Saturday, 22 March 2025

राज्यातील पायाभूत सुविधा बळकटीकरणावर भर

 राज्यातील पायाभूत सुविधा बळकटीकरणावर भर : शिवेंद्रराजे भोसले

        सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत विविध रस्त्यांची कामे सुरू आहेत. सुधारित हॅम पहिल्या टप्प्यातील कामे प्रगतीपथावर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये एमएसआयडीसी मार्फत ३४ जिल्ह्यात जवळजवळ ५९७० किमी लांबीचे रस्ते  सुरू करण्याचे प्रस्तावित होते, ती सर्व कामे  झाली आहेत उदिष्टापेक्षा जास्त कामे सुरू केली असून केली असून ती लवकर पूर्ण करण्यात येतील असेही ते म्हणाले.

              महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित म्हणाले की, शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पुणे ते शिरूर उड्डाणपूल, तळेगाव- चाकण-शिक्रापूर हायवे, हडपसर यवत हायवे या कामांना आवश्यक असलेली मंत्रीमडळाची मान्यता घेवून नॅशनल हायवेची कामे गतीने पूर्ण करण्यात येतील.


राज्य शासनाचे पायाभूत सुविधा क्षेत्रातील सर्वोत्तम काम बँकांसाठी आश्वासक

 राज्य शासनाचे पायाभूत सुविधा क्षेत्रातील सर्वोत्तम काम बँकांसाठी आश्वासक

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

पायाभूत सुविधा विकासासाठी बँकांकडून नेहमीच सर्वोत्तम सहकार्य

मुंबई,दि.२१ : महाराष्ट्र प्रगतीशील राज्य असून राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व बँकाचे सहकार्य नेहमीच मिळत आले आहे.राज्यातील रस्त्यांची गरज लक्षात घेवून रस्ते विकासासाठी नियोजन  करण्यावर भर देण्यात येत आहे.समृध्दी महामार्गासारख्या यशस्वी पायाभूत संविधांच्या कामामुळे आज अनेक बँका राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना कर्ज देण्यासाठी पुढे येत आहेत. राज्य शासनाचे पायाभूत सुविधा प्रकल्पांतील सर्वोत्तम काम हे बँकासाठी आश्वासक बाब ठरत असून बँकाकडून राज्य शासनाला यापुढेही असेच सर्वोत्तम सहकार्य मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

विधानभवन येथे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी) आढावा   बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री  शिवेंद्र राजे भोसलेवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, प्रधान सचिव अश्विनी भिडेसचिव रस्ते सदाशिव साळुंखे, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षितहुडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय कुलक्षेत्रआय. आय. एफ. सी. एल. (इंडियन इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड) चे मुख्य प्रबंधक राजकुमार राल्हन, कॅनरा बँकेचे महाप्रबंधक अलोक कुमार अग्रवालपंजाब नॅशनल बँकेचे जनरल मॅनेजर एस राजगुरूयुको बँकेचे कार्यकारी संचालक नितीन बोडकेबँक ऑफ महाराष्ट्राचे जनरल मॅनेजर अमित कुमार शर्मानाफेडचे उपाध्यक्ष हर्षल महावरकरपंजाब अँड सिंध बँकेचे मुख्य महाप्रबंधक विनोद कुमार पांडेएस. बी. आय. कॅपिटल लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष असित रंजन सिकंदर विविध बँकाचे अधिकारी उपस्थित  होते.

        मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीमहाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत सर्व बँकांच्या सहकार्याने राज्यात २५ कोटी ८७५ कोटींचे अर्थसहाय्य प्राप्त झाले आहे ही अत्यंत चांगली बाब आहे.राज्यातील पायाभूत सुविधांसाठी यावर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाची राज्यात १ लाख कोटी रूपयांची कामे पूर्ण होतील हे सांगताना मला आनंद होत आहे. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करूनच राज्य विविध बँकांकडून नियमित कर्ज घेवून त्याची परतफेड करत असते. राज्यातील रस्ते दर्जेदार होण्यासाठी राज्य शासन कोणाच्याही शिफारशीशिवाय प्रत्यक्ष रस्त्यांची गरज कोणत्या भागात आहे हे लक्षात घेवून रस्ते विकासासाठी नियोजन करून उत्तम दर्जाचे रस्ते देण्यासाठी प्रयत्नशील आहे.सर्व बँकानी राज्यातील पायाभूत सुविधांसाठी राज्यशासन करत असलेले नियोजन व अंमलबजावणी याची माहिती जरूर घ्यावी, असे आवाहनही त्यांनी त्यांवेळी केले.

इंदरदेव धनगरवाडा येथे जंगलातील वणव्यात बाधित घरांची पुर्नबांधणी होणार

 इंदरदेव धनगरवाडा येथे जंगलातील वणव्यात बाधित घरांची पुर्नबांधणी होणार

- महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

            मुंबई,दि.21 : रायगड जिल्ह्यातील इंदरदेव धनगरवाडा येथे नुकतेच आगीच्या वणव्यामुळे ग्रामस्थांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त गावकऱ्यांच्या घरांची पुनर्बांधणी त्याच ठिकाणी करण्यात येणार असल्याचे माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

         रोहा तालुक्यातील मौजे धामणसई हद्दीतील इंदरदेव धनगरवाडा येथील जंगलातील वणव्याची आग पसरुन बाधित झालेल्या ठिकाणी सोई सुविधाकामी निधी उपलब्ध होणेबाबत विधिमंडळात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.

          मंत्री तटकरे म्हणाल्या कीधनगरवाडा येथे 6 मार्च 2025 रोजी जंगलातील वणव्याची आग पसरुन 39 घरे आणि 12 जानावरांचे गोठे बांधित झाले होते. या बाधित घराचे व गोठ्यांचे झालेल्या नुकसान झाले असूनज्या ठिकाणी नुकसान झाले त्याच ठिकाणी त्यांच्या घरांची पुर्नबांधणी करण्यात येणार आहे.    इंदरदेव धनगरवाडीला जाणेसाठी रस्ता नसल्याने लागलेल्या आगीवर नियंत्रण करता आले नाही. इंदरदेव धनगरवाडा येथे जाण्यासाठी अडीच किलोमीटर लांबीचा रस्ता होण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत धामणसई यांनी ठराव करुन प्रस्ताव सादर करावाअसेही  त्यांनी सांगितले.

यावेळी रोहा येथील उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवडरोहा तालुक्याचे तहसीलदार किशोर देशमुखरोहा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शुभदा पाटीलरोहा वन परिक्षेत्रचे वन अधिकारी मनोज वाघमारेसहाय्यक वनरक्षक रोहित चोबेग्रामविकास अधिकारी निता श्रीवर्धनकरतानाजी देशमुखअनंता देशमुख तसेच इंदरदेवचे ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पंधराशे रिक्त पदांसाठी १० एप्रिल रोजी जाहिरात; ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक दर्जेदार करणार

  

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पंधराशे रिक्त पदांसाठी १० एप्रिल रोजी जाहिरात;

ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक दर्जेदार करणार

- सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबईदि. २१ - राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात खात्यात सुधारणा करण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी 450 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. आणखी 1,500 वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदभरतीसाठी येत्या 10 एप्रिलला जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत सांगितले.

 

सदस्य प्रसाद लाड यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना मंत्री श्री.आबिटकर यांनी ही माहिती दिली या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेसदस्य सर्वश्री संजय खोडकेॲड. अनिल परबसुनील शिंदेविक्रम काळेश्रीमती चित्रा वाघ आदींनी सहभाग घेतला.

 

मंत्री श्री.आबिटकर म्हणालेप्रादेशिक आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी ग्रामीण भागात नियुक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी कडक नियम लागू करण्यात येणार आहेत. एमबीबीएस आणि वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एक वर्ष ग्रामीण भागात सेवा देणे बंधनकारक असेलअसा निर्णय अंमलात आणला जाईल.

 

महानगरपालिका आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर भर देताना मंत्री आबिटकर म्हणालेऔषध वितरणात येणाऱ्या अडचणी दूर करून वेळेवर औषधे उपलब्ध होण्यासाठी महत्त्वाचे आदेश दिले जातील. आरोग्य सुविधांची गुणवत्ता राखण्यासाठी औषधांची एनएबीएल नामांकित प्रयोगशाळांमध्ये तपासणी अनिवार्य केली जाणार आहे. राज्यात वैद्यकीय वस्तू खरेदीसाठी स्थापलेल्या प्राधिकरणाबाबतही त्यांनी माहिती दिली. हा निर्णय औषधांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी आणि भ्रष्टाचार टाळण्यासाठी घेतला गेला असल्याचे त्यांनी सांगितले. दर्जेदार औषधे आणि वैद्यकीय उपकरणे कमी किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी पुढील टप्प्यात कार्यवाही होईलअसे त्यांनी सांगितले.

 

दहा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका गोल्डन अवर मध्ये रुग्णांना अतिशय उपयुक्त ठरत आहेत. आता १८०० वाहने प्रस्तावित असून त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. अपघातप्रवण ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर वाढविणे तसेच तेथे रुग्णवाहिका ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. रुग्णालयांमधील उपहारगृहे चांगली करण्याबाबतही  लवकरच धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

00000

छत्रपती संभाजीनगर येथील घाटीतील नवीन शस्त्रक्रिया इमारतीच्या उभारणीसाठी निविदा प्रक्रिया

 छत्रपती संभाजीनगर येथील घाटीतील नवीन शस्त्रक्रिया इमारतीच्या

उभारणीसाठी निविदा प्रक्रिया

-         वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई,दि. २१ : छत्रपती संभाजीनगर येथील घाटी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकरिता नवीन शस्त्रक्रिया इमारत उभारण्यासाठी ७६५ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. येत्या महिनाभरात निविदा प्रक्रिया राबवून इमारत उभारणी करण्याच्या बांधकामास सुरुवात केली जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानपरिषदेत दिली.

 

छत्रपती संभाजीनगर येथील घाटीतील नवीन शस्त्रक्रिया इमारतीच्या उभारणीसंदर्भात सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री मुश्रीफ बोलत होते.

 

मंत्री श्री मुश्रीफ म्हणालेनिविदा प्रक्रियेसाठी एका महिन्याचा कालावधी असेलआणि त्यानंतर तातडीने काम सुरू करण्यात येईल. शासनाने प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे या कामाला लवकरात लवकर सुरुवात होईल. घाटी रुग्णालयाच्या जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.

 

या वैद्यकीय महाविद्यालयात कर्करोग, रोबोटिक सर्जरी अशा अनेक उपचार केले जातात म्हणून दरवर्षी २५ हजारहून अधिक बाह्यरुग्ण उपचारासाठी येत असतात. विशेषतः खानदेशविदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासह विविध भागांतील गरीब आणि गरजू रुग्ण येथे उपचारासाठी दाखल होतात. त्यामुळे या रुग्णालयाचा विस्तार आणि आधुनिकीकरण होणे अत्यावश्यक असल्याने येत्या काळात नियोजनबद्ध पद्धतीने काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

 

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांसह मराठवाड्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. नवीन सुपर स्पेशालिटी विभागामुळे अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार असूनगरजू रुग्णांना चांगल्या उपचार आणि सुविधा मिळतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेसदस्य संजय केनेकरप्रसाद लाड यांनी या चर्चेत सहभाग नोंदवला.


राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेत विद्यावेतन देण्यात येणारमी

 राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेत विद्यावेतन देण्यात येणार

-         वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

 

मुंबई, दि.२१ : राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना वेळेत विद्यावेतन मिळावे यासाठी शासन कटिबद्ध आहे. यासाठी यंदाचे अनुदान वितरित करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानपरिषदेत दिली.

 

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांनी विद्यावेतनाचा तपशील सादर करण्याविषयी सदस्य अभिजीत वंजारी यांनी उपस्थिती केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री मुश्रीफ बोलत होते.

 

मंत्री श्री मुश्रीफ म्हणालेकाही शासकीय आणि खासगी महाविद्यालयांनी आवश्यक माहिती वेळेत दिली नव्हती. त्यामुळे शासनाने यासंदर्भात नोटीस काढून संबंधित महाविद्यालयांना सूचना दिल्या होत्या.त्या अनुषंगाने सर्व वैद्यकीय महाविद्यालयांनी आवश्यक माहिती दिली असूनपुढील काळात विद्यावेतन वेळेवर मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील राहील.

 

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी राज्य शासन सातत्याने लक्ष देत आहेअसेही त्यांनी  सांगितले.

 

यावेळी सदस्य विक्रम काळेराजेश राठोड यांनी याविषयीच्या चर्चेत सहभागी नोंदवला.

००००

शांतता भंग करणाऱ्या* *दंगलखोरांविरुद्ध कडक कारवाई करा*,संचारबंदी टप्प्याटप्याने हटवणार आक्षेपार्ह पोस्ट संदर्भात सहआरोपी करणार Ø नुकसानीचे पंचनामे

 शांतता भंग करणाऱ्या* *दंगलखोरांविरुद्ध कडक कारवाई करा*

-- *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

 

Ø संचारबंदी टप्प्याटप्याने हटवणार

आक्षेपार्ह पोस्ट संदर्भात सहआरोपी करणार

Ø नुकसानीचे पंचनामेतीन दिवसात मदत

Ø नागपूरची शांतता भंग होणार नाहीदक्षता घेणार

Ø दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार

 

*नागपूरदि. 22* *: नागपूर हे धार्मिकसामाजिक व सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जातेया शहराची वेगळी संस्कृती आहेकायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईलअशा प्रकारच्या घटना बरेच वर्षानंतर पहिल्यांदाच घडली आहेभविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाही यादृष्टीने शांतता भंग करणाऱ्या दंगलखोरांविरुद्ध अत्यंत कठोर कारवाई कराअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलेत

नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारीजिल्हाधिकारीमहानगरपालिका आयुक्त तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत शहरात घडलेल्या घटनेसंदर्भात आढावा घेतलात्यानंतर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

पोलीस आयुक्तालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीस राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेपोलीस आयुक्त डॉ.रविंद्र सिंगलनागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील-भुजबळजिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकरमहानगरपालिका आयुक्त डॉअभिजित चौधरीसहपोलीस आयुक्त निसार कांबळीअतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटीलप्रमोद शेवाळेशिवाजी राठोडपोलीस अधीक्षक हर्ष पोद्दारपोलीस उपायुक्त लोहीत मतानीराहुल मदनेमहेक स्वामीविशेष शाखेचा पोलीस उपायुक्त श्वेता खेडकरअश्विनी पाटील आदी उपस्थित होते.

शांतताप्रिय शहर म्हणून नागपूरची ओळख आहेया शहराला अशांत करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगताना मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीऔरंगजेबासंदर्भात दुपारी आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध पोलीसांनी कारवाई केल्यानंतरही समाजकटंकांकडून सायंकाळी दंगा भडकविण्यात आलादंगलखोरांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस विभागाने तत्काळ कारवाई करुन दंगल आटोक्यात आणलीपरंतु या दंगलीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची जाळपोळ व संपत्तीचे नुकसान झाले आहेपोलिसांवरही दगडफेक केल्यामुळे 34 पोलीस जखमी झाले आहेतअशा प्रकारच्या घटना शहराच्या कुठल्याही भागात घडणार नाही यादृष्टीने पोलीस विभागाने सतर्क राहून कठोर कारवाई करावीअसे निर्देश यावेळी दिले.

शहराच्या अकरा पोलीस स्टेशनच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेया संदर्भात 13 गुन्हे दाखल झाले असून 104 आरोपींना अटक करण्यात आली आहेत्यापैकी 12 विधी संघर्ष बालक आहेतशहरातील सीसीटीव्ही कॅमेरे तसेच जनतेकडून प्राप्त झालेल्या कव्हरेज (व्हिडीओ क्लीपच्या आधारे दंगलखोरांना शोधून त्यांच्याविरुद्ध कडक कारवाईचा सूचना देण्यात आल्या असून एकही दंगलखोर यामधून सुटणार नाहीअशी सूचना करताना मुख्यमंत्री म्हणाले कीदंगल भडकविण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या विविध समाज माध्यमांवरील पोस्टची तपासणी करुन अशा प्रकारच्या 250 पोस्ट शोधण्यात आल्या आहेतया पोस्ट टाकणाऱ्या 62 लोकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहेतर दोन लोकांना अटक करण्यात आली आहेअशा पोस्ट टाकणारे व शेअर करणाऱ्यांविरुद्ध दंगल भडकविल्याबद्दल सहआरोपी करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले

झालेल्या नुकसानीची दंगलखोरांकडून भरपाई

दंगलीमध्ये मालमत्तेचे तसेच वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेतनुकसानीसंदर्भात पंचनामे करुन येत्या तीन ते चार दिवसात नुकसान भरपाई देण्याच्या सूचना करताना मुख्यमंत्री म्हणाले कीसंपूर्ण नुकसानीची भरपाई दंगलखोरांकडून करण्यात येईलनुकसान भरपाई करताना दंगलखोरांच्या मालमत्तेची विक्री करुन संपूर्ण भरपाई वसूल करण्यात येईलयासाठी महानगरपालिकाजिल्हा प्रशासन व पोलीस विभागातर्फे संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश यावेळी दिले

दंगलीमध्ये 71 वाहनांचे तसेच विविध मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेनुकसानी संदर्भात जिल्हा प्रशासनाने पंचनामे सुरु केले आहेवाहनांच्या नुकसानी संदर्भात विमा कंपन्यांना आवश्यक असलेले दस्ताऐवज उपलब्ध करुन देण्यासबंधी तत्काळ कारवाई करावीअशी सूचना यावेळी केली.

शांतता राखण्यासाठी सहकार्य करा मुख्यमंत्र्यांचे आवाहन

शहरात आगामी काळात विविध समुदयांकडून सण व उत्सव आयोजित करण्यात येतातअशा उत्सवाच्या प्रसंगी कुठलाही अनूचित प्रकार घडणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावीतसेच सण व उत्सवाच्या काळात शांतता भंग होणार नाही यादृष्टीने जनतेनेही प्रशासनाला सहकार्य करावेअसे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला केले आहेशांतता भंग करणाऱ्यांविरुद्ध पोलिस विभागाने तात्काळ दखल घेऊन कठोर कारवाई करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

प्रारंभी पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र सिंगल यांनी शहराच्या काही भागात भरलेल्या घटनेसंदर्भातील माहिती सादरीकरणाद्वारे दिलीया घटनेतील दोषी असणाऱ्या सर्वांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईलअशी ग्वाही दिली.

 

******

 

 

 

 

 

 

 

 

 

Featured post

Lakshvedhi