Wednesday, 22 January 2025

पर्यटक निवासांच्या ठिकाणी पर्यटन वाढीवर भर द्या

 पर्यटक निवासांच्या ठिकाणी पर्यटन वाढीवर भर द्या

- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

 

            मुंबई, दि. २१ : पर्यटन विभागाच्या सर्व पर्यटक निवासांच्या ठिकाणी पर्यटन वाढीसाठी  कोणकोणत्या बाबी करता येवू शकतील हे विचारात घेवून नियोजन करावे, त्याचबरोबर पर्यटन विभागाच्या मालकीच्या सर्व मालमत्तांची गुणवत्ता तपासणी करणारी पथके नियुक्त करण्याचे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

             मंत्रालयात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची बैठक झाली. या बैठकीत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणेपर्यटन संचालक डॉ बी. एन. पाटीलमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशीमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, अधीक्षक अभियंता शैलेंद्र बोरसे यांसह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

           पर्यटनमंत्री श्री.देसाई म्हणाले कीमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ चालवत असलेले पर्यटक निवासविकसित करत असलेले पर्यटक निवास, दीर्घ व अल्प मुदतीवर चालवण्यासाठी दिलेल्या मालमत्ता यांची योग्य ती निगा राखणे आपली जबाबदारी आहे. सर्व मालमत्तांची तपासणी करून त्या सुव्यवस्थितपणे वापरल्या जातील याची देखील खात्री करणे गरजेचे आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जोतीबा मंदिराच्या ठिकाणी असलेल्या ‘एमटीडीसी’चे पर्यटक निवासी व्यवस्थेची दुरूस्ती करण्यात यावी. ज्या ठिकाणी पर्यटन वाढू शकते अशा ठिकाणांवर पर्यटन विकासाची कामे करण्याचे प्रस्तावित करावेत, असेही पर्यटनमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi