Thursday, 16 January 2025

मंगलकार्यांमध्ये केळीचे महत्व कां आहे ???*

 *मंगलकार्यांमध्ये केळीचे महत्व कां आहे  ???*

🍭🍭🍭🍭🍭🍭🍭🍭🍭🍭🍭


केळीचे झाड हे शापित झाड आहे !!

ऋषि दुर्वास यांची पत्नी कंदिनी हिला मिळालेला शाप म्हणजे केळीचे झाड आहे !!


ही अख्यायिका अशी आहे की,


ऋशी दुर्वास हे एकदा उशिरा आपल्या कुटीत परतले होते व परत दुसऱ्या दिवशी ब्रम्हमुहुर्तावर उठून एक अनुष्ठान करण्याचे  होते.थकून भागून आल्या मुळे ब्रम्हमुहुर्तावर जाग येईल का नाही सांगता येत नाही, म्हणून त्यांनी आपली पत्नी कंदिनी हिला ब्रम्हमुहुर्तावर उठवण्याचे सांगून झोपी गेले. पण ऋषि पत्नी कंदिनी ला ही ब्रम्हमुहुर्तावर जाग आली नाही. जेव्हा सूर्य वर आला तेव्हा ऋषि ना जाग आली व ब्रम्हमुहुर्तावर आपणास पत्नीने न उठवल्याने त्यांचा क्रोध अनावर झाला. आपल्या अनुष्ठाना मध्ये बाधा आल्या मुळे त्यांनी क्रोधीत होऊन आपल्या पत्नीस भस्म होण्याचा शाप दिला.


ऋषि पत्नी कंदिनी राख होऊन पडली. ही गोष्ट कंदिनीचे पिता ऋषि अंबरीश यांना समजली. ते दुःखी होऊन त्या राखे कडे पाहू लागले.ऋषि दुर्वास पित्या समान आपल्या सासऱ्याची क्षमा मागू लागले. ऋषि अंबरीश यांनी ऋषि दुर्वास यांना कंदीनी स शाप मुक्ती साठी वृक्ष होण्याचे वरदान द्यावे अशी विनंती केली..त्या प्रमाणे ऋषि दुर्वास यांनी त्या राखेतून एक केळीचा वृक्ष निर्माण केला व वरदान दिले, की आजपासून पृथ्वीवर जे काही मंगलकार्य,पुजा, अनुष्ठान होईल, तेव्हा तुझ्या झाडाचे फळ, पान व खोड याचा प्रामुख्याने समावेश होईल. तसेच पानात भगवान विष्णू व खोडात भगवान महादेव यांचा वास असेल.


म्हणून आपल्या सर्व धार्मिक कार्यक्रमात केळी व केळीचे पान व खोड याचा समावेश होऊ लागला. केळीच्या झाडास कंदिनी हे नाव सुद्धा पडले आहे.

♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️

डाॅ. उदय तेलकर -पुणे

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi