Wednesday, 22 January 2025

एप्रिलमध्ये होणाऱ्या महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे नियोजनपूर्वक आयोजन करावे

 एप्रिलमध्ये होणाऱ्या महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे

नियोजनपूर्वक आयोजन करावे

- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

 

 मुंबईदि. २१ : महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन महोत्सवाच्या नियोजनासंदर्भात आढावा बैठक पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या महोत्सवानिमित्त होणाऱ्या अनेक उपक्रमांचा आढावा पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी सादरीकरणाद्वारे घेतला.

मंत्रालयात या बैठकीस विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे  व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशीपर्यटन संचालनालयाचे संचालक भगवंतराव पाटीलपर्यटन संचालनालयाचे सहसंचालक सुशील पवार तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 हा पर्यटन महोत्सव एप्रिलमध्ये महाबळेश्वर येथे तीन दिवसांसाठी आयोजित करण्यात येणार आहे. हा महोत्सव राज्यातील तसेच देशातील पर्यटकांसाठी आकर्षणबिंदू ठरणार असून अनेक सांस्कृतिक तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमांचा यामध्ये समावेश असणार आहे. यामध्ये स्ट्रॉबेरी महोत्सवलाईव्ह मनोरंजनमहाबळेश्वर मिनी मॅरॅथॉनहॉट एअर बलूनहेलिकॉप्टर सुविधा इत्यादी पर्यटन आकर्षण उपक्रम असणार आहेत.

या महोत्सवादरम्यान होणाऱ्या कार्यक्रमांच्या आयोजनाचे दिवसनिहाय वेळापत्रक तयार करावेत्याचप्रमाणे हे कार्यक्रम महाबळेश्वर मधील विविध प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर आयोजित करावे. हा महोत्सव गौरवशाली व्हावा यादृष्टीने प्रयत्न करण्यात यावेत. या पर्यटन महोत्सवाच्या नियोजनासंदर्भात नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. या पर्यटन महोत्सवाचे नियोजन काटेकोरपणे करण्याचे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

***

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi