटीपेक्षाही तीन पट मोठे हे बंदर असून या बंदराला बुलेट ट्रेनमल्टिमॉडेल कॉरिडॉरने जोडले जाणार आहे. तसेच महामुंबईतील तिसऱे विमानतळही उभारण्यात येत आहे. पायाभूत सुविधा व गुंतवणुकीमुळे हा परिसर चौथी मुंबई म्हणून विकसित होत आहेअसे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

पूर्वी माओवाद्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेला गडचिरोली जिल्हा आता देशाचे स्टिल हब म्हणून ओळखला जाणार आहे. या परिसरात स्टिल उद्योगामध्ये सुमारे दोन लाख कोटींची गुंतवणूक होत आहे. पुणे हे उत्पादन उद्योगांचे शहर आहेच. त्याचबरोबर आता छत्रपती संभाजीनगरमधील दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमुळे हा परिसर ईलेक्ट्रिक वाहनांची राजधानी बनला आहे. त्यासाठीची संपूर्ण व्यवस्था या परिसरात तयार केली आहेअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

वेव्ज परिषदेत सहभागी होण्याचे अमेरिकन गुंतवणुकदारांना आमंत्रण

जागतिक मनोरंजन परिषदेचे (ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट-वेव्ज २०२५)  आयोजन करण्याचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. ही परिषद यंदा मुंबईत होणार असून या परिषदेसाठी अमेरिकेतील उद्योजकगुंतवणूकदारांनी सहभागी व्हावेअसे निमंत्रण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले. जगाला भारताच्या मनोरंजन विश्वातील कलासृजनशीलता आणि प्रतिभा दाखविण्याची ही सुवर्णसंधी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

तत्पूर्वी यूएसआयबीसीचे अध्यक्ष राजदूत अतुल केशपयूएस कन्सुल जनरल माइक हंकीयूएस चेंबरच्या अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुझेन क्लार्क यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे स्वागत केले. 

0000

डेटा सेंटर, स्टार्टअप व इनोव्हेशन क्षेत्रात महाराष्ट्र देशात अव्वल

 डेटा सेंटरस्टार्टअप व इनोव्हेशन क्षेत्रात महाराष्ट्र देशात अव्वल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•          यू.एस.इंडिया बिझनेस कौन्सिलच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी मांडले विकसित महाराष्ट्राचे चित्र

 

मुंबईदि. २५ : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून डेटा सेंटरस्टार्टअपइनोव्हेशन व गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करत आहे. तंत्रज्ञानमाहिती तंत्रज्ञानफिनटेक या क्षेत्रातील गुंतवणूकदारांचे महाराष्ट्र हे आवडते गुंतवणुकीचे ठिकाण झाले आहे. नवी मुंबई परिसरात इनोव्हेशन सिटी उभारण्यात येत असून वसईविरारपालघर परिसरात चौथी मुंबई निर्माण होत आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

मुंबईतील हॉटेल ताजपॅलेस येथे आयोजित यु.एस. इंडिया बिझनेस कौन्सिल (यूएसआयबीसी) च्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी यूएसआयबीसीचे अध्यक्ष राजदूत अतुल केशपयूएस कन्सुल जनरल माइक हंकीयूएस चेंबरच्या अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुझेन क्लार्क आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीअमेरिका व भारतातील उद्योग वाढीमध्ये यु.एस. इंडिया बिझनेस कौन्सिल (यूएसआयबीसी)चे मोठे योगदान आहे. दोन्ही देशातील उद्योगांमधील सहकार्यासाठी अर्थपूर्ण व औपचारिक भूमिका कौन्सिल पार पाडत आहे. भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचे गुंतवणुकीचे स्थान आहे. भारतातील अनेक उद्योजक अमेरिकेत गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेततसेच अमेरिकेतीलही अनेक गुतंवणूकदार भारतात येण्यास उत्सुक आहेत.

देशातील सर्वाधिक गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र हा अव्वल स्थानावर असून देशाच्या सकल उत्पन्नात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. थेट परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राने स्वतःचाच विक्रम मोडला असून परदेशी गुंतवणूकदारांचे हे आवडते ठिकाण झाले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र हे स्टार्टअपची राजधानी म्हणून ओळखले जात आहे. स्टार्टअपमधील गुंतवणूक व स्टार्टअप कंपन्यांमध्येही महाराष्ट्र अव्वल असल्याचे एका अहवालात नमूद केले असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीआर्थिकव्यापारनाविन्यता यामधील गुंतवणुकीमुळे महाराष्ट्र हे उद्योग जगताचे आवडते ठिकाण झाले आहे. अटल सेतू व नवी मुंबई विमानतळामुळे त्या परिसराचा कायापालट होत असून नवी मुंबईत विशिष्ट संकल्पनेवर आधारित नाविन्यता शहरे उभारण्यात येत आहेत. नाविन्यताशिक्षणाशी संबंधित इकोसिस्टीम तयार करण्यात येत आहे. या परिसरात परदेशातील जागतिक क्रमवारीतील पहिल्या पन्नासमधील  विद्यापीठे येणार असून त्यातील तीन विद्यापीठे ही अमेरिकेतील आहेत. त्यामुळे नवी मुंबई हे एक एज्युसिटी म्हणून ओळखले जाईलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

कीर्तनाची परंपरा हा अमूल्य ठेवा

 कीर्तनाची परंपरा हा अमूल्य ठेवा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोनी मराठी वरील 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकारकार्यक्रमाला शुभेच्छा

 

मुंबई दि. २५ : कीर्तनाची परंपरा फार जुनी आहे. या परंपरेशी सर्व प्रकारचे लोक जोडले गेले. ही परंपरा छत्रपती शिवाजी महाराज यांनी जपली. देवदेश आणि धर्माकरिता त्यांना आव्हान करून स्वराज्याची स्थापना केली. या स्वराज्याच्या स्थापनेमध्ये या संत शक्तीचाकीर्तन शक्तीचाप्रबोधनाचा प्रचंड मोठा वाटा आहे. म्हणूनच ही परंपरा अमूल्य ठेवा आहेकी जो पुढच्या पिढ्यांपर्यंत नेण्याचे काम करणे गरजेच आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

रवींद्र नाट्यमंदिर येथे सोनी मराठी आणि पु.ना.गाडगीळ ॲन्ड सन्सचितळे बंधू यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकारकार्यक्रमला शुभेच्छा देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी संत तुकाराम महाराज यांचे वंशज प्रा.सदानंद मोरे, 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या कार्यक्रमाचे परीक्षक ह.भ. प. राधाताई सानपह.भ.प. जगन्नाथ पाटील महाराजसोनी एंटरटेनमेंटचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव बॅनर्जी पु.ना.गाडगीळ ॲन्ड सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मोडक  आदी मान्यवर उपस्थित.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या संकल्पनेवर कार्यक्रम तयार केला याबद्दल सोनी मराठीचं मनापासून अभिनंदन. माध्यमं बदलत आहेत. आणि ज्याला आपण कम्युनिकेशन म्हणतोत्याच्यामध्ये सोनीसारखे प्लॅटफॉर्मची खूप महत्त्वाची भूमिका आहे.

कीर्तन ही अतिशय जुनी परंपरा आहे आणि कीर्तनकारांनी कीर्तनातूननिरूपणातूनअभंगातूनगायनातूनजे विचार समाजामध्ये पोहोचवलेजे समाज प्रबोधन केलंते खऱ्या अर्थानं अतिशय अवर्णनीय अशा प्रकारचं आहे. कीर्तनातून लोकप्रबोधन केलं जाते. सामान्य माणसाला भक्ती परंपरेशी जोडूनकोणत्याही परिस्थितीमध्ये तो निराश होणार नाहीत्याच्यामध्ये जगण्याची आणि लढण्याची वृत्ती राहील अशा प्रकारचा प्रयत्न कीर्तनामधून केला जातो. या परंपरेचं सगळ्यात मोठं महात्म्य म्हणजे कीर्तनकारांकडे जगाचं ज्ञान आहेवैश्विक विचार आहेपण तो वैश्विक विचार सांगत असताना तो साध्या भाषेमध्ये  सांगितला जातो की सामान्यातल्या सामान्य माणसाला तो वैश्विक विचार समजतोअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी संत नामदेव महाराजांचे १६वे वंशज ह.भ.प. माधव महाराज नामदास, सावता महाराजांचे १७वे वंशज ह.भ.प. रवीकांत महाराज वसईकर, शेख महंमद महाराजांचे दहावे वंशज ह.भ.प. जब्बार महाराज शेख, संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर, संताजी महाराज जगनाडे यांचे १४वे वंशज ह.भ.प. जनार्दन महाराज जगनाडे, संत बहिणाबाईंचे १३वे वंशज ह.भ.प. प्रमोद पाठक, संत नरहरी महाराज यांचे २१वे वंशज शंकर महामुनी, संत एकनाथ महाराजांचे १४वे वंशज ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' या कार्यक्रमात विजयी ठरणाऱ्या कीर्तनकारास देण्यात येणाऱ्या चांदीची सुंदर, सुबक वीणाचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रा. सदानंद मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.

संविधानामुळे जागतिक स्तरावर आपली लोकशाही सशक्त आणि स्थिर

 संविधानामुळे जागतिक स्तरावर आपली लोकशाही सशक्त आणि स्थिर

विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे

 

मुंबईदि. २५ : सन १९५० पासून सुरू झालेल्या भारतीय संसदीय परंपरेने आज ७५ वर्षांची महत्त्वपूर्ण वाटचाल पूर्ण केली आहे. भारतीय संविधानाच्या भक्कम अधिष्ठानामुळे देशाने जागतिक स्तरावर आपली लोकशाही सशक्त आणि स्थिर ठेवली आहेअसे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी सभागृहात केले.

भारतीय गणराज्याच्या ७५व्या वर्षानिमित्त "भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल" या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली. या चर्चेत सभापती प्रा. शिंदे यांनी संविधानाची महती आणि त्याचे महत्व अधोरेखित केले. त्यांनी संविधानाद्वारे भारताने साधलेल्या ऐतिहासिक प्रगतीचा आढावा घेत राज्यघटनेच्या मूल्यांवर भर दिला.

भारतरत्न डॉ.आंबेडकर यांच्या दूरदर्शी विचारांमुळे आज भारत जगातील एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळखले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारतीय राज्यघटनेने दिलेली स्वातंत्र्यसमताबंधुता आणि न्याय या मुल्यांची महती अधोरेखित करत प्रा. शिंदे म्हणाले, ही मूल्ये आपल्या देशाच्या लोकशाहीचा दीपस्तंभ आहेत. या तत्वांवर आधारित आपली राज्यघटना येणाऱ्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२६ ते १९३७ या काळात मुंबई विधान परिषदेचे सदस्य म्हणून आपले मार्गदर्शक विचार दिलेज्यांनी आजच्या भारतीय संविधानाचा पाया घातला. ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.

भारतीय लोकशाहीचा गौरवशाली इतिहास अधोरेखित करताना स्वातंत्र्यसमताबंधुतान्याय तसेच सार्वभौमत्वलोकशाहीगणराज्यसमाजवाद आणि धर्मनिरपेक्षता ही राज्यघटनेने दिलेली मूल्ये आणि उद्दिष्ट्य आपल्या दृष्टीने चिरंतन प्रेरणाचे स्त्रोत बनलेले आहेत. भारताने संविधानाच्या आधारे ७५ वर्षे लोकशाही टिकवून ठेवत प्रगत राष्ट्र म्हणून स्वतःला सिद्ध केले आहेअसेही प्रा. शिंदे यांनी नमूद केले.

संविधानाची अमृतमहोत्सवी वाटचाल संपूर्ण देशभरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी केली जात आहे. आपले संविधान प्रत्येक पिढीला प्रेरणा आणि दिशा देईलयासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहायला हवे," असे आवाहन सभापती प्रा.शिंदे यांनी केले.

विधानपरिषदेत झालेल्या या पहिल्या दिवशीच्या चर्चेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेसदस्य ॲड.अनिल परबप्रसाद लाडभाई जगतापअमित गोरखेशशिकांत शिंदेप्रवीण दरेकरसत्यजीत तांबेजगन्नाथ अभ्यंकरसदाभाऊ खोतअरुण लाडसंजय केनेकरसुनील शिंदेयोगेश टिळेकरसचिन अहिर, ज्ञानेश्वर म्हात्रे या सदस्यांनी सहभाग घेतला.

000

पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला १० कोटींचा निधी मंजूर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवप्रेमींच्या मागणीला तात्काळ मंजुरी

 पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला १० कोटींचा निधी मंजूर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवप्रेमींच्या मागणीला तात्काळ मंजुरी

कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश

 

मुंबई दि. २५ :- कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाच्या उभारणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नगरविकास विभागाच्या माध्यमातून १० कोटींचा निधी मंजूर केला आहे. विधानभवनात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील आमदारांची आणि लाखो शिवप्रेमींची ही मागणी मान्य करत शिवस्मारकाच्या कामासाठी तात्काळ या निधीला मंजुरी दिली. याबाबतीतला शासन निर्णयही जारी करण्यात आला.

या निर्णयामुळे पन्हाळा किल्ल्यावर छत्रपतींचे स्मारक असावे अशी इच्छा बाळगणाऱ्या लाखो शिवप्रेमींची इच्छा  पूर्ण होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात पन्हाळा किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वतः महाराजांनी या किल्ल्यावर 133 दिवस वास्तव्य केले होते. तसेच  सिद्धी जोहरने टाकलेला पन्हाळ्याचा वेढा असेलबाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेने दिलेले बलिदान असेल किंवा त्यानंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचे वास्तव्य असेल असे ऐतिहासिक महत्त्व या किल्ल्याला आहे. मात्र तरीही या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा एकही पुतळा नसल्याने याठिकाणी शिवस्मारक व्हावे अशी मागणी करण्यात येत होती. पन्हाळा किल्ल्यावर शिवछत्रपतींचे स्मारक असावे ही मागणी पहिल्यांदा करण्यात आल्यानंतर तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी या कामासाठी 5 कोटींचा निधी मंजूर केला होता. पन्हाळा किल्ल्यावरील तळ्याच्या मध्यभागी चौथरा बांधून हे स्मारक उभारण्याचे नियोजन होते. मात्र काही कारणांमुळे शिवस्मारकाचे हे काम पूर्ण होऊ शकले नाही.

कोल्हापूरचे आमदार चंद्रदीप नरकेराजेश क्षीरसागरप्रकाश आबिटकर यांनी आता पुन्हा या मागणीचा पाठपुरावा केला. 

यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरआमदार राजेश क्षीरसागरआमदार चंद्रदीप नरकेनगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीमकुमार गुप्ताउपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना आणि इतर अधिकारी उपस्थित होते

दुधात भेसळ करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाईसाठी कायद्यात सुधारणा करणार

 दुधात भेसळ करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाईसाठी कायद्यात सुधारणा करणार

- उपमुख्यमंत्री अजित पवार

•          दुधातील भेसळ तपासण्यासाठी प्रत्येक विभागात प्रयोगशाळा सुरू करण्याचे निर्देश

•          अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रसामुग्रीसाठी वाढीव निधी देण्याची तयारी

 

             मुंबई दि. २५ : दूध आणि तत्सम अन्नपदार्थात होणारी भेसळ ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. हे खपवून घेतले जाणार नाही. दूध आणि तत्सम अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कडक कारवाई करण्यासाठी सध्याच्या कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील. त्यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावाअसे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

           ॲनालॉग चीज हा पदार्थ राज्यात अनेक ठिकाणी ॲनालॉग पनीर या नावाने विक्री होत असल्याबाबत तसेच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे उघडकीस आलेल्या दूध भेसळीसंदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर झालेल्या चर्चेच्या वेळी दिलेल्या आश्वासनानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

           या बैठकीस अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळराज्यमंत्री योगेश कदमआमदार सुधीर मुनगंटीवारआमदार विक्रम पाचपुतेआमदार अभिजीत पाटीलआमदार कैलास पाटील यांच्यासह अन्न व औषध प्रशासनवैद्यकीय शिक्षणगृह  तसेच वित्त व नियोजन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.तर सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक (ग्रामीण) हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

           दुधातील भेसळ तपासण्यासाठी तातडीने प्रत्येक विभागात एक प्रयोगशाळा सुरू करावीपनीर मध्ये ॲनालॉग चीज असल्यास त्यासंबंधीची माहिती  दुकानात दर्शनी भागात लावण्यासंदर्भात सूचना द्याव्यात. दूध भेसळीसंदर्भात जनजागृती करण्यात यावीभेसळीसंदर्भात जनतेला तक्रारी नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक योग्य प्रकारे कार्यान्वित करावा,पोर्टल विकसित करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

        दुधातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाला अत्याधुनिक तंत्रज्ञान व यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये आणखी निधी देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. अन्न व औषध प्रशासन विभागातील अपुऱ्या मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी डेअरी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांची सेवा घेण्यात यावीत्यांना प्रशिक्षण देण्यात यावे असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

              सोलापूर दूधभेसळ प्रकरणातील आरोपी कोणीहीकितीही मोठे असतील तरी त्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) यांना दिल्या.

Featured post

Lakshvedhi