🌹⚜️❣️🔆🌅🔆❣️⚜️🌹
🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻
*संक्रांत सणाच्या आनंदाची*
🌹⚜️🌸🔆🌞🔆🌸⚜️🌹
*भारतीय संस्कृती सणामुळे समाजात कुणालाही एकटेपण जाणवत नाही. कुटुंबातील नातेवाईक आणि समाजातील सर्वजण यांच्यात संवाद राहतो.. आपुलकीचे नाते जुळते.*
*असाच गोडव्याचा सण म्हणजे संक्रांत. या सणाला शेतकरीवर्ग आरोग्यदायी आहार पुरवतो. संक्रांतीचे हळदीकुंकू पर्व.. कुंकू लावण्याचे फायदे सर्वश्रुत आहेत. हे पर्व म्हणजे महिलावर्गाला पारंपरिक लुगडी.. शालू.. पैठण्या.. नवनवीन साड्या नेसण्याची, दागदागिने.. गजरे माळून नटण्याची, कलागुण प्रदर्शनाची पर्वणीच.*
*नवविवाहितेचा पहिल्या वर्षी माहेरी.. सासरी संक्रांतसण किती उत्साहात साजरा करावा याची आई-सासू यांच्यात चढाओढ असते. हळदीकुंकू कार्यक्रमात जेष्ठांकडून कौतुक होते.. आशीर्वाद मिळतात.*
*तिळगुळ वडी.. लाडू माझ्या मुलीने.. माझ्या सुनेने स्वतः तयार केलेत हे सांगताना अभिमान वाटतो. तर आजही काही मुली हलवा.. हलव्याचे दागिने स्वतः करतात. मग हळदीकुंकू कार्यक्रमात मुलगी-जावई हे हलव्याचे दागिने घालून वावरतात.*
*तर घरातील बालकांनाही हलव्याचे दागिने घालून राधा कृष्णाप्रमाणे सजवले जातेय. त्यांचे हे रुप बघणे सर्वांनाच सुखावते. बालकांचे बोरं, ऊस, हरबरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या रेवड्या, गोळ्या बिस्कीट एकत्रित बाळाच्या डोक्यावर टाकत बोरनहाण केले जाते. बच्चे कंपनी ते गोळा करत आनंद लुटतात. या सर्वांचे फोटो जन्मभर मर्मबंध ठेव ठरतात.*
*हलवा तयार करणे हलव्याचे दागिने बनविणे ही अत्यंत किचकट.. अवघड कला. चूलीवर किंवा शेगडीवरच्या भांड्यात पांढरे तीळ.. वर साखरेचा पाक घालून काटेरी हलवा केला जातो. असा हलवा करणे.. त्याचे दागिने करणे म्हणजे संयम.. चिकाटी.. एकाग्रतेची परीक्षाच. अभ्यासक्रमात नसलेले हे धडे.. संस्कार संक्रांत हळदीकुंकू निमित्याने प्राप्त होतात.*
*आजही हलवा.. हलव्याचे नाजूक.. सुबक.. सुंदर दागिने तयार करण्याची अवघड कला गावोगाव जोपासली जात आहे. सोन्याच्या दागिन्या एवढेच संक्राती हळदीकुंकवात त्याचे महत्त्व.*
*कुंकू लावण्याचे भाग्य मिळाल्याचा.. हे सुख प्राप्त झाल्याचा आनंद नवविवाहीतेला होणारच. तिला ही पुर्वजन्म पुण्याई आणि अंबामातेची कृपाच वाटतेय, म्हणूनच हे संक्रांतीचे हळदीकुंकू थाटात संपन्न होत आहे.*
⚜️🌸🥀👁️❣️👁️🥀🌸⚜️
*माझ्या कपाळीचं कुकु*
*कवतिकानं किती बाई निरखू*
*जीव भरंना, भरंना, भरंना*
*खरं वाटंना, वाटंना, वाटंना*
*कुण्या जल्मीची पावली पुण्याई*
*झाली परसन आई अंबाबाई*
*चिरी कुकवाची लखलख निरखू*
*सुर्व्या सांजचा, चांद पुनवंचा*
*सर्गाची गं सोभा, दारी आनंद हुभा*
*चिरी कुकवाची लखलख निरखू*
*टाकीन वोवाळून हिरं,*
*मोती, सोनं*
*पिरती मोलाचं कुकवाचं लेनं*
*चिरी कुकवाची लखलख निरखू*
🌺🎶🥀👁️❣️👁️🥀🎶🌺
*गीत : योगेश* ✍
*संगीत : आनंदघन*
*स्वर : लता मंगेशकर*
*चित्रपट : तांबडी माती*
*(१९६९)*
🎼🎶🎼🎶🎼 🎧
*🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*
*-१६.०१.२०२५-*
🌻🌸☘🎼🌻🎼☘🌸🌻
No comments:
Post a Comment