Wednesday, 22 January 2025

राष्ट्रीय स्कूल बँड स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत महाराष्ट्रातील दोन शाळा नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल

 राष्ट्रीय स्कूल बँड स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत महाराष्ट्रातील दोन शाळा

नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये होणार महाअंतिम फेरी

 

नवी दिल्ली, दि. 21 :  प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा एक भाग म्हणून आयोजित राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धा 2024-25 ची महाअंतिम फेरी 24 आणि 25 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथे होणार आहे.

यामध्ये महाराष्ट्रातील दोन शाळा महाअंतिम फेरीत पोहचल्या आहेत. ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम आणि एकात्मतेची भावना जागृत करण्यासाठी आयोजित केली जाते. या स्पर्धेत 16 शाळा बँड संघ निवडले गेले आहेत. त्यात  बॉयज ब्रास बँडगर्ल्स ब्रास बँडबॉयज पाईप बँडगर्ल्स पाईप बँड असेअसून,  466 मुले  महाअंतिम फेरीत सहभागी होणार आहेत.  

महाअंतिम फेरीसाठी महाराष्ट्रातील राजारामबापू पाटील मिलिटरी स्कूल आणि स्पोर्ट्स अकॅडमीइस्लामपूर (पश्चिम झोन) आणि भोसला मिलिटरी स्कूल गर्ल्सनाशिक (पश्चिम झोन) या दोन शाळांची निवड झाली आहे.

सशस्त्र दलांचे वरिष्ठ अधिकारी परिक्षक असूनहे परिक्षक मंडळ स्पर्धतील बँड चमुच्या कामगिरीचे मूल्यमापन करतील. विजेत्यांना 25 जानेवारी 2025 रोजी सरंक्षण राज्यमंत्री श्री संजय सेठ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील.

प्रत्येक गटातील अव्वल तीन संघांना रोख पारितोषिक (प्रथम - रु. 21,000/-द्वितीय - रु. 16,000/- आणि तृतीय - रु. 11,000/-)चषक तसेच प्रमाणपत्रे दिली जातील. प्रत्येक गटातील उर्वरित संघाला प्रत्येकी 3,000/- चे प्रोत्साहनपर रोख पारितोषिक दिले जाईल.


राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे मणिपूर, मेघालय व त्रिपुरा राज्य स्थापना दिवस साजरा

 राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे

मणिपूरमेघालय व त्रिपुरा राज्य स्थापना दिवस साजरा

 

मुंबई, दि. 21 : राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राजभवन येथे मणिपूरमेघालय आणि त्रिपुरा या तीन राज्यांचा राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला. 

यावेळी एचएसएनसी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मणिपूरमेघालय आणि त्रिपुरा राज्यांच्या संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडवणारा पारंपरिक नृत्य व गीतांचा कार्यक्रम सादर केला.  

मणिपूरमेघालय व त्रिपुरा राज्यांनी आपल्या स्थापनेपासून शिक्षणआरोग्य व पर्यटन या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली. गेल्या दहा वर्षांमध्ये उत्तर पूर्वेतील राज्ये रेल्वेरस्ते तसेच हवाई मार्गाने संपूर्ण देशाशी जोडले गेले आहेत.

'एक भारत श्रेष्ठ भारतकार्यक्रमांतर्गत आयोजित राज्य स्थापना दिवस साजरे केल्यामुळे त्या त्या राज्यांची भाषालोककलाजीवनशैली यांचा सर्वांना परिचय होत असून राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ होत असल्याचे राज्यपालांनी सांगितले. 

यावेळी राज्यपालांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या तिन्ही राज्यांच्या माहिती पटाचे प्रदर्शन करण्यात आले. 

कार्यक्रमाला एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ हेमलता बागलाकुलसचिव डॉ भगवान बालानीविविध विभागांचे अधिष्ठाताप्राचार्यप्राध्यापकएचएसएनसी विद्यापीठातील विद्यार्थी तसेच राजभवन येथील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. राज्यपालांचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी प्रास्ताविक केले तर परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ यांनी आभारप्रदर्शन केले. '

 

Manipur, Meghalaya, Tripura Foundation Day celebrated in Maharashtra Raj Bhavan

 

Mumbai, 21st Jan : The State Foundation Day of Meghalaya, Manipur and Tripura was celebrated in presence of Maharashtra Governor C.P. Radhakrishnan at Maharashtra Raj Bhavan in Mumbai on Tue (21 Jan).

The celebrations were organised as part of the 'Ek Bharat Shreshtha Bharat' initiative of Government of India.

A cultural programme showcasing the customs and traditions of Manipur, Meghalaya, and Tripura was presented on this occasion.

The cultural programme was presented by the students of the HSNC University. Audio-visual films showing the features of the three States were also shown.

Vice Chancellor of HSNC Univesity Prof Hemlata Bagla, Registrar Dr Bhagwan Balani, Principals of HSNC colleges, faculty and students were present. Principal Secretary to the Governor delivered the welcome address while Comptroller of the Governor's Households Jitendra Wagh proposed a vote of thanks.

0000


एप्रिलमध्ये होणाऱ्या महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे नियोजनपूर्वक आयोजन करावे

 एप्रिलमध्ये होणाऱ्या महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे

नियोजनपूर्वक आयोजन करावे

- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

 

 मुंबईदि. २१ : महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन महोत्सवाच्या नियोजनासंदर्भात आढावा बैठक पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या महोत्सवानिमित्त होणाऱ्या अनेक उपक्रमांचा आढावा पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी सादरीकरणाद्वारे घेतला.

मंत्रालयात या बैठकीस विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे  व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशीपर्यटन संचालनालयाचे संचालक भगवंतराव पाटीलपर्यटन संचालनालयाचे सहसंचालक सुशील पवार तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 हा पर्यटन महोत्सव एप्रिलमध्ये महाबळेश्वर येथे तीन दिवसांसाठी आयोजित करण्यात येणार आहे. हा महोत्सव राज्यातील तसेच देशातील पर्यटकांसाठी आकर्षणबिंदू ठरणार असून अनेक सांस्कृतिक तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमांचा यामध्ये समावेश असणार आहे. यामध्ये स्ट्रॉबेरी महोत्सवलाईव्ह मनोरंजनमहाबळेश्वर मिनी मॅरॅथॉनहॉट एअर बलूनहेलिकॉप्टर सुविधा इत्यादी पर्यटन आकर्षण उपक्रम असणार आहेत.

या महोत्सवादरम्यान होणाऱ्या कार्यक्रमांच्या आयोजनाचे दिवसनिहाय वेळापत्रक तयार करावेत्याचप्रमाणे हे कार्यक्रम महाबळेश्वर मधील विविध प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर आयोजित करावे. हा महोत्सव गौरवशाली व्हावा यादृष्टीने प्रयत्न करण्यात यावेत. या पर्यटन महोत्सवाच्या नियोजनासंदर्भात नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. या पर्यटन महोत्सवाचे नियोजन काटेकोरपणे करण्याचे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

***

पर्यटक निवासांच्या ठिकाणी पर्यटन वाढीवर भर द्या

 पर्यटक निवासांच्या ठिकाणी पर्यटन वाढीवर भर द्या

- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

 

            मुंबई, दि. २१ : पर्यटन विभागाच्या सर्व पर्यटक निवासांच्या ठिकाणी पर्यटन वाढीसाठी  कोणकोणत्या बाबी करता येवू शकतील हे विचारात घेवून नियोजन करावे, त्याचबरोबर पर्यटन विभागाच्या मालकीच्या सर्व मालमत्तांची गुणवत्ता तपासणी करणारी पथके नियुक्त करण्याचे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

             मंत्रालयात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची बैठक झाली. या बैठकीत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणेपर्यटन संचालक डॉ बी. एन. पाटीलमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशीमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, अधीक्षक अभियंता शैलेंद्र बोरसे यांसह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

           पर्यटनमंत्री श्री.देसाई म्हणाले कीमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ चालवत असलेले पर्यटक निवासविकसित करत असलेले पर्यटक निवास, दीर्घ व अल्प मुदतीवर चालवण्यासाठी दिलेल्या मालमत्ता यांची योग्य ती निगा राखणे आपली जबाबदारी आहे. सर्व मालमत्तांची तपासणी करून त्या सुव्यवस्थितपणे वापरल्या जातील याची देखील खात्री करणे गरजेचे आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जोतीबा मंदिराच्या ठिकाणी असलेल्या ‘एमटीडीसी’चे पर्यटक निवासी व्यवस्थेची दुरूस्ती करण्यात यावी. ज्या ठिकाणी पर्यटन वाढू शकते अशा ठिकाणांवर पर्यटन विकासाची कामे करण्याचे प्रस्तावित करावेत, असेही पर्यटनमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्याच्या धोरणाबाबत

 सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्याच्या धोरणाबाबत

निर्णय लवकरच

-         महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि. २१ : -   सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करणे.निर्वासित इनाम (नुकसान भरपाई आणि पुर्नवसन)  याबाबत नवीन धोरण  तयार करून  या बाबतचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेतला जाईलअशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात आयोजित बैठकीत दिली.

 

सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करणेनिर्वासित इनाम (नुकसान भरपाई आणि पुर्नवसन) अधिनियम १९५४ नुसार मौजागांधी चौकता.वणीजि.यवतमाळ येथील निर्वासित सिंधी समाजाच्या विस्थापितांना दिलेले वाणिज्य भुखंडाचे पट्टे नियमित करुन मालकी हक्क प्रदान करणे आणि  जरीपटका कॉलनीनागपूर येथील अतिक्रमीत जागेसंदर्भात  महसूल मंत्री यांच्या समिती कक्षात बैठक झाली. बैठकीस महसूल विभागाचे  अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमारउपसचिव  श्रीमती  अश्विनी यमगर  व संबधित अधिकारी उपस्थित होते.

शहरातील एल धारणाधिकार सत्ता प्रकार जमीनबाबत निर्णय लवकरच

 सांगली शहरातील एल धारणाधिकार सत्ता प्रकार जमीनबाबत

निर्णय लवकरच

-         महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि. २१ : - सांगली शहरातील एल धारणाधिकार सत्ता प्रकारच्या जमिनीचे रूपांतर ए या सत्ता प्रकारात करण्यासंदर्भात मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी  सांगितले.

सांगली शहरात एल धारणाधिकार सत्ता प्रकारच्या जमिनीचे रूपांतर ए या सत्ता प्रकारात करण्यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस आमदार  सुधीर गाडगीळमहसूल विभागाचे उपसचिव धनंजय निकमसत्यनारायण बजाज आदी उपस्थित होते. सांगली  जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले,  खासगी व्यक्तीचे क्षेत्राचा धारणाधिकार  एल बदलून त्याचे रूपांतर ए  मध्ये करणे हा धोरणात्मक निर्णय आहे.  या निर्णयास मंत्री मंडळाची मान्यता घेणे उचित  ठरणार असल्याने त्यामुळे याबाबत लवकरच मंत्री मंडळात निर्णय घेतला जाईल.

स्तन व गर्भाशयमुख कर्करोग निदानासाठी तपासणी मोहीम राबवावी

 स्तन व गर्भाशयमुख कर्करोग निदानासाठी तपासणी मोहीम राबवावी

-सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबईदि. 21 : राज्यामध्ये स्तन व गर्भाशयमुख कर्करोगाचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. या दोन्ही कर्करोगाच्या निदानासाठी राज्यात मोहीम  राबविण्यात यावीअसे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

आर्थिक वर्ष 2025 - 26 च्या नियोजनासाठी आरोग्य भवन येथे आयोजित बैठकीत आरोग्य मंत्री श्री. आबिटकर बोलत होते. बैठकीस सचिव वीरेंद्र सिंगआरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्रीरंगा नायकसंचालक डॉ. नितीन अंबाडेकरवैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत डांगेराज्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाणसहसंचालक श्रीमती कमलापुरे आदींसह विविध शाखांचे अधिकारी उपस्थित होते.

आरोग्य मंडळाच्या ठिकाणी संदर्भ सेवा रुग्णालये उभारण्याबाबत  पुढील वर्षात आर्थिक तरतुदीची मागणी करण्याबाबत सूचना देताना आरोग्य मंत्री श्री.अबिटकर म्हणालेनाशिक व अमरावती येथील संदर्भ सेवा रुग्णालय कार्यान्वित झाली आहे. उर्वरित सर्व ठिकाणी रुग्णालयाच्या उभारणीसाठी जागा शोधून निधीची मागणी करण्यात यावी. मागील आर्थिक वर्ष 2024 - 25 मध्ये मिळालेला संपूर्ण निधी खर्च करण्यात यावा. याबाबत विहित कालमर्यादा निश्चित करण्यात यावी. क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी. तसेच कुष्ठरोग रुग्ण शोध मोहीमही प्रभावीपणे राबविण्यात यावी.

जिल्हास्तरावर आरोग्य विभागाच्या योजनांची माहिती तसेच तक्रारीच्या अनुषंगाने संपर्क यंत्रणा निर्माण करण्यात यावी.  यामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची नियुक्ती करावी.  या संपर्क यंत्रणेचे केंद्र मुंबईत असावे. महात्मा फुले जन आरोग्य अभियान अंतर्गत उपलब्ध खाटांची माहिती ऑनलाईन पद्धतीने मिळण्याची व्यवस्था करण्यात यावीअशा सूचनाही यावेळी मंत्री सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी दिल्या.

००००

Featured post

Lakshvedhi