Thursday, 16 January 2025

महाराष्ट्र शासनाचे १३ वर्षे मुदतीचे २,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 महाराष्ट्र शासनाचे १३ वर्षे मुदतीचे

,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

 

मुंबईदि. १६ : महाराष्ट्र शासनाच्या १३ वर्षे मुदतीच्या २,५०० कोटींच्या  (‘ ७.११ %  महाराष्ट्र शासनाचे रोखे२०३८’) रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकासकामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईलअशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

२१ जानेवारी२०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे  मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर लिलावाचे बीडस्  २१ जानेवारी२०२५ रोजी संगणकीय प्रणालीनुसाररिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

यामध्ये स्पर्धात्मक बिड्स संगणकीय प्रणालीद्वारे ई-कुबेर सिस्टीमनुसार सकाळी  १०.३० ते ११.३० वाजेपर्यंत सादर करावेत. तर अस्पर्धात्मक बीडस् ई-कुबेर सिस्टिमनुसार सकाळी १०.३० ते ११.०० पर्यंत सादर करावेत. लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बीडर्सकडून रकमेचे प्रदान २२ जानेवारी२०२५  रोजी रोखीनेबँकर्स धनादेश/प्रदान आदेशडिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील.

कर्जरोख्याचा कालावधी १३ वर्षांचा असूनरोख्यांचा कालावधी ८ जानेवारी२०२५ पासून सुरू होईलतर कर्जरोख्याची परतफेड दिनांक ८ जानेवारी२०३८ रोजी पूर्ण किमतीने केली जाईल. व्याजाचा दर हा ७.११ टक्के दरसाल दर शेकडा एवढा असेल. व्याजाचे प्रदान रोख्याच्या मूळ दिनांकापासून मूळ किमतीवर प्रतिवर्षी दिनांक जुलै ८ आणि जानेवारी ८  रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम१९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे कर्जरोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतीलअशी माहिती वित्त विभागाने दिली आहे.

-li.आनंदी°पहाट.il-* 🌻 *संक्रांत सणाच्या आनंदाची*

 🌹⚜️❣️🔆🌅🔆❣️⚜️🌹

        

     🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻

                  

       *संक्रांत सणाच्या आनंदाची*


🌹⚜️🌸🔆🌞🔆🌸⚜️🌹

        

        *भारतीय संस्कृती सणामुळे समाजात कुणालाही एकटेपण जाणवत नाही. कुटुंबातील नातेवाईक आणि  समाजातील सर्वजण यांच्यात संवाद राहतो.. आपुलकीचे नाते जुळते.*

        *असाच गोडव्याचा सण म्हणजे संक्रांत. या सणाला शेतकरीवर्ग आरोग्यदायी आहार पुरवतो. संक्रांतीचे हळदीकुंकू पर्व.. कुंकू लावण्याचे फायदे सर्वश्रुत आहेत. हे पर्व म्हणजे महिलावर्गाला पारंपरिक लुगडी.. शालू.. पैठण्या.. नवनवीन साड्या नेसण्याची, दागदागिने.. गजरे माळून नटण्याची, कलागुण प्रदर्शनाची पर्वणीच.*

        *नवविवाहितेचा पहिल्या वर्षी माहेरी.. सासरी संक्रांतसण किती उत्साहात साजरा करावा याची आई-सासू यांच्यात चढाओढ असते. हळदीकुंकू कार्यक्रमात जेष्ठांकडून कौतुक होते.. आशीर्वाद मिळतात.*

        *तिळगुळ वडी.. लाडू माझ्या मुलीने.. माझ्या सुनेने स्वतः तयार केलेत हे सांगताना अभिमान वाटतो. तर आजही काही मुली हलवा.. हलव्याचे दागिने स्वतः करतात. मग हळदीकुंकू कार्यक्रमात मुलगी-जावई हे हलव्याचे दागिने घालून वावरतात.*

        *तर घरातील बालकांनाही हलव्याचे दागिने घालून राधा कृष्णाप्रमाणे सजवले जातेय. त्यांचे हे रुप बघणे सर्वांनाच सुखावते. बालकांचे बोरं, ऊस, हरबरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या रेवड्या, गोळ्या बिस्कीट एकत्रित बाळाच्या डोक्यावर टाकत बोरनहाण केले जाते. बच्चे कंपनी ते गोळा करत आनंद लुटतात. या सर्वांचे फोटो जन्मभर मर्मबंध ठेव ठरतात.*

        *हलवा तयार करणे हलव्याचे दागिने बनविणे ही अत्यंत किचकट.. अवघड कला. चूलीवर किंवा शेगडीवरच्या भांड्यात पांढरे तीळ.. वर साखरेचा पाक घालून काटेरी हलवा केला जातो. असा हलवा करणे.. त्याचे दागिने करणे म्हणजे संयम.. चिकाटी.. एकाग्रतेची परीक्षाच. अभ्यासक्रमात नसलेले हे धडे.. संस्कार संक्रांत हळदीकुंकू निमित्याने प्राप्त होतात.*

        *आजही हलवा.. हलव्याचे नाजूक.. सुबक.. सुंदर दागिने तयार करण्याची अवघड कला गावोगाव जोपासली जात आहे. सोन्याच्या दागिन्या एवढेच संक्राती हळदीकुंकवात त्याचे महत्त्व.*

        *कुंकू लावण्याचे भाग्य मिळाल्याचा.. हे सुख प्राप्त झाल्याचा आनंद नवविवाहीतेला होणारच. तिला ही पुर्वजन्म पुण्याई आणि अंबामातेची कृपाच वाटतेय, म्हणूनच हे संक्रांतीचे हळदीकुंकू थाटात संपन्न होत आहे.*

            

⚜️🌸🥀👁️❣️👁️🥀🌸⚜️


  *माझ्या कपाळीचं कुकु*

  *कवतिकानं किती बाई निरखू*

  *जीव भरंना, भरंना, भरंना*

  *खरं वाटंना, वाटंना, वाटंना*


  *कुण्या जल्मीची पावली पुण्याई*

  *झाली परसन आई अंबाबाई*

  *चिरी कुकवाची लखलख निरखू*


  *सुर्व्या सांजचा, चांद पुनवंचा*

  *सर्गाची गं सोभा, दारी आनंद हुभा*

  *चिरी कुकवाची लखलख निरखू*


  *टाकीन वोवाळून हिरं,*

  *मोती, सोनं*

  *पिरती मोलाचं कुकवाचं लेनं*

  *चिरी कुकवाची लखलख निरखू*


🌺🎶🥀👁️❣️👁️🥀🎶🌺


  *गीत : योगेश*  ✍

  *संगीत : आनंदघन*

  *स्वर : लता मंगेशकर*

  *चित्रपट : तांबडी माती*

  *(१९६९)*


  🎼🎶🎼🎶🎼   🎧


    *🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*

               *-१६.०१.२०२५-*


🌻🌸☘🎼🌻🎼☘🌸🌻

शेत वहीवाटीमध्ये वाहन वापरानुसार रस्ता करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करा

 शेत वहीवाटीमध्ये वाहन वापरानुसार रस्ता करण्याबाबत

 मार्गदर्शक सूचना जाहीर करा

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबईदि. १६ :- यांत्रिकीकरणामुळे सध्या शेत वहीवाटीमध्ये मोठ्या वाहनांचा वापर होत असल्याने वाहन प्रकारानुसार शेत जमीन वहिवाट रस्ता करण्याबाबत तहसिलदारांना निर्णय घेता यावा यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात याव्यातअशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

शेतजमिनीच्या खरेदी विक्रीच्या दस्त नोंदणीमध्ये शेत रस्त्याचा समावेश बंधनकारक करणे व शेत रस्त्यांच्या नोंदणी ७/१२ इतर हक्कात करण्याबाबत महसूल मंत्री यांच्या दालनात बैठक झाली. बैठकीस वित्त नियोजनकृषीमदत व पुनर्वसनविधी व न्याय आणि कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वालआमदार अभिमन्यू पवारमहसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमारसहसचिव अजित देशमुख उपस्थित होते.

महसूल मंत्री श्री बावनकुळे म्हणाले कीशासनाने शेत रस्त्यांचे वर्गीकरण केले आहे. त्यानुसार जे रस्ते अस्तित्वात आहेत त्यांना क्रमांक देण्यात यावेत. शेतजमिनीमध्ये वहिवाट करण्यासाठी अस्तित्वात असलेले रस्ते काही ठिकाणी अरुंद आहेत. अशा ठिकाणी मोठी वाहने जाण्यास अडचण निर्माण होऊन तक्रारही होतात. शेत वहिवाट रस्त्याची  तक्रार सुनावणी तहसीलदार यांच्याकडे होते. त्यानंतर  त्यावर थेट अपील उच्च न्यायालयात केले जाते. थेट अपील होण्यापूर्वी अतिरिक्त जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करता यावे यासाठी एक स्टेप मधी असणे आवश्यक असून त्यानुसार नियमात सुधारणा करण्यात याव्यात अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

वेंगुर्ला गवळीवाडा येथील रहिवाशांच्या जमिनीचा प्रस्ताव करा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेवू

 वेंगुर्ला गवळीवाडा येथील रहिवाशांच्या जमिनीचा प्रस्ताव करा

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेवू

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबईदि. १६ :-  वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील कॅम्प गवळीवाडा येथील स्थानिक रहिवाशांना प्रती कुटुंब दीड हजार स्क्वे. फूट जमीन विनामूल्य देण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावाअशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील कॅम्प गवळीवाडा येथील स्थानिक रहिवाशांच्या कब्जा भोग्यातील जमिनीसंदर्भात महसूलमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली. बैठकीस आमदार दीपक केसरकरमहसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमारसहसचिव अजित देशमुख उपस्थित होते तर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले कीमौजे वेंगुर्ला येथील शासकीय जमिनीमध्ये १९०५ पूर्वीपासून गवळ्यांची वसाहत आहे. गवळीवाडा येथील रहिवाशी ब्रिटीशकालापासून या जागेचा वापर करीत आहेत.  जमिनीवर अतिक्रमण केले नसलेबाबत व ब्रिटीशांनी सेवेकरिता वास्तव्यासाठी विनामूल्य जमिनी दिल्या असल्यानेवहिवटीखाली असणारी घरे व इतर जमिनी विनामूल्य मिळण्याची मागणी संबधित रहिवाशांनी केली आहे. त्यानुसार गवळीवाडा येथील रहिवाशांना  प्रती कुटुंब दीड हजार स्क्वेअर फुट जमीन विनामूल्य देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात  सादर करा. ज्या रहिवाशांच्या ताब्यात  दीड हजार स्क्वे. फुट पेक्षा अधिक जमीन आहे याबाबत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी 1980 च्या रेडीरेकनर दरानुसार संबंधितांकडून रक्कम घेण्याबाबत प्रस्ताव शासनास सादर करावाअशा सूचना बावनकुळे यांनी दिल्या.

००००

नवकल्पना आणि ऊर्जा स्टार्टअप्ससाठी गरजेचे मान्यवरांचे मार्गदर्शन

 नवकल्पना आणि ऊर्जा स्टार्टअप्ससाठी गरजेचे

मान्यवरांचे मार्गदर्शन

 

मुंबईदि. 16 :- नवकल्पना आणि ऊर्जा हे स्टार्टअप्ससाठी अत्यंत गरजेचे आहे. गुंतवणुकीद्वारे गुंतवणुकदारांना होणारा फायदा ही महत्वाची बाब असल्याचे मत राष्ट्रीय स्टार्टअप्स दिवसमध्ये 'स्टार्टअप्स कसे सुरू करावे' याविषयी मेरीको लिमिटेडचे अध्यक्ष हर्ष मारीवाला, अपग्रेड अँड स्वदेस फाउंडेशनचे सह संस्थापक रॉनी स्क्रूवालास्कॉईडव्हेंचर्सचे संस्थापक ईसप्रीत सिंग गांधी यांनी कार्यक्रमाच्या पहिल्या चर्चासत्रात व्यक्त केले.

बांद्रा-कुर्ला संकुल येथील जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशनएलिव्हेटिंग महाराष्ट्र (Empowering Innovation, Elevating Maharashtra) या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय स्टार्टअप्स दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ब्लू स्मार्टचे सह संस्थापक पूनित गोयल यांनी याचे सूत्रसंचालन केले.

                100 पैकी 99 लोकांनी एआय (AI) सोबत आपल्या व्यवसायाला सुरुवात केली आहे. कोणताही नविन स्टार्टअप्स सुरु करताना त्यातून बऱ्यापैकी नफा व्हायला हवा हीच प्रत्येकाची अपेक्षा असते. बहुतेक माणसे गुंतवणूक करताना सर्व विचार करूनच योग्य तो निर्णय घेतात. आपल्या देशातील शासकीय यंत्रणा खूप चांगली आहे. गुंतवणुकदारांनी आसपासच्या वातावरणाचा व्यवस्थित अंदाज घ्यावा आणि मगच स्टार्टअप्सला सुरवात करावी. ऑनलाईन शिक्षण सुद्धा सहज उपलब्ध करून दिले जात असून व्यवस्थित प्रयत्न केले तरच आपल्याला यश मिळतेच हा मंत्र लक्षात ठेवावा.

सुरवातीच्या काळात स्टार्टअप्स कसे असेल हे संपूर्णपणे तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर अवलंबून आहे. कोणताही व्यवहार करताना तुम्ही आत्मविश्वास आणि योग्य नियोजनासोबत केलेले काम महत्वाचे ठरते असे मत या चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केले.

००००

इमर्जन्सी’ चित्रपटातून ऐतिहासिक मागोवा

 ‘इमर्जन्सी’ चित्रपटातून ऐतिहासिक मागोवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. 16 : ‘इमर्जन्सी’ चित्रपटातून आणिबाणीच्या काळातील ऐतिहासिक मागोवा घेण्यात आला असून या कालावधीतील घटनाक्रम अचूकपणे टिपण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन बीकेसीतील पीव्हीआर येथे करण्यात आले. यावेळी चित्रपटाच्या नायिका कंगना राणावतकौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढाआमदार प्रवीण दरेकरआमदार प्रसाद लाडचित्रपटाची संपूर्ण टीम आणि प्रेक्षक उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, आणीबाणीच्या कालावधीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बाजूला ठेवण्यात आले. मात्र ही घटना देशाच्या प्रत्येक नागरिकांस माहिती होणे आवश्यक आहे. आणीबाणीच्या कालखंडात नागरिकांचे अधिकार काढून घेण्यात आले होते. लोकशाहीवरील या संकटाची माहिती देशातील नागरिकांना कळणे गरजेचे आहे, असेही प्रतिपादन श्री.फडणवीस यावेळी केले.

अभिनेत्री कंगना राणावत यांनी स्वर्गीय इंदिरा गांधी यांची भूमिका अतिशय उत्तम रंगवली असल्याचेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले

मंगलकार्यांमध्ये केळीचे महत्व कां आहे ???*

 *मंगलकार्यांमध्ये केळीचे महत्व कां आहे  ???*

🍭🍭🍭🍭🍭🍭🍭🍭🍭🍭🍭


केळीचे झाड हे शापित झाड आहे !!

ऋषि दुर्वास यांची पत्नी कंदिनी हिला मिळालेला शाप म्हणजे केळीचे झाड आहे !!


ही अख्यायिका अशी आहे की,


ऋशी दुर्वास हे एकदा उशिरा आपल्या कुटीत परतले होते व परत दुसऱ्या दिवशी ब्रम्हमुहुर्तावर उठून एक अनुष्ठान करण्याचे  होते.थकून भागून आल्या मुळे ब्रम्हमुहुर्तावर जाग येईल का नाही सांगता येत नाही, म्हणून त्यांनी आपली पत्नी कंदिनी हिला ब्रम्हमुहुर्तावर उठवण्याचे सांगून झोपी गेले. पण ऋषि पत्नी कंदिनी ला ही ब्रम्हमुहुर्तावर जाग आली नाही. जेव्हा सूर्य वर आला तेव्हा ऋषि ना जाग आली व ब्रम्हमुहुर्तावर आपणास पत्नीने न उठवल्याने त्यांचा क्रोध अनावर झाला. आपल्या अनुष्ठाना मध्ये बाधा आल्या मुळे त्यांनी क्रोधीत होऊन आपल्या पत्नीस भस्म होण्याचा शाप दिला.


ऋषि पत्नी कंदिनी राख होऊन पडली. ही गोष्ट कंदिनीचे पिता ऋषि अंबरीश यांना समजली. ते दुःखी होऊन त्या राखे कडे पाहू लागले.ऋषि दुर्वास पित्या समान आपल्या सासऱ्याची क्षमा मागू लागले. ऋषि अंबरीश यांनी ऋषि दुर्वास यांना कंदीनी स शाप मुक्ती साठी वृक्ष होण्याचे वरदान द्यावे अशी विनंती केली..त्या प्रमाणे ऋषि दुर्वास यांनी त्या राखेतून एक केळीचा वृक्ष निर्माण केला व वरदान दिले, की आजपासून पृथ्वीवर जे काही मंगलकार्य,पुजा, अनुष्ठान होईल, तेव्हा तुझ्या झाडाचे फळ, पान व खोड याचा प्रामुख्याने समावेश होईल. तसेच पानात भगवान विष्णू व खोडात भगवान महादेव यांचा वास असेल.


म्हणून आपल्या सर्व धार्मिक कार्यक्रमात केळी व केळीचे पान व खोड याचा समावेश होऊ लागला. केळीच्या झाडास कंदिनी हे नाव सुद्धा पडले आहे.

♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️

डाॅ. उदय तेलकर -पुणे

Featured post

Lakshvedhi