Wednesday, 26 March 2025

कीर्तनाची परंपरा हा अमूल्य ठेवा

 कीर्तनाची परंपरा हा अमूल्य ठेवा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोनी मराठी वरील 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकारकार्यक्रमाला शुभेच्छा

 

मुंबई दि. २५ : कीर्तनाची परंपरा फार जुनी आहे. या परंपरेशी सर्व प्रकारचे लोक जोडले गेले. ही परंपरा छत्रपती शिवाजी महाराज यांनी जपली. देवदेश आणि धर्माकरिता त्यांना आव्हान करून स्वराज्याची स्थापना केली. या स्वराज्याच्या स्थापनेमध्ये या संत शक्तीचाकीर्तन शक्तीचाप्रबोधनाचा प्रचंड मोठा वाटा आहे. म्हणूनच ही परंपरा अमूल्य ठेवा आहेकी जो पुढच्या पिढ्यांपर्यंत नेण्याचे काम करणे गरजेच आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

रवींद्र नाट्यमंदिर येथे सोनी मराठी आणि पु.ना.गाडगीळ ॲन्ड सन्सचितळे बंधू यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकारकार्यक्रमला शुभेच्छा देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी संत तुकाराम महाराज यांचे वंशज प्रा.सदानंद मोरे, 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या कार्यक्रमाचे परीक्षक ह.भ. प. राधाताई सानपह.भ.प. जगन्नाथ पाटील महाराजसोनी एंटरटेनमेंटचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव बॅनर्जी पु.ना.गाडगीळ ॲन्ड सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित मोडक  आदी मान्यवर उपस्थित.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या संकल्पनेवर कार्यक्रम तयार केला याबद्दल सोनी मराठीचं मनापासून अभिनंदन. माध्यमं बदलत आहेत. आणि ज्याला आपण कम्युनिकेशन म्हणतोत्याच्यामध्ये सोनीसारखे प्लॅटफॉर्मची खूप महत्त्वाची भूमिका आहे.

कीर्तन ही अतिशय जुनी परंपरा आहे आणि कीर्तनकारांनी कीर्तनातूननिरूपणातूनअभंगातूनगायनातूनजे विचार समाजामध्ये पोहोचवलेजे समाज प्रबोधन केलंते खऱ्या अर्थानं अतिशय अवर्णनीय अशा प्रकारचं आहे. कीर्तनातून लोकप्रबोधन केलं जाते. सामान्य माणसाला भक्ती परंपरेशी जोडूनकोणत्याही परिस्थितीमध्ये तो निराश होणार नाहीत्याच्यामध्ये जगण्याची आणि लढण्याची वृत्ती राहील अशा प्रकारचा प्रयत्न कीर्तनामधून केला जातो. या परंपरेचं सगळ्यात मोठं महात्म्य म्हणजे कीर्तनकारांकडे जगाचं ज्ञान आहेवैश्विक विचार आहेपण तो वैश्विक विचार सांगत असताना तो साध्या भाषेमध्ये  सांगितला जातो की सामान्यातल्या सामान्य माणसाला तो वैश्विक विचार समजतोअसेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी संत नामदेव महाराजांचे १६वे वंशज ह.भ.प. माधव महाराज नामदास, सावता महाराजांचे १७वे वंशज ह.भ.प. रवीकांत महाराज वसईकर, शेख महंमद महाराजांचे दहावे वंशज ह.भ.प. जब्बार महाराज शेख, संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर, संताजी महाराज जगनाडे यांचे १४वे वंशज ह.भ.प. जनार्दन महाराज जगनाडे, संत बहिणाबाईंचे १३वे वंशज ह.भ.प. प्रमोद पाठक, संत नरहरी महाराज यांचे २१वे वंशज शंकर महामुनी, संत एकनाथ महाराजांचे १४वे वंशज ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' या कार्यक्रमात विजयी ठरणाऱ्या कीर्तनकारास देण्यात येणाऱ्या चांदीची सुंदर, सुबक वीणाचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रा. सदानंद मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi