राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेत विद्यावेतन देण्यात येणार
- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई, दि.२१ : राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना वेळेत विद्यावेतन मिळावे यासाठी शासन कटिबद्ध आहे. यासाठी यंदाचे अनुदान वितरित करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानपरिषदेत दिली.
राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांनी विद्यावेतनाचा तपशील सादर करण्याविषयी सदस्य अभिजीत वंजारी यांनी उपस्थिती केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री मुश्रीफ बोलत होते.
मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, काही शासकीय आणि खासगी महाविद्यालयांनी आवश्यक माहिती वेळेत दिली नव्हती. त्यामुळे शासनाने यासंदर्भात नोटीस काढून संबंधित महाविद्यालयांना सूचना दिल्या होत्या.त्या अनुषंगाने सर्व वैद्यकीय महाविद्यालयांनी आवश्यक माहिती दिली असून, पुढील काळात विद्यावेतन वेळेवर मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील राहील.
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी राज्य शासन सातत्याने लक्ष देत आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी सदस्य विक्रम काळे, राजेश राठोड यांनी याविषयीच्या चर्चेत सहभागी नोंदवला.
००००
No comments:
Post a Comment